Dio buldana Corona alert 14.6.2020

*कोरोना अलर्ट : प्राप्त 41 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 05 पॉझिटिव्ह*
बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 33 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील चिखली येथील 25 वर्षीय तरुण रुग्णाचे आहेत.
  त्याचप्रमाणे आज मलकापूर येथील पारपेट भागातील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान बुलडाणा येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या पाच झाली आहे. सदर व्यक्तीला 12 जून रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
       तसेच आतापर्यंत 1750 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 118 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे. आतापर्यंत 77 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 77 आहे.  सध्या रूग्णालयात 36 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
    तसेच आज 14 जुन रोजी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 05 पॉझीटीव्ह, तर 41 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  119 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1750 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या