Posts

Showing posts from March, 2020

कोरोना अलर्ट : 26.3.2020

कोरोना अलर्ट :                               जिल्ह्यातील 64 नागरिक घरीच निरीक्षणाखाली होम क्वारंटाईनच्या संख्येत तीन जणांची वाढ बुलडाणा, दि. 26 :   कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयीत व्यक्तींना बुलडाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील 64 नागरिक त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणात ठेवण्यात आलेले आहे.       घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये तीन नागरिकांची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 25 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या  भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 26 मार्च 2020 रोजी 3 नवीन नागरिकांना ...

जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील

किराणा, दुध, भाजीपाला, फळे व धान्य दुकान, बेकरी यांचा समावेश बुलडाणा, दि. 26 :   कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा त्यामध्ये किराणा, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दुध यांची दुकाने वगळता अन्य दुकाने संचारबंदी काळात बंद आहेत. मात्र यामध्ये जिवनावश्यक वस्तूंच्या दुकांनामधील गर्दी अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही. कोरोना आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे आवश्यक आहे.      जिल्ह्यातील सर्व किराणा, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळे व दूध यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तसेच त्याठिकाणी गर्दी होवू याबाबत दक्षता घ्यावी. फळांची व भाजीपाल्यांची दुकाने 100 मीटर अंतराने लावण्यात यावीत. दुकानदारांनी ग्राहकांसाठी प्रत्येक दुकानासमोर 1 मीटर अंतरावर ग्राहक उभे राहतील यादृष्टीने नियोजन करावे. तसेच  ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकारी  व नगरपरिषद क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांनी  आदेशाचे...

कोरोना अलर्ट : 24.3.2020

जिल्ह्यातील 9 डाकघर वगळता अन्य उपडाकघर व शाखा डाकघर बंद ·           31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद बुलडाणा, दि.24 :   कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बुलडाणा विभागातील केवळ 9 डाक कार्यालय सुरू राहणार आहे. अन्य इतर सर्व उपडाकघर व शाखा डाकघर 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार आहेत, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन अधिक्षक डाकघर, बुलडाणा यांनी केले आहे.    या सुरू असलेल्या नऊ डाकघर कार्यालयांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. या संपर्क क्रमांकावर ग्राहकांनी डाक विभागाच्या सेवेसाठी संपर्क करावा. सुरू असलेली नऊ डाकघरे संपर्क क्रमांकांसह पुढील प्रमाणे : बुलडाणा प्रधन डाकघर संपर्क क्रमांक 07262-242508, खामगांव प्रधान डाकघर संपर्क क्रमांक 07263- 252106, चिखली डाकघर संपर्क क्रमांक 07264-242061, देऊळगांव राजा डाकघर संपर्क क्रमांक 07261-232001, जळगांव जामोद डाकघर संपर्क क्रमांक 07266-221422, मलकापूर डाकघर संपर्क क्रमांक 07267-222001, मेहकर डाकघर संपर्क क्रमांक 07268-224522, नांदुरा डाकघर संपर्क क्रमांक 07265-221030, शेगा...

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी..!

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी..! ·          आदेश 31 मार्चपर्यंत लागू ·          जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने बंद ·          आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये ·          जिल्ह्याच्या सर्व सीमा सील बुलडाणा, दि.24 :  राज्यात  कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नागरी भागासह ग्रामीण भागात महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 23 मार्च 2020 च्या आदेशान्वये संचारबंदी 31 मार्च 2020 पर्यंत लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात यापूर्वीच  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यात 31 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी काढले आहेत.     नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भा...

जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना रूग्णाला हाताळण्याची ‘मॉक ड्रील’

·          मॉक ड्रील असल्याने कुणीही अफवा पसरवू नये ·          जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांचे आवाहन बुलडाणा, दि.23 :  कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयात 20 मिनीटांची ‘मॉक ड्रील’(प्रात्याक्षिक) 22 मार्च 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता घेण्यात आली.  प्रात्याक्षिकात कोरोनाग्रस्त  रूग्णाला रूग्णालयातील आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात आणून त्यावर उपचार सुरू करण्यात आले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. रूग्णाची संपूर्ण माहिती घेण्यात आली. अशी ती मॉक ड्रील आहे.       ही केवळ मॉक ड्रील असून अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन किती सज्ज आहे, हे तपासण्यासाठी  मॉक ड्रील घेण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरली आहे. तरी ही केवळ आरोग्य प्रशासनाच्या तयारीचा भाग म्हणून घेण्यात आलेले प्रात्याक्षिक आहे. कुणीही मॉक ड्रीलमधून रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरवू नये. यामुळ...

जिल्ह्यात घरीच निरीक्षणाखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या आठने वाढली

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात घरीच निरीक्षणाखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या आठने वाढली ·         आतापर्यंत एकूण 55 नागरिक निरीक्षणाखाली ·         बुलडाणा आयसोलेशन कक्षात एक संशयीत दाखल बुलडाणा, दि. 21 :   कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम लागू केला आहे. तसेच आपत्कालीन कायदाही लागू करण्यात आला आहे.   विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.   त्यामध्ये आठ नागरिकांची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 21 मार्च 2020 पर्यंत   विदेशातून आलेल्या 47 भारतीय नागरिकांना   त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 22 मार्च 2020 रोजी 8 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 55 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.       जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नाग...

DIO NEWS BULDANA 22.3.2020,1

जिल्ह्यातील सर्व बार, मद्य विक्री   31 मार्चपर्यंत बंद ·         कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी ·         गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय बुलडाणा, दि. 22 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बार व रेस्टॉरंट, देशी दारू किरकोळ विक्री, विदेशी दारू विक्री, बार, क्लब आजपासून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमी संपर्क यायला पाहिजे. त्यानुसार सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता सर्व बार, मद्यविक्री   बंद करण्यात आली आहे.    जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा स...

‘कोरोना’चे संकट सर्व मिळून पिटाळून लावूया - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

·          22 मार्च रोजीच्या ‘जनता कर्फ्यु’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ·          मोर्चे, आंदोलने करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार ·          सॅनीटायझर, मास्कची साठेबाजी करू नये ·          लग्न समारंभ पुढे ढकलावे, नागरिकांनी सहकार्य करावे बुलडाणा, दि. 19 :  देश सध्या कोरोना विषाणूशी लढाई लढत आहे. सर्वत्र युद्ध पातळीवर कोरोनाशी लढण्याची सज्जता करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. हे कोरोनाचे संकट सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देत पिटाळून लावायचे आहे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी...