बुलढाण्यातील खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी;
बुलढाण्यातील खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी;
४२ आधुनिक कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण;
निवास व भोजनाचीही मोफत सुविधा
बुलढाणा,
दि. २ (जिमाका) : आधुनिक
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योगक्षेत्रातील करिअरच्या
उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण
प्रबोधिनी (AMRUT), पुणे आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
मंत्रालयांतर्गत कार्यरत MSME Technology Centre–Indo German Tool Room (IGTR)
यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी
तब्बल ४२ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील
पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक
जिग्नेश कमाणी यांनी केले आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पात्र
उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क पूर्णपणे मोफत असण्यासोबतच निवासी प्रशिक्षणासाठी निवास व भोजनाची सुविधाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानातील
रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करण्याची मोठी संधी युवक-युवतींना मिळणार आहे.
सध्याच्या उद्योगविश्वात मोठ्या प्रमाणावर
मागणी असलेल्या CAD-CAM, CNC, Automation, Robotics, 3D Printing, Mechatronics,
Electrical, Civil आणि Machine Maintenance या क्षेत्रांमध्ये उद्योगाभिमुख
प्रशिक्षण दिले जाणार आहे. या ४२ अभ्यासक्रमांमध्ये AutoCAD, SolidWorks, CATIA, CREO, ANSYS,
CNC Machining, 3D Printing, PLC Programming, SCADA, Robotics & Automation,
Embedded Systems, E-CAD, Revit Architecture, STAAD Pro आणि Total Station Survey यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित
अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय Tool
& Die Maker, CNC Operator, CNC Programmer, Mechatronics System Designer,
Machine Maintenance आणि Automation क्षेत्रातील रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला
आहे.
महाराष्ट्रातील AMRUTच्या लक्षित खुल्या
प्रवर्गातील पात्र युवक-युवती या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये
ब्राह्मण, मारवाडी, गुजराथी, बनिया, राजपूत, कायस्थ, पाटीदार, हिंदू लिंगायत,
वीरशैव लिंगायत, जाट, सिंधी, कानबी, कोमटी, आर्य वैश्य आदी समाजघटकांचा समावेश
आहे. अभ्यासक्रमानुसार दहावी, ITI, पदविका, पदवी तसेच अभियांत्रिकी
शिक्षण घेतलेले उमेदवार
पात्रतेनुसार प्रवेश घेऊ शकतात. विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर, वाळूज, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित करण्यात
येणार आहे.
कागदपत्रे आवश्यक : अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, समाजघटकाचा पुरावा,
शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा
दाखला अथवा EWS प्रमाणपत्र, आधार कार्ड, PAN कार्ड, वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र,
छायाचित्र आणि स्वाक्षरी आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२६ आहे. पात्रता परीक्षा, कागदपत्र पडताळणी व मुलाखत १२ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणार असून प्रशिक्षणाला १५ सप्टेंबर २०२६ पासून
सुरुवात होणार आहे. ही संधी केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून आधुनिक
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून रोजगार, स्वयंरोजगार आणि
उद्योगक्षेत्रात करिअर घडविण्याची संधी आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पात्र
युवक-युवतींनी वेळ न दवडता ११ सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन अर्ज करून
या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक
माहितीसाठी जिल्हा
व्यवस्थापक जिग्नेश कमाणी ९११२२२७६३७/८३०८९९८९२२ यांच्याशी
किंवा अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट
नं. ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा४४३००१
येथे संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment