Posts

Showing posts from February, 2023

DIO BULDANA NEWS 28.02.2023

Image
  सामाजिक न्यायच्या चित्ररथाला हिरवी झेंडी *योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचणार बुलडाणा ,   दि.   28 : सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी सामाजिक न्याय भवन येथे हिरवी झेंडी दाखविली. येत्या महिन्यात हा चित्ररथ सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्हाभरात प्रसिद्धी करणार आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी, समाज कल्याण निरीक्षक प्रमोद खांदवे आदी उपस्थित होते. विशेष घटक योजनेतून या चित्ररथाची संकल्पना साकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, आंतरजातीलय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना, कर्मवीर दादासाहेब पाटील सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना आदी योजनांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरणार आहे. चित्ररथामध्ये असणाऱ्या एलईडी दृकश...

DIO BULDANA NEWS 27.02.2023

Image
  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी रुपाली सरोदे यांची नियुक्ती *माजी सैनिक संघटनेतर्फे सत्कार बुलडाणा ,   दि.   27 : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी स्कॉड्रन लीडर (सेवानिवृत्त) रुपाली पांडुरंग सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती सरोदे ह्या माजी सैनिक पांडुरंग सरोदे यांची मुलगी आहे. यानिमित्त शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती सरोदे यांनी जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, वीर पत्नी आणि वीर मातांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, संजय गायकवाड, अर्जुन गाडेकर यांच्यासह अशोक शेळके उपस्थित होते शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे ज्ञानेश्वर ठेंग, केशव सोनुने, रमेश जोहरे, गजानन मोतेकर, उज्ज्वला कुलकर्णी, हरीदास थोलबरे, सांडू भगत, जी. व्ही. बढे, सुरेश खडके, आर. जे.   जाधव, उत्तम रिंढे, गजानन पांगारकर, अनिरुद्ध खानझोडे, जयंत शेलेकर, मुरलीधर सुसर आदी उपस्थित होते. 00000

DIO BULDANA NEWS 24.02.2023

Image
जळगाव जामोद येथील रोजगार मेळाव्यात १२ उमेदवारांना मेळाव्यातच ऑफर लेटर बुलडाणा, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा मॉडेल करिअर सेंटर आणि जळगाव जामोद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आज दि. 24 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. यात १२ उमेदवारांना मेळाव्यातच ऑफर लेटर देण्यात आले.  सदर मेळाव्यासाठी 1 हजार 959 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील 856 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. सदर मेळाव्यात 635 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.  आमदार डॉ. संजय कुटे यांनी दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. महाले, श्री. काळे, श्री. भावले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, स्वीय सहाय्यक वसंत पालवे उपस्थित होते. आमदार डॉ. कुटे यांनी, कौशल्य, मेहनत करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. युवकांनी सुरवात...

DIO BULDANA NEWS 23.02.2023

Image
  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा बुलडाणा ,   दि.   23 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे सकाळी 8.40 वाजता खामगाव येथील सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर ते सकाळी 9.15 वाजता सतीश जळगावकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. भेटीनंतर सकाळी 9.45 वाजता सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  हेलि पॅडवरून नांदेडकडे प्रयाण करतील. 000000 जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा यांना अभिवादन बुलडाणा, दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तहसीलदार श्यामला खोत यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिला पाल, नाझर संजय वानखडे, गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000

DIO BULDANA NEWS 22.02.2023

Image
  मार्चमध्ये डाक पेंशन अदालतीचे आयोजन बुलडाणा ,   दि.   22 :  टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत दि. 16 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल येथे आयोजित केली आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, टपाल विभागातून निवृत्त झालेले, सेवेत असताना मुत्यू झाले आहे,  टपाल विभागात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृतीवेतनधारकांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणाचा डाक पेंशन अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे. पेंशन अदालतीमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्दांसह प्रकरणे, वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन टीबीओपी, एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणाचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी दिलेल्या पत्रामध्ये आपल्या अर्जाचे तीन प्रती लेखा अधिकारी, सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुबई 400 001 येथे पाठवावेत, असे ...

DIO BULDANA NEWS 21.02.2023

  जळगाव जामोद येथे शुक्रवारी रोजगार मेळावा * उमेदवारांना 1000 जागांवर नोकरीची संधी बुलडाणा, दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जळगाव जामोद येथे शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद येथे घेण्यात येईल. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 16 पेक्षा अधिक उद्योजकांनी 1 हजारपेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात इंडोरामा, महिंद्रा, हिताची यासारख्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एल ॲण्ड टी, रेमंड, इंड्युरंस सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ...

DIO BULDANA NEWS 20.02.2023

Image
  दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर जमावबंदी आदेश *जिल्हाधिकाऱ्यांनी केले कलम 144 लागू बुलडाणा, दि. 20 : यावर्षीच्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुयोग्य वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासोबतच आता जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 ते दि. 21 मार्च 2023 आणि दहावीची परीक्षा दि. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परिक्षांच्या कालावधीत परिक्षामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. दरम्यान सदर परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना, तसेच परिक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हादंडाधिकारी म्हणून प्राप्त अधिका...

DIO BULDANA NEWS 19.02.2023

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन बुलडाणा, दि. १९ : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी अभिवादन केले.  निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, तहसीलदार श्यामला खोत, नायब तहसीलदार संजय बंगाळे, नाझर गजानन मोतेकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्यामला खोत यांनी राजमाता माॅ जिजाऊ यांच्यावरील स्वरचित कविता सादर केली. 000000

DIO NEWS 17-02-2023

Image
केंद्रीय योजनाचा लाभ सर्वसामान्यांना द्यावा -खासदार प्रतापराव जाधव बुलडाणा, दि. १७ : सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सकारात्मक राहावे, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी आमदार संजय रायमूलकर, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपवन संरक्षक अक्षय गजभिये, जालिंदर बुधावत आदी उपस्थित होते. जिल्ह्यात जिगाव प्रकल्प होत आहे. यामुळे पुनर्वसनाची कामे योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. यात घरासाठी जमिन देताना ती योग्य असावी याची दक्षता घ्यावी. याठिकाणी पाणी आणि विजेची सुविधा देण्यात यावी. आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करून आवास योजनेची घरे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. राष्ट्रीय महामार्गाची कामे करताना रस्ता आणि इतर कामे पूर्ण झाल्याशिवाय पूर्णत्वाचा दाखला देऊ न...

DIO BULDANA NEWS 16.02.2023

Image
  रोजगारक्षम अभ्यासक्रमाची निर्मिती व्हावी -जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड *उदयनगर येथे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन बुलडाणा, दि. 16 : उद्योजकांकडून कुशल मनुष्यबळाची मागणी होत असते. मात्र त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे कालानुरूप रोजगारक्षम अभ्यासक्रमाची निर्मिती होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे उदयनगर, ता. चिखली येथील दयासागर महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार श्वेता महाले, तहसिलदार अजित येळे, प्राचार्य एस. डी. गंगावणे, श्री. खुळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, शिक्षण पुर्ण करून प्रत्येकालाच शासकीय नोकरी प्राप्त होण शक्य नाही. त्यामुळे खासगी कंपनीमध्ये रोजगार किंवा स्वत:चा उद्योग हे पर्यायही युवकांसमोर आहे. अनुभव घेण्यासाठी युवकांना संधी मिळावी, यासाठी रोजगार मेळावे घेण्यात येत आहे. उदयनगर...