Wednesday 14 July 2021

DIO BULDANA NEWS 14.7.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2713 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 16 पॉझिटिव्ह

  • 19 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2729 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2713 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 8 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 606 तर रॅपिड टेस्टमधील 2107 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2713 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : लोणार तालुका : टिटवी 2, बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : हतेडी 1,  शेगांव शहर : 3, शेगांव तालुका : लासुरा 1, खामगांव शहर : 1, दे. राजा तालुका : नागणगांव 2, सरंबा 1, मेहकर शहर : 1, चिखली तालुका : मनुबाई 2, धंदरवाडी 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 16 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 607578 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86452 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86452 आहे.

  आज रोजी 1622 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 607578 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87155 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86452 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 37 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 666 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

****

कृषी योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे ई सेवा केंद्रावर सादर करावी

  • 21 जुलै अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2020-21 अंतर्गत पहिली सोडत 8 एप्रिल 2021 रोजी निघाली. यामध्ये एकूण 1333 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार सर्व लाभार्थ्यांच्या याद्या पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर लावून प्रत्येक लाभार्थ्याला आवश्यक असणारी कागदपत्रे कळवून ऑनलाईन अपलोड करण्याकरीता अवगत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही 616 लाभार्थ्यांनी 7/12, नमुना 8 अ, उत्पन्नाचा दाखला, यापूर्वी कोणत्याच योजनेमधून विहीरीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, आधार संलग्न बँक खाते, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, सामुहिक जमीनधारक असल्यास कर्ता बाबत प्रतिज्ञालेख अपलोड केलेली नाहीत. तरी निवड झालेल्या लाभार्यिांनी त्वरित आवश्यक असणारी कागदपत्रे ई- सेवा केंद्रावर जावून 21 जुलै 2021 पर्यंत अपलोड करावीत.

सदर योजनेकरीता कालावधी कमी असल्यामुळे आपली निवड रद्द झाल्ज्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच काही शंका किंवा अडचण आल्यास सविस्तर माहितीसाठी पंचायत समितीच्या कृषि अधिकारी यांचेशी मार्गदर्शनासाठी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

*****

                       अटी व शर्तींच्या अधीन राहून वनपर्यटनास परवानगी

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : राज्यात कोविड 19 च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरीएंटचा धोका वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 26 जुनच्या आदेशाप्रमाणे 28 जुन 2021 चे सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात श्रेणी 3 मध्ये असलेले निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सर्व वनपर्यटन केंद्र सुरू करण्यास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रीय संरक्षीत स्मारके, स्थळे व संग्रहालये ही कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या मानक प्रणाली चे नुसार विहीत अटी व शर्तीनुसार अभ्यांगताकरीता उघडण्यात येत आहे.

    शासनाने कोविडच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर, सॅनीटायझर व सोशल डिस्टसिंग नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. बंदीस्त प्राण्यायंच्या ठिकाणी पर्यटक यांना जाण्यास प्रतिबंध असेल. वाहनांमुळे बफर परिक्षेत्रात रस्ते खराब होणार नाहीत व संरक्षणावर विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. पर्यटकांची थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक असणार आहे. पर्यटकाला प्रवेश देतेवेळी पायाने ऑपरेट होणारे सॅनीटायझर मशीन किंवा संपर्कहीन हँड सॅनीटायझर मशीन वापरणे बंधनकारक आहे. या ठिकाणी वन विश्रामगृह, निसर्ग पर्यटन संकुल, उपहार गृह, होम स्टे व इतर उपक्रम आदी कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा अवलंब करून सुरू करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असून सायं 5 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे उपरोक्त नमूद बाबी सकाळी 7 ते दु 4 या कालावधीत सुरू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधत्मक कायदा, भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील कलमान्वये शिक्षेस पात्र असेल, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आदेशीत केले आहे.

*****

 

 

 

लिंग विनिश्चीत केलेल्य वीर्य मात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई- म्हशींच्या कृत्रिम रेतनात वापर होणार

  • राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना, वीर्य मात्रा वाटप करण्यास मान्यता प्रदान
  • शेतकरी, पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : जिल्ह्याकरीता केंद्र शासनाने केंद्र सहाय्यित योजना (60:40) राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत लिंग विनिश्चीत केलेल्या वीर्य मात्रांचा (Sex Sorted Semen) क्षेत्रिय स्तरावर गाई- म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमाअंतर्गत

वापर करणे साठी प्रशासकिय मान्यता प्रदान केलेली आहे.  त्यानुसार राज्य शासनाने राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राज्याच्या पशुपैदास धोरणानुसार राज्यातील गाई- म्हशींमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार विर्य मात्रा देण्यात येणार आहे.  सन 2021-22 पासुन पुढील पाच वर्षाच्या कालावधी करीता 575 रूपये प्रति लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्रा या प्रमाणे एकुण 11000 लक्ष लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्राची (Sex Sorted Semen) वाटप करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे.

   तरी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी अथवा पशुपालकांनी आपल्या गाई- म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करण्याकरीता लिंग विनिश्चिीत केलेल्या विर्य मात्राचा वापर करावा. त्या करीता 81 रूपये कृत्रिम रेतनापेटी दर आकारणी केलेली आहे. तरी जिल्हयातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.

*********

            गायी म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम

  • कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासरांना 25000 रुपये अनुदान

बुलडाणा,(जिमाका) दि.14 :  सन 2021-22बुलडाणा जिल्हयात राज्यातील गायी म्हशीची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2015 च्या सेवा हमी कायदयामध्ये समाविष्ठ करण्यात आलेली आहे. तरी सन 2021-22 या वर्षासाठी या योजनेमध्ये पशुपालकांनी सहभाग घेवुन आपल्या दुधाळ जनावरांची नोंद नजिकच्या पशुवैदयकिय संस्थेस पुरविण्यात आलेल्या विहित नमुण्यात भरुन त्यांच्यामार्फत पशुसंवर्धन कार्यालयास त्वरीत सादर करावे.

     नोंद झालेल्या दुधाळ जनावरांच्या पशुपालकाने एक एसएमएस केल्यास त्यांच्या दुधाळ जनावरांना लगेच नजिकच्या पशुवैदयकीय दवाखन्या मार्फत दुधाळ जनावराचे कृत्रिम रेतन केल्या जाते. कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रूपयाचे व नर वासराना 25000 रुपये अनुदान देण्यात येते. तरी या योजने मध्ये समाविष्ठ होण्यासाठी अर्ज पशुवैद्यकिय दवाखान्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यलयास दिनांक 31 जुलै 2021 पर्यंत देण्यात यावे.

    तरी जिल्हयातील सर्व पशुपालकांनी आपल्या दुधाळ जनावरांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.  ही योजना पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येते. या योजनेसाठी " गाय वाचवा व वंशावळ वाढवा व  स्वस्थ पशु खुशहाल किसान, उत्पादक पशु संपन्न किसान "असे बोधवाक्य नेमले आहे. तरी जिल्हयातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.

******

--

No comments:

Post a Comment