Friday 16 July 2021

DIO BULDANA NEWS 16.7.2021

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 1920 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह

  • 14 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1942 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1920 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 10 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 707 तर रॅपिड टेस्टमधील 1213 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1920 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : मंडपगांव  1, वाकी खु 1, दे. मही 1, चिंचखेड 1, दे. राजा शहर : 1, मेहकर तालुका : जानेफळ 1, शेगांव शहर : 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : पिं. काळे 2, आसलगांव 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : बेराळा 3, शेलूद 1, मेरा बु 1, सवडत 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 14 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 611900 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86484 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86484 आहे.

  आज रोजी 1830 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 611900 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87190 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86484 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 40 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 666 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

****


योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून सर्वांगिण विकास साधावा

- खासदार प्रतापराव जाधव

दिशा समिती बैठक

* आदर्श सांसद ग्राम योजनेतून गावांचा विकास करा

* महानेट, भारत नेट प्रकल्प पुर्ण केलेल्या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींना नेट कनेक्टीव्हीटी द्या

* जिगांव प्रकल्पातील पुनर्वसन दर्जेदार करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : केंद्र व राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, नागरिकांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास साधावा,  अशा सूचना केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जि.प सभापती राजेंद्र पळसकर आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात समितीचे अशासकीय सदस्य, लोक प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

   सांसद आदर्श ग्राम योजनेत निवडलेल्या गावांमध्ये विविध योजनांच्या समन्वयातून विकास कामे करण्याच्या सूचना करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, घाटबोरी, घाटपुरी, शेलूद, धानोरा व पिंप्री गवळी ही गावे सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेली आहे. या गावांमध्ये नाविण्यपूर्ण कामे करण्यत यावीत. ग्रामसचिवालय इमारत, ग्रा.पं कार्यालय व शाळेवर सौर उर्जा संयंत्र लावणे, पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर आणणे, अंगणवाडी बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व भूमिगत गटार योजना कामे या गावांमध्ये करण्यात यावीत. त्यासाठी विविध विभागांनी त्यांच्याकडील कामे करताना या गावांमध्ये प्राधान्याने कामे घ्यावीत. या गावांमधील शाळा आयएसओ करून गावात वाचनालये, अभ्यासिका देण्यात याव्यात.   

    ते पुढे म्हणाले, म्हाडा अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलामध्ये लाभार्थ्यांची निवड नगर पालिका व म्हाडाने संयुक्तपणे करावी. त्यापूर्वी नगर पालिका क्षेत्रात लाभार्थी सर्वेक्षण करून नगर पालिकेकडून संभाव्य लाभार्थ्यांची यादी घ्यावी. एकात्मिक गृहनिर्माण योजनेतंर्गत जिल्ह्यात घरकुले बांधण्यात आली आहेत. मात्र ही घरकुले खऱ्या लाभार्थ्यांना मिळाली की नाही, त्याची पडताळणी करून कारवाई करावी. बोगस लाभार्थी राहत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. रस्ता निर्मिती करताना कुठलीही तडजोड करण्यात येवू नये. डिपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) मध्ये चेंज ऑफ स्कोप नुसार बदल करून समाज हिताची कामे घ्यावीत. जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्पयातील 22 गावांचे पुनर्वसन करायचे आहे. या गावांमध्ये पुनर्वसनाची कामे दर्जेदार व्हावीत. अंदाजपत्रकानुसार कामे करावीत, कामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जावे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून लागणा-या निधीसाठी प्रस्ताव सादर करावा.   

    गौण खनिजमधून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ती करण्याच्या सूचना करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, रेती घाटांची सुरक्षीतता महत्वाची आहे. रेती घाटांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रेतीघाट सुरक्षीत करावे. या घाटांचे दर 15 दिवसांनी मोजमाप करून अहवाल घ्यावा. भारत नेट, महानेट प्रकल्पातंर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मलकापूर, नांदुरा, बुलडाणा व चिखली या 4 तालुक्यांमध्ये कामे पूर्ण करण्यात आली आहे. मात्र संबंधीत विभागाने कामे हस्तांतरीत करताना ती पूर्ण झाली की नाही, याची चाचपणी करावी. यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीला नेट कनेक्टीव्हीटी देण्यात यावी. त्यानंतर ग्रामस्थांचे ऑनलाईन कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये काढून द्यावीत.

  जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यात आले. मात्र त्यापैकी 108 अंगणवाडी बांधकाम अपूर्ण आहेत. ती कामे शासनाची मंजूरात घेवून प्राधान्याने पूर्ण करावी. अंगणवाडीच्या माध्यमातून देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा तपासावा. सँपल नुसार पोषण आहार देण्यात येतो की नाही, नियमानुसार     पोषण आहाराचे वजन आहे किंवा नाही याची संबंधित विभागाने तपासणी करावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. शाळांना मानव विकास मिशनमधून साहित्य वाटप करण्यात आले आहे. या साहित्याचा दर्जा तपासावा. साहित्य निकृष्ट असल्यास संबंधीत पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशही खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले.  यावेळी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी योजनेची माहिती दिली. बैठकीला पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

*****

 

अवैधरित्या गर्भपात औषधे विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : मे. मनिष मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स, जांभरुण रोड, मुठठे लेआउट, बुलडाणा या ठिकाणी 12 जुलै रोजी अवैधरित्या गर्भपातासाठी वापर होत असलेल्या एमटीपी किट अवैध रित्या खरेदी करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली. सदर माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून गर्भपातासाठी लागणारी (Gestapro Kit) हे औषध बनावट ग्राहकाला विक्री केल्याचे आढळल्याने मे मनिष मेडीकल अन्ड जनरल स्टोअर्स, मुठ्ठे लेआउट , जांभरुण रोड, बुलडाणा व सदर दुकानात उपस्थीत अन्य एक व्यक्ती यांचेकडुन एकुण 5 किट जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सदर दोन्ही आरोपीविरुध्द शहर पोलीस स्टेशन बुलडाणा येथे प्रथम खबर अहवाल नोंदविला आहे.

 पुढील तपास पोलीस स्टेशन बुलडाणाहे करीत आहे. सदर कारवाई सह आयुक्त (ओषधे ) अमरावती विभाग यु बी. घरोटे यांचे मार्गदर्शनाखाली श्री बर्डे, सहायक आयुक्त, (औषधे ) व गजानन प्र. धिरके, औषध निरीक्षक यांनी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन यांनी इशारा दिला की, अवैधरित्या गर्भपाताची औषधे खरेदी अथवा विक्री करतांना कुणी आढळल्यास औषधे व सौदर्य प्रसाधने कायदयानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. स्त्री भूण हत्या हे समाजविघातक कार्य आहे. तरी जनतेनी आवश्यकता असल्यास डॉक्टरांच्या प्रिक्रीप्शनवर व डॉक्टरांच्या सल्याने सदर औषधीचा वापर करावा, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

*****

 

No comments:

Post a Comment