Tuesday 6 July 2021

DIO BULDANA NEWS 6.7.2021

 भूजल विभाग व एन एस एस यांचे संयुक्त विद्यमाने 

जलसाक्षरता अभियानांतर्गत ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात
 बुलडाणा, (जिमाका) दि. 6: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, बुलडाणा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जलसाक्षरता अभियानांतर्गत ऑनलाईन कार्यशाळा दिनाक 05 जुलै 2021 रोजी उत्साहात पार पडली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक, डॉ.राजेश बुरंगे, अमरावती विदयापिठ यांनी जलसाक्षरता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे डॉ. दीपक नागरीक, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, बुलडाणा यांनी स्वयंसेवकांना पाण्याचे महत्व व आपली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, बुलडाणा या कार्यालयाचे वतीने भूजल पुनर्भरण, भूजल अधिनियम 2009, ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद व जलसाक्षरता लोकसहभागीय चळवळ परिसंवाद तथा कार्यशाळा व चर्चासत्राचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातुन ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद,  छतावरील पाऊस पाणी संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग ) अधिक प्रमाणात करण्यात यावे, यासाठी उदबोधन करण्यात आले.
 कार्यशाळेत श्रीमती. एस.जी.बैनाडे, कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी जिल्हयाची भूपृष्ठीय व भूशास्त्रीय माहिती सादरीकरणाव्दारे सांगीतली व एस.एन. डव्हळे, कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी लोकसहभागातुन ग्रामस्तरीय पाण्याचा ताळेबंद या विषयावर सादरीकरण केले. व्ही.जे.वालदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, बुलडाणा यांनी भूजल अधिनियम 2009 याबाबत सादरीकरण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.  तसेच उपस्थितांच्या शंकांचे निराकरण केले. कार्यशाळेत, बुलडाणा जिल्हयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक तसेच कार्यक्रम अधिकारी यांच्या उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. या वेबिनारला 400 पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमास उपसंचालक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती विभाग, अमरावती यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले. 
*****
*कोरोना अलर्ट : प्राप्त 2571 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 23 पॉझिटिव्ह*
13 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2594 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2571 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 6 व रॅपीड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून  468 तर रॅपिड टेस्टमधील 2103 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2571 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  जळगांव जामोद तालुका : उटी 1, आसलगाव 1, मडाखेड खू 1,  शेगांव तालुका : गौलखेड 1, चिखली शहर :2,  चिखली तालुका : बेराळा 11, उन्द्री 1, कटोडा 1, मेहकर शहर :1, संग्रामपूर तालुका: सोनाळा पिंपरी 1, दे. राजा तालुका : दे. मही 1, मलकापूर शहर :1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 23 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान स्त्री रुग्णालय येथे बजरंग नगर, बुलडाणा येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 
      तसेच आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.  
   तसेच आजपर्यंत 588046 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86164 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86164 आहे. 
  आज रोजी 1147 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 588046 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86993 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86164 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 165 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 664 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment