Thursday 3 June 2021

DIO BULDANA NEWS 3.6.2021

 नोंदणीकृत घरेलू कामगारांना मिळणार 1500 रूपये आर्थिक मदत

·        कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करावी

 बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : राज्यात कोविड -19 संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णाची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी गेल्या एप्रिल पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे रोजगार बंद पडले आहे. या पार्श्वभुमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी 1500 रुपये मदतीचा आधार मिळणार आहे.  ही रक्कम  थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

     महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्गत 2011 ते 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता आवश्यक सर्व कागदपत्र, मोबाईल क्र. स्वयंसांक्षकित करुन कार्यालयाच्या  gharelu buldhana@gmail.com या ईमेल आयडीवर अर्ज सादर करावा. जेणेकरुन कुठलाही नोंदीत घरेलू कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी. नोंदणीकृत घरेलू कामगारांचे आवश्यक कागदपत्रे बँकेचे पासबुक, नोंदणीकृत नुतणीकरणाची पावती, आधारकार्ड, राशनकार्ड इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे, तरी नोंदणीकृत घरेलू कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन  सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

0000000

 खत बचतीसाठी कृषि विभागाची विशेष मोहिम

·        शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा कळण्यासाठी कृषिक मोबाईल ॲप

 बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : कृषि विज्ञान केंद्रबारामती व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळवण्यासाठी कृषिक या मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. यामधील गणकयंत्राचा वापर करून शेतकरी बांधव शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा मिळवू शकता. त्यासाठी या ॲपचा वापर शेतकऱ्यांनी करावा. खत बचतीसाठी कृषि विभागाने विशेष मोहिम सुरू केली आहे.

   शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांचा कमीत-कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने  उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकांसाठी अचूक व फायदेशीर खत मात्रा निवडणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन जमिनीची सुपिकता वाढीस लागून अधिक उत्पन्न  हाती येईल. तसेच अचूक खत मात्रा मिळविण्यासाठी फार क्लिस्ट गणिती सुत्रांचा वापर करावा लागतो. यासाठी शेतकरी मित्रांना खत मात्रा अगदी सहज सुलभ पध्दतीने कशा मिळविता येतील हे लक्षात घेऊन कृषिक-खत गणकयंत्र विकसीत करण्यात आलेले आहे.

'कृषिकॲप खत गणकयंत्रामधील वैशिष्टये

 संबंधित कृषि विद्यापीठाच्या पिकनिहाय खत शिफारशींचा समावेश,जमिन आरोग्य पत्रिका आधारीत विविध पिकांसाठी शिफारस केलेली खतमात्रा, बाजारातील किंमतीनुसार प्रति एकर आवश्यक खत मात्रांच्या खर्चाची गणना, पिकांसाठी शिफारस केलेल्या खतमात्रेचे नत्रस्फुरद व पालाश वापरासाठी विविध खतांचे पर्याय, शिफारस केलेल्या खतांच्या विभाजीत (स्प्लीट) मात्रांची गणना, सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय उपलब्ध, गावनिहाय जमिन सुपिकता निर्देशांकानुसार खतमात्रांची परिगणना, तसेच आपण कृषिक गणकयंत्राच्या माध्यमातून संबंधित कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा परिगणीत करण्यासाठी या मोबाईल अॅपचा आवश्यक वापर करावा, त्याप्रमाणे खतांचा फायदेशीर पर्याय (संयोजन) निवडा आणि भरघोस उत्पन्न मिळवा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या अँड्रॉईड मोबाईल फोन मधील गुगल प्ले-स्टोअर मध्ये 'Krushik/ कृषिक' सर्च करुन अथवा खालील QR कोड स्कॅन करुन  प्रथम 'कृषिक' ॲप डाऊनलोड करावे असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000000

कटला, रोहू, मृगळ माशांचा जुलैपासून प्रजनन हंगाम सुरू होणार

·        मत्स्यकास्तकार, शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी करावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : सन 2021 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा प्रजनन हंगाम जुलै 2021 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे प्रस्तावित आहे.  

   जिल्ह्यातील मत्स्यकास्तकार, शेततळी लाभधारक शेतकरी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांनी त्यांचे तलाव / शेततळ्यामध्ये संचयन करण्यासाठी मत्स्यजीरे, अर्धबोटुकली, मत्स्यबोटकली, मत्स्यबीजाची मागणी लेखी स्वरूपात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा यांचेकडे नोंदवावी. तसेच कार्यालयाच्या 07262-242254 क्रमांकावर संपर्क साधून मत्स्यजिरे पुरवठ्याबाबतची माहिती घेवून पुरवठ्याबाबत वेळ व दिनांक घेण्यात यावा. मत्स्यबीज मागणी नोंदविण्यासाठी इच्छूकांनी सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी यांच्या 9029515539, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नि.मा साळुंके यांच्या 9860809711, इ. तू देवकत्ते यांच्या 8856929431 क्रमांकावरही संपर्क साधून माहिती घेवू शकतात.

  तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत ज्या लाभार्थ्यांना पोर्टेबल हॅचरी व नविन मत्स्यसंवर्धन तळी योजनेतंर्गत  शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे. त्यांनी शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार मस्त्यजीरे, मत्स्यबीज, मत्स्यबोटुकली उत्पादन घेणे अनिवार्य आहे.

   मच्छिमार संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक लाभधारक शेतकरी यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज केंद्रामधून मत्स्यबीज खरेदी करणे बंधनकारक व अनिवार्य आहे. तसेच मत्स्यजीरे खरेदी केलेली पावती मत्स्यबीज खरेदी करणाऱ्यांकडे असणे बंधनकारक आणि अनिवार्य आहे. बाहेरच्या जिल्हा, राज्यात मत्स्यबीज खरेदी करण्यासाठी जिल्हा कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक व बंधनकारक आहे. विनापरवानगी मत्स्यबीज खरेदी केल्याचे आढळून आल्यानंतर शासन धोरणानुसार कारवाई होईल. तसेच मत्स्यबीज संचयन पंचनामे करणे बंधनकारक आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध कार्यालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार मत्स्यबीज / मत्स्यबोटुकली संचयन करताना पंचनामे, फोटो, चल चित्रफीत तयार करणे आवश्यक आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ देते वेळेस अडचण निर्माण झाल्यास किंवा अपात्र ठरल्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.  अपेक्षीत मत्स्यबीज, मत्स्यबोटुकली संचयन तलाव / जलाशयात झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रादेशिक उपआयुक्त अमरावती कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार तलाव किंवा जलाशयाचा ठेका रद्द करण्याची कार्यवाही होवून संस्थेचे सहा वर्षाचे कालावधीकरीता शासन धोरणानुसार काळ्या यादीत टाकण्यात येईल. तरी सर्व मच्छीमार संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक मत्स्यकास्तकार यांनी इष्टतम मस्त्यबीज संयचन आणि अपेक्षीत मस्त्योत्पादन घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असे आहेत मत्स्यबीजाचे प्रकार व दर

बिजाचा प्रकार : मत्स्यजीरे, आकार 7 ते 12 मि.मी, दर 1500 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 200 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 300 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 600 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : इयरलिंग, आकार 50 ग्रॅम वरील, दर 5 रूपये प्रति नग. तसेच पॅकिंग खर्च 15 रूपये प्रति डबा अथवा बॅगप्रमाणे आहे.

*********

शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्काराकरीता नाव नोंदणी करावी

·        शिक्षणाधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधीक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 जुन 2021 पासून MHRD (www.mhrd.gov.in)  या संकेतस्थळावरील https://nationala wardstoteachers.education.gov.in / newuser.aspx या लिंकवर नाव नोंदणी सुरू झाली आहे. तरी इच्छूक शिक्षकांनी सदर लिंकवर 20 जुन 2021 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सचिन जगताप,  प्राथमिक  शिक्षणाधिकारी, जि.प बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

*******

कोरोना अलर्ट : प्राप्त 3941 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 151 पॉझिटिव्ह

  • 299 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4092 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3941 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 151 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 98 व रॅपीड टेस्टमधील 53 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 493 तर रॅपिड टेस्टमधील 3448 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3941 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 19, बुलडाणा तालुका : साखळी खु 1, येळगांव 1, पांगरी 1,  दहीद बु 1, रायपूर 1, चांडोळ 2, पाडळी 2, जामठी 1, चौथा 1, जांभरून 3, सागवन 1, कोलवड 1, मासरूळ 1,धाड 2,   मोताळा तालुका : परडा 2, कोथळी 1,  खडकी 2, सिंदखेड 1, कोल्ही गवळी 1,   खामगांव शहर :6,  खामगांव तालुका : राहुड 1, बोरी 1, किन्ही महादेव 1, बोरजवळा 1, लाखनवाडा 1,     चिखली शहर :1,  चिखली तालुका : केळवद 1, भोरसा भोरसी 1,   कोलारी 1, सावरखेड 1,  दे. राजा शहर : 8, दे. राजा तालुका : बोराखेडी 1, पांगरी 1, कुंभारी 1, उंबरखेड 1, सिनगांव जहा 2, खल्याळ गव्हाण 1, मंडपगांव 1, डोढ्रा 3, गारखेड 2, दे. मही 2, सातेफळ 1, जांभोरा 2, पळसखेड 1,      

       सिं. राजा शहर :3,   सिं. राजा तालुका : आडगांव राजा 1, पि. लेंडी 2, शेलगांव 1, पिंपरखेड 1, साठेगांव 1,    मेहकर शहर :3, मेहकर तालुका : उटी 1, बालखेड 1, बोरी 1, बऱ्हाई 2, डोणगांव 1, सावंगी वीर 1, मातला 1, कारंजा 1, पेनटाकळी 2,  भोसा 1,   जळगाव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका :     नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका :  घाणेगांव 3, पिंपळखुटा धांडे 1, भोटा 1, तांदुळवाडी 2,   लोणार शहर :  लोणार तालुका : दे. कोळ 1, शिंदी 1, डोंगरगांव 2, वेणी 1,  किन्ही 1, सोनोशी 1, चिखला 1, शारा 10, कसारी 2, सोमठाणा 1,  परजिल्हा    उबाळखेड ता. तेल्हारा 1, अकोला 1, वाकद ता. रिसोड 1,  जालना 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 151 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान गनुवाडी जि. अमरावती येथील 40 वर्षीय पुरूष, लाखनवाडा ता. खामगांव येथील 68 वर्षीय महिला, कोल्ही गवळी ता. मोताळा येथील 62 वर्षीय महिला, आडविहीर ता. मोताळा येथील 65 वर्षीय पुरूष, हतेडी ता. बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरूष, उबाळखेड ता. तेल्हारा जि. अकोला येथील 62 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 299 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 492659 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 83295 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  83295 आहे. 

  आज रोजी 1096 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 492651 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85232 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 83295 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1315 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 622 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

No comments:

Post a Comment