Monday 7 June 2021

DIO BULDANA NEWS 7.6.2021

 

                     कोरोना अलर्ट : प्राप्त 2119 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 89 पॉझिटिव्ह

  • 193 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2208 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2119 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 676 तर रॅपिड टेस्टमधील 1443 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2119 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :4, बुलडाणा तालुका : साखळी 2, सव 1, कोलवड 3, मासरूळ 1, दहीद खु 1, चांडोळ 1, सुंदरखेड 1,   मोताळा तालुका : तालखेड 2, कोथळी 1,    खामगांव शहर :1,  खामगांव तालुका : पळशी बु 1,  घाटपुरी 1,    शेगांव शहर : 4, शेगांव तालुका : शिरसगांव निळे 1, जानोरी 1,  दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका :2, टाकरखेड भा 4, बायगांव 2, दे. मही 2, अंभोरा 1, काळेगांव 1, तुळजापूर 1,     चिखली शहर : 2,  चिखली तालुका : खोर 1, शेलगांव 1, माळशेंबा 1, खैरव 1,   संग्रामपूर तालुका : पलसोडा 1, धामणगांव 1, निवाणा 1, उमरा 1, बावनबीर 1, सगोडा 2, वसाडी 1,     

    सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, नसिराबाद 1, पिंपरखेड 1, सावखेड तेजन 1,     मेहकर शहर :1 , मेहकर तालुका : जानेफळ 4, बरटाळा 1, बऱ्हाई 1, अंत्री देशमुख 2, चायगांव 1,    जळगाव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : जामोद 1,  नांदुरा शहर : 5, नांदुरा तालुका :  जिगांव 1, दादगांव 1, टाकरखेड 1, अंबोडा 1,      लोणार शहर :1,   लोणार तालुका : गुजखेड 1, सावरगांव मुंढे 1, शिंदी 1, किनगाव जट्टू 1,       परजिल्हा अंदूरा ता. बाळापूर 1, दहीहांडा जि अकोला 1,तेल्हारा 1, केनवड ता. मालेगांव 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 80 वर्षीय पुरूष व काटोडा ता. चिखली येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 193 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 506539 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84113 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  84113 आहे. 

  आज रोजी 942 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 506539 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85619 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84113 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 865 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 633 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

                               दिव्यांग तपासणी शिबिर नियमित सुरू राहणार

बुलडाणा,(जिमाका) दि.7 : जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे महिन्यातील प्रत्येक बुधवारी दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे माहे मार्च 2021 पासून दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज रद्द करण्यात आले होते. तरी यापुढे जिल्हा रूग्णालय येथील दिव्यांग तपासणी शिबिर दिनांक 9 जुन पासून महिन्यातील प्रत्येक बुधवारी कोविड 19 नियमांच्या अधीन राहून नियमितपणे सुरू करण्यात येत आहे. सदर बोर्डामध्ये 50 दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

*********

नोंदणीकृत घरेलू कामगारांनी कागदपत्रे सादर करावी

·         सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : राज्यात कोविड -19 संसर्ग पार्श्वभुमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी 1500 रुपये मदतीचा आधार मिळणार आहे.  ही रक्कम  थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्गत 2011 ते 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता बँकेचे पासबुक, नोंदणीकृत नुतणीकरणाची पावती, आधारकार्ड, राशनकार्ड आवश्यक सर्व कागदपत्र, मोबाईल क्र. स्वयंसांक्षकित करुन कार्यालयाच्या  gharelu buldhana@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावी.  जेणेकरुन कुठलाही नोंदीत घरेलू कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन  सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                            **********

 

No comments:

Post a Comment