Wednesday 23 June 2021

DIO BULDANA NEWS 23.6.2021

 

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 अर्ज आमंत्रित

बुलडाणा, (जिमाका) दि. 23: केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन

2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव दि. 30 जुन 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे दोन प्रतीत कायार्लयीन वेळेत सादर करावे एक प्रत dsob ld@gmail.com या मेल वर पाठवावी. सदर पुरस्कारासाठी नामांकणाचे प्रस्ताव सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी 2018, 2019,2020 तीन वर्षामधील उत्कृट कामगिरी असावी, साहसी उपक्रम हे जमिन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ठ असणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती दोन ते तिन पानामध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तावासोबत सादर करावी.

तसेच जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 करीता नामांकनाचे प्रस्तावा सोबत आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे इत्यादी सोबत जोडणे आवश्यक राहील असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

********

पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक योजनेचे फळपिकांना ' विमा कवच '

पुढील तीन वर्षासाठी योजनेस मान्यता
बुलडाणा, (जिमाका) दि. 23: प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना वर्ष 2021-22 करिता जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही योजना 2022-23 व 2023-24 या वर्षांसाठी मृग बहारमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, सिताफळ, द्राक्ष, लिंबू व चिकू या आठ फळपिकांसाठी मिळणार आहे. तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, आंबा, केळी आणि द्राक्ष या फळपिकांकरीता लागू करण्यास 18 जुन 2021 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्ट्रॉबेरी व पपई या फळपिकांकरिता प्रायोगिक तत्त्वावर योजनेचे विमा कवच मिळणार आहे. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता, अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.

अधिसुचित क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. ही योजना या वर्षापासून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकासाठी ऐच्छीक आहे. या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसुचीत फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. तसेच अधिसुचीत फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ राहणार आहे. या योजने अंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून 35 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50 : 50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.

बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीककर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपिकनिहाय आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था / बँक/ आपले सरकार सेवा केंद्र / विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे अथवा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत मृग व आंबिया बहारासाठी वेगवेगळी आहे. मृग बहारासाठी संत्रा, पेरू, लिंबू या फळ पिकांकरिता 2021 मध्ये 30 जुन व 2022, 2023 करीता 14 जून, चिकू व मोसंबी फळपिकासाठी 30 जुन, तर डाळींब पिकाकरिता 14 जुलै, सिताफळ पिकासाठी 31 जुलै राहणार आहे.

तसेच आंबिया बहारासाठी द्राक्ष फळपिकासाठी 15 ऑक्टोंबर, मोसंबी व केळी 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, आंबा 31 डिसेंबर, डाळिंब फळ पिकाकरिता 14 जानेवारी 2022 अंतिम मुदत असणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

विमा संरक्षीत रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता

संत्रा : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 80 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग बाहारासाठी 4800 रूपये, आंबियासाठी 11600 रुपये, मोसंबी : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 80 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग व आंबिया करिता 4000 रूपये, पेरु : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 60 हजार व भरावयाचा विमा हप्ता 3000 रूपये, डाळींब : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 30 हजार व भरावयाचा विमा हप्ता 6500 रूपये, आंबिया साठी 20800 रुपये, लिंबू : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 70 हजार व भरावयाचा विमा हप्ता 3850 रूपये, केळी : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 40 हजार व भरावयाचा विमा हप्ता आंबिया साठी 7000 रूपये, द्राक्ष : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 3 लक्ष 20 हजार व भरावयाचा विमा हप्ता आंबिया बहार करिता 16000 रूपये, सिताफळ: प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 55 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग बहार करिता 2750 रूपये, चिकू : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 60 हजार व भरावयाचा विमा हप्ता मृग बहार करिता 13200 रूपये, आंबा : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 40 हजार व भरावयाचा विमा हप्ता आंबिया बहार करिता 15400 रूपये,

मृग बहारासाठी समाविष्ट महसूल मंडळ

संत्रा : डोणगाव, हिवरा आश्रम, मेहकर, शेलगांव देशमुख, जानेफळ ता. मेहकर, अंजनी खु, सुलतानपूर ता. लोणार, आडगांव ता. खामगांव, दे.मही, अंढेरा, मेहुणा राजा ता. दे.राजा, बावनबीर, सोनाळा ता. संग्रामपूर, जामोद, जळगाव ता. जळगांव जा. मोसंबी : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदूरर्जन, साखरखेर्डा ता. सिं.राजा, म्हसला बु ता. बुलडाणा, चिखली ता. चिखली, पेरू : साखळी बु ता. बुलडाणा, चिखली, चांधई, हातणी, मेरा खुर्द, एकलारा ता. चिखली, चांदुर बिस्वा, निमगांव ता. नांदुरा, पिं. काळे, जळगांव जामोद, वडशिंगी ता. जळगांव जा, डाळींब : पेठ, चिखली, चांधई, हातणी, कोलारा, अमडापूर, शेळगांव आटोळ ता. चिखली, बुलडाणा व धाड ता. बुलडाणा, शेलापूर बु, पिंप्री गवळी, पिं. देवी, मोताळा, धा. बढे, बोराखेडी ता. मोताळा, हिवरखेड, काळेगांव ता. खामगांव, दे.राजा, दे. मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा ता. दे.राजा, जामोद ता. जळगांव जा, नरवेल व जांबुळधाबा ता. मलकापूर. लिंबू : पि. काळे, जामोद, वडशिंगी ता. जळगांव जा, शेलापूर बु ता. मोताळा, आडगांव व पारखेड ता. खामगांव. सिताफळ : शेळगाव आटोळ, कोलारा, मेरा खू ता. चिखली, जामोद, वडशींगी, आसलगाव ता. जळगाव जामोद, संग्रामपूर तां. संग्रामपूर, वरवंड, जानेफळ, नायगाव दत्तापूर, हिवरा आश्रम ता. मेहकर, हिरडव, टिटवी, सुलतानपूर ता. लोणार, किनगाव राजा, शेंदूर्जन, साखरखेर्डा, सि. राजा ता. सि. राजा.
*******************
कोरोना अलर्ट : प्राप्त 2795 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 73 पॉझिटिव्ह
• 54 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2868 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2795 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 73 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 58 व रॅपीड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 450 तर रॅपिड टेस्टमधील 2345 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2795 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : रस्ताळा 1, दत्तापुर 2, हतेडी 1, सावंगी 1, शिरपूर 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : नायगाव बू 3, पळसखेड 1, नागनगाव 1, पाटोदा 1, धोडप 1, दे. राजा तालुका : भिवगण 7, सरंबा 2, दे. मही 1, मेहुणा राजा 1, सिं. राजा तालुका : सायाळा 1, निमगाव वायाळ 1, खामगांव शहर : 6, खामगाव तालुका : सुटाळा बू 1, टेंभुर्णा 1, दिवठाणा 1, संग्रामपूर तालुका : चौंढी 2, शेगाव शहर : 2, शेगांव तालुका : चिंचखेड 1, भोनगाव 1, जळगांव जामोद तालुका : धानोरा 4, लोणार तालुका : शिवणी पिसा 1, टिटवी 1, सरस्वती 1, रायगाव 1, तांबोळा 1, अंजनी 1, सुलतानपूर 1, मोप 1, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : गणपुर 1, परतापुर 1, मलकापूर शहर :1, मलकापूर तालुका : उमाळी 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 73 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान पिंप्री गवळी ता. मोताळा येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 54 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 554891 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85632 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85632 आहे.
आज रोजी 1538 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 554891 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86406 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85632 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 118 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 656 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment