Wednesday 9 June 2021

DIO BULDANA NEWS 9.6.2021

 भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था, मत्स्यकास्तकार यांनी मत्स्यबोटुकलीची मागणी नोंदवावी

·         मस्त्यव्यवसाय विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : सन 2021 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा प्रजनन हंगाम जुलै 2021 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे प्रस्तावित आहे.  जिल्ह्यातील भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था आणि ज्या संस्थाकडे पाटबंधारे विभागाचे तलाव, जलाशय तसेच जिल्हा परिषद विभागाचे सिंचन, पाझर तलाव मासेमारी ठेक्याने असलेल्या ठेकेदार संस्थांनी त्यांच्या कडील ठेक्याने असलेल्या तलाव, जलाशयात शासन धोरणानुसार अपेक्षीत मत्स्यबोटुकली संचयन करावे, त्याकरीता  सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्याकडे मागणी नोंदवावी.

   जिल्ह्यातील मत्स्यकास्तकार, शेततळी लाभधारक शेतकरी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांनी त्यांचे तलाव / शेततळ्यामध्ये संचयन करण्यासाठी मत्स्यजीरे, अर्धबोटुकली, मत्स्यबोटकली, मत्स्यबीजाची मागणी लेखी स्वरूपात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा यांचेकडे नोंदवावी. तसेच कार्यालयाच्या 07262-242254 क्रमांकावर संपर्क साधून मत्स्यजिरे पुरवठ्याबाबतची माहिती घेवून पुरवठ्याबाबत वेळ व दिनांक घेण्यात यावा. मत्स्यबीज मागणी नोंदविण्यासाठी इच्छूकांनी सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी यांच्या 9029515539, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नि.मा साळुंके यांच्या 9860809711, इ. तू देवकत्ते यांच्या 8856929431 क्रमांकावरही संपर्क साधून माहिती घेवू शकतात.

    शासकीय योजनांचा लाभ देते वेळेस अडचण निर्माण झाल्यास किंवा अपात्र ठरल्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.  अपेक्षीत मत्स्यबीज, मत्स्यबोटुकली संचयन तलाव / जलाशयात झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रादेशिक उपआयुक्त अमरावती कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार तलाव किंवा जलाशयाचा ठेका रद्द करण्याची कार्यवाही होवून संस्थेचे सहा वर्षाचे कालावधीकरीता शासन धोरणानुसार काळ्या यादीत टाकण्यात येईल. तरी सर्व मच्छीमार संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक मत्स्यकास्तकार यांनी इष्टतम मस्त्यबीज संयचन आणि अपेक्षीत मस्त्योत्पादन घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असे आहेत मत्स्यबीजाचे प्रकार व सुधारीत दर

प्रजाती :  प्रमुख कार्प - मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी, दर 1000 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 125 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 250 रूपये प्रति हजार. बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 500 रूपये प्रति हजार. प्रजाती :  मृगळ - मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी, दर 800 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 125 रूपये प्रति हजार. अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 250 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 500 रूपये प्रति हजार. प्रजाती :  रोहू - मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी, दर 800 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 125 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 250 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 500 रूपये प्रति हजार. प्रजाती :  कटला - मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी, दर 1000 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 150 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 350 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 600 रूपये प्रति हजार. प्रजाती :  गवत्या चंदेऱ्या - मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी, दर 1000 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 150 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 350 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 600 रूपये प्रति हजार. प्रजाती :  सायप्रिनस - मत्स्यजीरे, आकार 8 ते 12 मि.मी, दर 1000 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 150 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 350 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 600 रूपये प्रति हजार. प्रजाती :  पंगेशियस  - मत्स्यजीरे : आकार 9 ते 20 मि.मी, दर 400 रूपये प्रति लाख. आकार 21 ते 35 मि.मी, दर 800 रूपये प्रति लाख. आकार 36 ते 50 मि.मी, दर 800 रूपये प्रति लाख,  आकार 51 ते 80 मि.मी, दर 2000 रूपये प्रति लाख, आकार 81  ते 120 मि.मी, दर 3000 रूपये प्रति लाख.  प्रजाती :  गिप्ट तिलापिया  - मत्स्यजीरे : आकार 9 ते 20 मि.मी, दर 1000 रूपये प्रति लाख. आकार 21 ते 35 मि.मी, दर 2000 रूपये प्रति लाख. आकार 36 ते 50 मि.मी, दर 3000 रूपये प्रति लाख,  आकार 51 ते 80 मि.मी, दर 4500 रूपये प्रति लाख, आकार 81  ते 120 मि.मी, दर 7000 रूपये प्रति लाख. प्रजाती : स्कॅम्पी – पीएल 20 : 2 रूपये प्रति नग.

*********

 

जिल्हाधिकारी यांचेहस्ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचे विमोचन

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने संकेतस्थळाचे निर्माण करण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावर बुलडाणाविषयी संक्षिप्त माहिती, क्रीडा विषयक योजना व उपक्रमांची माहिती, शासन निर्णय, अनुषंगिक अर्ज तसेच जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारार्थींची व क्रीडा शिष्यवृत्ती धारकांची माहिती, अनुदान लाभार्थींची यादी, क्रीडा स्पर्धा नियोजन, जिल्ह्यातील क्रीडा संकुल व क्रीडा सुविधांची अद्यावत माहिती, जिल्ह्यातील क्रीडा संघटनांची माहिती अशा क्रीडा विषयक बाबींची माहिती नागरीकांना सुलभरित्या उपलब्ध होण्याच्या तसेच सर्वसामान्य नागरीकांना क्रीडा विषयक बाबींची माहिती होणेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांचेवतीने http://buldhana sports.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आलेले  आहे. भविष्यात या संकेतस्थळाच्या माध्यमातुन यानंतरही क्रीडा विषयक उपक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे.

            त्यानुषंगाने जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांचेहस्ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचे वतीने तयार करण्यात आलेल्या http://buldhanasports.com या संकेतस्थळाचे विमोचन 8 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात करण्यात आले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरीक यांनी या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी कळविले आहे.

                                                                        ******

माध्यमिक/उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना

क्रीडा गुण सवलत गुण प्रस्ताव सादर करावे

·         जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

·         15 जुन 2021 अंतिम मुदत

 बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :    माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या किंवा सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. 

सेवा हमी कायद्यानुसार ग्रेस गुण देण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सिस्टीम  https://schooleducation.mahaonlinegov.in कार्यरत आहे.  सदरच्या संकेतस्थळ जाऊन विद्यार्थी किंवा खेळाडूंनी प्रथम आपली नोंदणी करुन क्रीडा गुण सवलतीचा अर्ज, परिक्षेचे हॉल तिकीट (ओळखपत्र) आणि खेळाचे प्रमाणपत्र यासोबत अपलोड करणे गरजेचे आहे. सदर प्रस्तावाची हार्डकॉपी किमान 2 प्रतीमध्ये त्यानुसार संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपुर्ण प्रस्ताव विहीत नमुण्यात अर्ज, हॉलतिकीट, युडायस क्रमांकासह, मान्यता प्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ट ई, संघटना परिशिष्ट 10 या वेबसाईटवर दिनांक 15 जून 2021 रोजी सायं 5 वाजेपर्यंत ऑनलाईन किंवा कार्यालयात येवून ऑफलाईन पध्दतीने सादर करावे. 

 तसेच विद्यार्थी गुणसवलती पासुन वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी  संबंधीत  खेळाडू/संस्थेची /शाळेची राहील.  बोर्डाकडून काही सुचना प्राप्त झाल्यास तसे कळविण्यात येईल.  प्रचलीत शासन निर्णयानुसार गत तीन वर्षातील व चालु वर्षातील संबंधीत खेळाडूने क्रीडा स्पर्धत सहभागी होणे आवश्यक आहे.  कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे असामान्यपरिस्थितीमुळे सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) साठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मध्ये सदर विद्यार्थ्याने सहभागी होणे आवश्यक आहे.  तसेच सन 2020-21 या वर्षात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) साठी प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी पुर्वी म्हणजेच इयत्ता 11 वी मध्ये क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक आहे.  या सर्व निकषानुसार पात्र असलेले प्रस्ताव शाळांनी, महाविद्यालयांनी द्वि-प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे 15 जून 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

तसेच शाळा/संस्थांना व एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हास्तर/विभागस्तर/राज्यस्तर स्पर्धेचे संपुर्ण विस्तृत अहवाल या कार्यालयाच्या या dsobld@gmail.com ई-मेल वर पाठवावे.  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार कोरोना 19 विषाणुच्या प्रतिबंधाकरीता जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमाचे / निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करुन कार्यवाही करावी व अधिक माहितीकरीता अनिल इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक 9970071172 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कले आहे.

**********

शैक्षणिक वर्ष 2021- 22 ची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू

·         निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशाला 11 जुन 2021 पासुन प्रारंभ

 बुलडाणा, (जिमाका) दि. 9 :     जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सदर प्रक्रियेअंतर्गत सोडतीव्दारे राज्यस्तरावरुन खाजगी शाळांतील 25 टक्के कोटा अंतर्गतचे प्रवेश निश्‍चीत केले जातात. त्यानुसार 2021-22 या वर्षांच्या आरटीई 25 टक्के प्रक्रियेच्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) 7 एप्रील 2021 रोजी राज्यस्तरावरुन काढण्यात आलेली आहे. परंतू कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे  प्रवेशाची प्रक्रिया शासन स्तरावरुन तात्पुरती पुढे ढकलण्यात आली होती. शासनाचे दि. 4 जुन 2021 रोजीचे पत्रानुसार प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या सुचना आहेत.

   त्यानुसार सन 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी  आरटीई 25 टक्के प्रक्रियेअंतर्गत ज्या विदयार्थ्यांना आरटीई 25 टक्के कोटामध्ये निवड यादी ची लॉटरी लागली आहे. त्या मुलांचे पालकांनी दि.11 जुन 2021 पासुन, संबंधित शाळेत जाऊन तात्पुरता प्रवेश निश्‍चीत करावा. प्रवेशासाठी पालकांनी जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी पुरावा,आधार इत्यादी बाबतची मुळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात. शाळेमध्ये कागदपत्र पडताळणी करीता पालकांनी एकाच वेळी न जाता, ज्या पालकांना शाळेकडून मेसेज प्राप्त होईल त्याच पालकांनी शाळेत जावे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांनी गर्दी होणार नाही,  याची काळजी घ्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

   प्रवेश प्रक्रिया 11 जुन 2021 पासुन सुरु होत असून, पालकांना प्रवेशासाठी 20 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. याची नोंद जिल्ह्यातील शाळा व पालकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयाचे वतीने करण्यात येत आहे.

********

कोरोना अलर्ट : प्राप्त 4004 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 74 पॉझिटिव्ह

  • 138 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4078 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4004 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 74 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 44 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 211 तर रॅपिड टेस्टमधील 3793 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4004 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :5, बुलडाणा तालुका : मोहज 1, पाडळी 1, रायपूर 1,  दहीद 1, अजिसपूर 1,  रूईखेड 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : सिराढोण 1,    सिं. राजा शहर : 4, सिं. राजा तालुका : निमगांव 1, सुलजगाव 1, वर्दडी 1, सावरगांव 1, दुसरबीड 1, आडगांव राजा 1,   दे. राजा शहर : 6,   दे. राजा तालुका : दे. मही 5, पिंपळगांव 1,  खल्याळ गव्हाण 1, सावखेड तेजन 1, जुंबडा 1, जांभोरा 2, नागणगांव 3, सिनगांव जहागीर 2, पिंपळगांव चि 2, सावखेड नागरे 1,  पिंप्री आंधळे 1, मेंडगांव 2, सातेगांव 1, सुरा 1, खैरव 1,    चिखली शहर : 5,  चिखली तालुका : भोरसा भोरसी 1, सावरखेड डुकरे 1, गोद्री 1,   संग्रामपूर तालुका : शेवगा 3,  मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1,  जळगांव जामोद तालुका : पळशी सुपो 1,  नांदुरा तालुका :  दादगांव 1, लोणार तालुका : पिंप्री 1, शारा 1, जांभूळ 1, सरस्वती 1, धायफळ 1, सावरगांव 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 74 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान माटरांव ता. शेगांव येथील 71 वर्षीय महिला, केळवद ता. चिखली येथील 80 वर्षीय महिला, मोहाडी ता. सिं. राजा येथील 85 वर्षीय महिला व शिवशंकर नगर, बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 138 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 514405 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84380  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  84380 आहे. 

  आज रोजी 1399 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 514405 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85783 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84380 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 764 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 639 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*************

No comments:

Post a Comment