Wednesday 22 July 2020

DIO BULDANA NEWS 22.7.2020

विनाशिधापत्रीकाधारक विस्थापित मजुरांना प्रति कुटूंब मिळणार मोफत हरभरा
  • केंद्र शासनाचे आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज
बुलडाणा, (जिमाका) दि. 22: कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज जाहीर केले आहे. त्या अंतर्गत विनाशिधापत्रिका धारक विस्थापित मजूरांना मोफत हरभरा (अख्खा चना) प्रति कुटूंब एक किलो प्रमाणे माहे मे व जुन या दोन महिन्यांसाठी वितरीत करण्यात येणार आहे.  जिल्ह्याकरिता प्रतिमहा 4.55 मे. टन प्रमाणे मोफत हरभरा मासिक नियतन शासनाने मंजूर केले आहे.
  सदर मोफत अख्खा चन्याची मासिक नियतनाची उचल भोकरदन जि. जालना येथील शासकीय धान्य गोदाममधून 5.126 मे
टन व शासकीय धान्य गोदाम ए. आर. जालना येथून 3.974 मे टन असा एकून 9.10 मे. टन अख्खा चना उचल करुन बुलडाणा जिल्ह्यातील 16 शासकीय धान्य गोदामात वाहतुक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  जिल्ह्याकरीता माहे मे व जुन 2020 नियतन मंजूर करण्यात आलेले आहे.
  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची गोदामनिहाय कुटूंबसंख्या, माहे मे व जून महिन्यातील नियतन पुढीलप्रमाणे आहे : शासकीय धान्य गोदाम भोकरदन जि. जालना येथून पुढील गोदामात वाहतूक करावयाची आहे.  बुलडाणा:  कुटूंबसंख्या 366, मे व जून प्रत्येकी 3.66 क्विंटल, एकूण 7.32 क्विं., चिखली :  कुटूंबसंख्या 314, मे व जून प्रत्येकी 3.14 क्विंटल, एकूण 6.28 क्विं, अमडापूर : कुटूंबसंख्या 122, मे व जून प्रत्येकी 1.22 क्विंटल, एकूण 2.44 क्विं, दे.राजा : कुटूंबसंख्या 90, मे व जून प्रत्येकी 0.9 क्विंटल, एकूण 1.8 क्विं.,मेहकर : कुटूंबसंख्या 1032, मे व जून प्रत्येकी 10.32 क्विंटल, एकूण 20.64 क्विं.,लोणार : कुटूंबसंख्या 271, मे व जून प्रत्येकी 2.71 क्विंटल, एकूण 5.42 क्विं, सिंदखेड राजा : कुटूंबसंख्या 228, मे व जून प्रत्येकी 2.28 क्विंटल, एकूण 5.42 क्विं, साखरखेर्डा : कुटूंबसंख्या 140, मे व जून प्रत्येकी 1.4 क्विंटल, एकूण 2.8 क्विंटल. तसेच शासकीय धान्य गोदाम ए.आर जालना येथून पुढील गोदामात वाहतूक करावयाची आहे.  डोणगांव : कुटूंबसंख्या 401, मे व जून प्रत्येकी 4.01 क्विंटल, एकूण 8.02 क्विं, खामगांव : कुटूंबसंख्या 368, मे व जून प्रत्येकी 3.68 क्विंटल, एकूण 7.36 क्विं, शेगांव : कुटूंबसंख्या 342, मे व जून प्रत्येकी 3.42 क्विंटल, एकूण 6.84 क्विं, मलकापूर : कुटूंबसंख्या 216, मे व जून प्रत्येकी 2.16 क्विंटल, एकूण 4.32 क्विं, मोताळा : कुटूंबसंख्या 167, मे व जून प्रत्येकी 1.7 क्विंटल, एकूण 3.4 क्विं, नांदुरा : कुटूंबसंख्या 126, मे व जून प्रत्येकी 1.26 क्विंटल, एकूण 2.52 क्विं, जळगांव जामोद : कुटूंबसंख्या 90, मे व जून प्रत्येकी 0.9 क्विंटल, एकूण 1.8 क्विं. आणि संग्रामपूर : कुटूंबसंख्या 274, मे व जून प्रत्येकी 2.74 क्विंटल, एकूण 5.48 क्विंटल आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण माहे मे साठी 45.5 व जुनसाठी 45.5 असे एकूण 91 क्विंटल नियतन मंजूर करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. बेल्लाळे यांनी कळविले आहे.
                                                            ******
सोयाबीन पिकावरील खोड माशीचे व्यवस्थापन करावे
  • कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 22: सोयाबीन पिकावरील खोडमाशीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या आणि 2 मि.ती लांब असतात. मादी माशी सोयाबीनच्या पानावर व देठावर अंडी घालते. अंड्यातून निघालेली व पाय नसलेली पांढऱ्या रंगाची 2 ते 4 मि.मी लांब अळी प्रथम सोयाबीनचे पान पोखरते. पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडावर किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटून झाड वाळू लागते. या किडीचा प्रादुर्भाव रोप अवस्थेत झाल्यास झाडांच्या संख्येत विपरीत परीणाम होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या झाडावर झाल्यास असा परिणाम दिसत नाही. मात्र अशा झाडावर खोड माशीच्या अळीने प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. अशा किडग्रस्त झाडावर फुले व शेंगा कमी प्रमाणात येऊन उत्पादनात 16 ते 30 टक्क्यापर्यंत घट येवू शकते, अशा परिस्थितीत सोयाबीनवरील खोड माशीचे व्यवस्थापन करावे.
      असे करा खोडमाशीचे व्यवस्थापन : सोयाबीन पिकात खताचा वापर माती परीक्षणाच्या आधारावर संतुलीतरित्या करावा व विशेषत: नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा, सुरूवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे व बांधावर असलेल्या किडीच्या पुरक खाद्य वनस्पतींचा नाश करावा. तसेच सोयाबीनवरील खोडमाशीने प्रादुर्भावग्रस्त आढळणारी पाने, फांद्या यांचा आतील किडींसह नायनाट करावा. सुरूवातीच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. खोडमाशीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी एकरी 4 ते 5 पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा. खोडमाशीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर म्हणजे सरासरी 10 टक्के खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा त्यापेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास किटकनाशकाची गरजेनुसार योग्य निदान करून निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी. क्लोरॅनटानीप्रोल 18.5 एस.सी 2 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा इथिऑन 50 टक्के ई.सी 15 लिी अधिक 10 लिटर पाणी किंवा थायोमेथोझॉम 12.6 टक्के अधिक लॅम्बडा सायहेलोथ्रिन 9.5 टक्के 2.5 मिली अधिक 10 लीटर पाणी या प्रमाणात घेवून कोणत्याही एका किटकनाशकाची इतर एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या घटकाचा  वापर करून गरजेनुसार व योग्य निदान करून फवारणी करावी.
  रासायनिक किडनाशके वापरण्यापूर्वी लेबलक्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबलक्लेम शहानिशा शिफारशीप्रमाणे आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेवून योग्य  शिफारशीत प्रमाणात योग्य वेळीच फवारणी करावी. अनेक रसायने एकत्र करून फवारणी टाळावी. मुदत बाह्य झालेली किडनाशके व एक्स्पायरी झालेली किडनाशके यांची फवारणी टाळावी. प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेवून किडीचे योग्य निदान करून व आर्थिक नुसानीची पातळी लक्षात घेवून लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे किडनाशकाचा वापर करणे केव्हाही हितावह व योग्य असते. वर निर्देशीत किटकनाशके फवारतांना लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे फवारणीसाठी निर्देशीत पाण्याची मात्रा प्रति हेक्टर वापरावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
                                                                                ******
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग न घेण्याबाबतचे घोषणापत्र सादर करावे
  • प्रधानमंत्री पिक विमा योजना
  • 24 जुलै 2020 पर्यंत अंतिम मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 22: प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2020-21 खरीप हंगामाकरीता जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2020 आहे. योजनेच्या अंमलबजावणीकरीता शासनाने सन 2020-21 करीता विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ब्लॉक अे, हेरिटेज हाऊस, तळ मजला, 6- अ, रमाबाई आंबेडकर, पुणे – 411001 या कंपनीची निवड केली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक स्वरूपाची आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे नसेल, तर सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र किंवा अर्ज 24 जुलै 2020 पर्यंत संबंधीत बँकेत सादर करणे बंधनकारक आहे. तरी अशा शेतकऱ्यांनी आपले घोषणापत्र किंवा अर्ज सादर करावा.
  शासन निर्देशानुसार जिल्ह्यातंर्गत सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या सूचनांच्या अधिन राहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घ्यावा. तसेच ग्राहक सेवा केंद्र/ आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी विहीत वेळेत जास्तीचे प्राप्त होणारे शेतकऱ्यांचे अर्ज वर्क फ्रॉम होम पद्धतीने अतिरिक्त वेळेत ऑनलाईन करण्याची कार्यवाही करावी. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
                                                                                    *********

No comments:

Post a Comment