Tuesday 28 July 2020

DIO BULDANA NEWS 28.7.2020

बकरी ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी करावी

  • कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचना

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : कोविड 19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या  पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर सूचना खालीलप्रमाणे आहे. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या

संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.  त्यासअनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी.  

   सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.  प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ के. एम. ठाकरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000000

कर्जमाफी यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

  • जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन
  • मयत शेतकऱ्यांच्याबाबत वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.28 : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 ही महत्वाकांक्षी  योजना जाहीर केलेली आहे. या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होत आहेत. योजनेच्या निकषानुसार यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्रावर जावून आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते.

   आजरोजी जिल्ह्यात योजनेतंर्गत 1 लक्ष 73 हजार 258 शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी 1 लक्ष 61 हजार 146 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची अद्यापही आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. तरी ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून उद्यापही आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्रावर जावून कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टसिंगचे पालन करून तात्काळ आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच कर्जमुक्तीच्या यादीमधील जे शेतकरी मयत आहेत, अशा शेतकऱ्यांच्याबाबत त्यांचे वारसाने संबंधित बँकेमध्ये जावून त्यांची कर्जखात्यास वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment