Tuesday 28 July 2020

DIO BULDANA न्यूज 28.7.2020,2


कोरोनाला रोखण्यासाठी त्री-सुत्री कार्यक्रम राबवावा 
             - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे                            
                 
              *चिखली येथे कोरोना संसर्ग परिस्थिती आढावा सभा
   बुलडाणा, (जिमाका) दि.28:  दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याला चिखली तालुका देखील अपवाद नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवायचे असेल तर नियमित मास्क वापरने, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आणि वारंवार हात धुणे हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी व्यक्त केले. ते चिखली येथे आयोजित कोरोना आढावा सभे दरम्यान बोलत होते.
     यावेळी माजी आमदार राहुल बोन्द्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, नगराध्यक्षा प्रिया बोन्द्रे, जि.प. सदस्य ज्योती खेडेकर, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषद मुख्याधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे,  उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, न.प.मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह शहरातील डॉक्टर, व्यापारी, पत्रकार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी शहरातील मान्यवरांच्या समस्या व सूचना ऐकून घेण्यात आल्या.  पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. परंतु जनतेने नियमांचे पालन न केल्यास काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे जनतेने नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा म्हणाल्या,  जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री दर शनिवारी रविवारी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. प्रशासनाला गरज भासेल तेव्हा आम्ही सर्व खाजगी डॉक्टर प्रशासनाला सहकार्य करू असे आश्वासन याप्रसंगी चिखली मेडिकल असोसिएशनने दिले. सभेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते 
*****""*"""***

No comments:

Post a Comment