Friday 3 July 2020

DIO BULDANA NEWS 3.7.2020

शिष्यवृत्तीच्या अखर्चित रक्कमेची माहिती महाविद्यालयांनी तातडीने सादर करावी
  • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये कार्यालयाच्या बँक खात्यातील अखर्चित रक्कम शासनास परत करण्याबाबत सुचीत केलेले आहे. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क, इतर शिष्यवृत्ती योजनांची विविध बँक खात्यातील अखर्चित असलेली रक्कम शासन खाती भरणा करावयाची असल्यामुळे सर्व महाविद्यालयांनी त्यांचे महाविद्यालय / विद्यार्थी यांचे रिव्हर्ट बँक खात्यांची  विहीत प्रपत्रात दुरूस्ती करून तातडीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावी.
   विहीत कालावधीनंतर सदर अखर्चित रक्कम शासन खाती भरणा करण्यात येईल. ही अखर्चित रक्कम चलानद्वारे शासन खाती भरणा केल्यानंतर कोणत्याही महाविद्यालय / विद्यार्थी यास सदर रक्कम परत मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामतंर्गत येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीच्या योजनांसाठी शैक्षणिक सत्र 2016-17 पर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या महा ई स्कॉल या संगणकीय प्रणालीद्वारे तसेच प्रथम वर्षाची शिष्यवृत्ती ऑफलाईनद्वारे महाविद्यालय व विद्यार्थी यांचे बँक खात्यात जमा करण्याकरीता बँकेस महाविद्यालय / विद्यार्थी यांचे बँक खात्यात जमा करता आलेल्या नाहीत, अशा बँकेकडून रिर्व्हट आलेल्या महाविद्यालय / विद्यार्थी यांचे बँक खात्याची माहिती त्रुटी पुर्ततेकरीता महाविद्यालयांना पत्रांद्वारे देण्यात आलेली आहे. मात्र काही महाविद्यालयांनी महाविद्यालय / विद्यार्थी यांचे बँक खात्याची त्रुटी पुर्तता केलेली नाही.
  तरी महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीची अखर्चित माहिती तातडीने सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
                                                                        ******
शासकीय अध्यापक महाविद्यालयातील दोन पदे कंत्राटी पद्धतीने भरणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : शासकीय अध्यापक महाविद्यालय, चिखली रोड, बुलडाणा यांना आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये माहे ऑगस्ट 2020 ते31 मार्च 2021 या कालावधीकरीता दोन पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहे. त्यामध्ये सफाई कामगार व रात्रापाळी पहारेकरी या दोन पदांचा समावेश आहे. ही पदे भरण्याकरीता विहीत आवेदनपत्र शासनमान्य कंत्राटदार, नोंदणीकृत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था किंवा लोकसेवा केंद्राकडून  द्विलिफाफा पद्धतीने मोहोरबंद निवीदा मागविण्यात येत आहे.
  महाविद्यालयाकडे प्रति शेड्युल 500 रूपये प्रमाणे भरणा करून 8 जुलै ते 10 जुलै 2020 पर्यंत सकाळी 11 ते सायं 5 वा या कालावधीत निवीदा मिळणार आहे. त्यानंतर 13 जुलै 2020 रोजी कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निवीदा स्वीकारण्यात येतील. तसेच मोहोरबंद निवीदा 15 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजता प्राचार्यांच्या दालनात उघडण्यात येणार आहे. या संबंधी अंतिम निर्णय प्राचार्याचे राहील. सदर निवीदा महाविद्यालयाच्या www.gcebedbuldan.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे प्राचार्य डॉ. एस.एस. लिंगायात यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        **********
कोरोना अलर्ट : प्राप्त 75 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 11 पॉझिटिव्ह
  • 8  रूग्णांची कोरोनावर मात, मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 75 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 11 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील 20 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय तरूण, 62 वर्षीय पुरूष, आळसणा ता. शेगांव येथील 35 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, 8 वर्षीय मुलगी, सती फैल खामगांव 88 वर्षीय वृद्ध पुरूष, फाटकपूरा खामगांव येथील 54 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगी,  42 वर्षीय महिला व राणी पार्क जळगांव जामोद येथील 22 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 11 रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहे.
  यामध्ये सती फैल खामगांव येथील 88 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा 2 जुलै 2020 रोजी उपचारादरम्यायन मृत्यू झाला आहे. तसेच आज 8 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये मलकापूर येथील 4 व धा.बढे ता. मोताळा येथील 4 रूग्णांचा  समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 2867 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 162 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 162 आहे.  तसेच आज 3 जुलै रोजी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 11 पॉझीटीव्ह, तर 77 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 318 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2867 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 271 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 162 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 96 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
****

  राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ‘कोविड -19 : मिथ्यक आणि वास्तव’ यावर  वेबिनार

  • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले होते आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि.3 :  पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), चा पश्चिम विभाग आणि रीजनल आउटरीच ब्यूरो यांनी आयोजित केलेल्या  कोविड -19 : मिथक आणि वास्तव या विषयावर राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त 1 जुलै रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.  महासंचालक मनिष देसाई यांनी वेबिनारला संबोधीत केले.  
   पुणे रुग्णालयातील सल्लागार आणि  इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ईश्वर झंवर आणि मुंबईच्या नायर रुग्णालयाच्या  मानसोपचार विभागाच्या प्रमुख आणि कोविड संबंधी एचआर आणि लॉजिस्टिक प्रभारी डॉ. हेनल शाह यांनी वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांशी  संवाद साधला. या वेबिनारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांचे सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.  यात पत्र सूचना कार्यालय,  रीजनल आउटरीच ब्यूरो, आकाशवाणी, दूरदर्शन आणि फिल्म्स डिव्हिजन यांचा समावेश होता.
    कोविड -19  विषाणू हा सुपर स्प्रेडर आहे ज्याबद्दल आपण दररोज शिकत आहोत. श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यत पसरतो आणि आजपर्यंत त्यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही आणि आतापर्यंत केवळ सहायक उपचारच देण्यात येत असल्याचे डॉ. झंवर यांनी स्पष्ट केले . मास्कचा वापर , 6 फूट अंतर राखणे, हात धुणे इत्यादींबद्दल सरकार आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
   डॉ. हेनल शाह म्हणाल्या, आरोग्य संप्रेषणात माध्यमांची भूमिका चुकीची माहिती रोखणे आणि सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रसिद्ध करणे ही आहे.  वार्तांकनाची भाषा भीती, लाज, अपराधीपणाची भावना निर्माण करणारी असू नये. कोविड रुग्णालयात  काम करण्याचा  आणि कोविड ड्युटीवरील डॉक्टरांचे अनुभव सांगताना डॉ. शाह म्हणाल्या ,  “ महामारीसाठी कुणीही सज्ज नव्हते. आपण सर्वानी वेगाने बदल केले.   आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये कमी अवधीतच अनेक  बदल घडून आले.
 अनलॉक 2 टप्प्यात आरोग्य विषयक माहिती कशी दिली जावी, या संदर्भात डॉ. शाह म्हणाल्या की, आता कोरोनाविरूद्धचे युद्ध आरोग्य व्यावसायिकांच्या हातातून समाजाकडे गेले आहे. म्हणूनच, सरकार आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे ही आता समाजाची जबाबदारी आहे. आरओबी पुणे चे संचालक संतोष अजमेरा यांनी आभार मानले.
******

--

No comments:

Post a Comment