Wednesday 3 August 2016

news 3.8.2016 dio buldana

जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, बस स्थानकासमोर, प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001 दूरध्वनी- 242341, फॅक्स- 242741 E-Mail : diobuldana@gmail.com वृतक्रमांक- 574 दि. 3 ऑगस्ट 2016 पर्जन्यधारांचा वर्षाव सुरूच.. • मलकापूर तालुक्यात सर्वात जास्त 32 मि.मी पावसाची नोंद • सरासरी 10.8 मि.मी पाऊस बुलडाणा, दि. 3 - जिल्ह्यात पावसाने ठाण मांडले असून कालही पर्जन्यधारांचा वर्षाव सुरूच होता. कधी रिमझिम, तर कधी दमदार पर्जन्यवृष्टीचा अनुभव जिल्हावासियांनी घेतला. सुरूवातीपासूनच समाधानकारक बरसणाऱ्या पावसाने कालही आपली उपस्थिती आवर्जून लावली. जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 32 मि.मी पावसाची नोंद मलकापूर तालुक्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस मलकापूर : 32 मि.ली (507 मि.ली), शेगांव : 20 (464), सिंदखेड राजा: 18.6 (860.4), बुलडाणा: 16 (461), खामगांव: 11.2 (520.2), नांदुरा : 10 (543.8), संग्रामपूर : 7 (408), दे.राजा : 6 (577), जळगाव जामोद : 5 (544), मोताळा: 4 (419), चिखली : 4 (444), मेहकर: 3 (566), लोणार : 3 (544) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 139.8 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 10.8 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2016 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 527.6 मि.ली आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार पुढीलप्रमाणे आहे : नळगंगा – प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 14.67 टक्के, पेनटाकळी – प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 21.63 टक्के, खडकपूर्णा – प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : 18.74, पलढग – प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 29.56 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 36.34 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 100 टक्के, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12 टक्के, आजचा पाणीसाठा: 51.21 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 57.87 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 32.89 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 84.68 टक्के. ***** कृषि विभागाकडून 430 पाकिटे कापूस बियाण्यांचे मोफत वाटप • नांदुरा तालुक्यात 400 व शेगाव तालुक्यात 30 पाकिटांचे वाटप • कृषि विभागाची माहिती बुलडाणा, दि. 3 - शासनाने सन 2012-13 व 2013-14 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या व सध्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून इंडियन मर्चंट्स चेंबर पुरस्कृत बियाणे कंपन्यांच्या मदतीने कापूस बियाणे मोफत पुरविण्याबाबत निर्देशित केले होते. त्यानुसार सदर बियाणे जिल्ह्यास 9 जुलै 2016 रोजी प्राप्त झाले. शासन निर्णयानुसार सदरचे मोफत कापूस बियाणे सन 2012-13 व 2013-14 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या व सध्या थकबाकीदार असलेले, जे अजूनही पेरणी करू शकलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनाच वाटप करावयाचे होते. याबाबत प्राप्त निर्देशानुसार क्षेत्रीय पातळीवर क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत प्रत्यक्ष पेरणी न झाल्याची खातरजमा करूनच बियाणे वाटप करण्यात आले. पात्र शेतकऱ्यांची संख्या फारच कमी असल्यामुळे जिल्ह्यास प्राप्त एकूण 450 प्रति ग्रॅम पाकिटांपैकी नांदुरा तालुक्यात 400 पाकिटे व शेगाव तालुक्यात 30 असे 430 पाकिटे प्रति शेतकरी दोन पाकिटे प्रमाणे वितरीत करण्यात आले. जिल्ह्यात खरीप हंगामात लवकरस पर्जन्यमानास सुरूवात झाली, तर माहे जून च्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून पेरणीस सुरूवात झाली. जिल्ह्यात 13 जुलै 2016 अखेर जवळपास 87 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची संख्या मोफत बियाणे वाटपासाठी कमी ठरली. तरी उपरोक्त पाकिटे विरीत झाल्यानंतर उर्वरित बियाणे मात्रा महिको कंपनी लि. अकोला यांना परत करण्यात येत आहे, असे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे. ही माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी दिली आहे. ****** नियमानुसारच शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई • शासनाकडून कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक नाही • जिल्ह्यात 2 लक्ष 76 हजार 908 शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर बुलडाणा, दि. 3 - शासनाने सन 2015-16 खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 3 लाख 63 हजार 246 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला. त्यापैकी 2 लाख 76 हजार 908 शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला. कृषि व पदूम विभागाच्या 4 जून 2015 च्या शासन निर्णयान्वये ज्या महसूल मंडळाचे या वर्षीचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा ज्या प्रमाणात कमी येईल. त्या प्रमाणात पिक विमा नुकसान भरपाई विमा कपनीमार्फत मंजूर केली जाते. जिल्ह्यात प्रति हेक्टरी 12 ते 16 हजार रूपयांपर्यंत पिक विमा नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. त्यामुळे शासन निर्णयान्वये पीक विमा नुकसान भरपाई ठरविण्याची जी प्रचलित पद्धत आहे. त्याप्रमाणेच विमा नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक अथवा थट्टा करण्यात आली नाही. गतवर्षी नांदुरा तालुक्यात एकूण 17 हजार 324 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला. त्यापैकी 11 हजार 700 शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईपोटी 3.25 कोटी रूपये पिक विमा कंपनीमार्फत मंजूर करण्यात आला. बँकामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरचर रक्कम वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. सोयाबिन पिकाच्याबाबत नांदुरा तालुक्यातील 6867 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. त्यापैकी सर्वच्‍ा शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळाली. मात्र ती एकरी केवळ 28.80 रूपये मंजूर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा समज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा आहे. संघटनेने दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी केवळ 28.80 रूपये पीक विमा मंजूर करून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी नांदुरा तहसीलदार यांच्या दालनात शेतकऱ्यांसह झोपा काढो आंदोलन केले. याबाबत मात्र कुठल्याही प्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा झाली नसून नियमानुसारच पिक विमा नुकसान भरपाई ‍िमिळाली असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा कृषि अधिक्षक प्रमोद लहाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. **** व्यवसाय कर नाव नोंदणीसाठी अभय योजना जाहीर * योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बुलडाणा, दि. 3 - राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य अंतर्गत व्यवसाय कर नाव नोंदणी करण्यासाठी अभय योजना 2016 जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय कर अधिकारी विणा कुमरे यांनी केले आहे. व्यवसाय कर कायद्यान्वये कर भरणा करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्ती, संस्था, कार्यालये, सोसायटी, कारखाने, यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ज्या व्यक्ती व्यवसाय कर भरण्यास पात्र आहेत. परंतु अद्याप त्यांनी व्यवसायकर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले नाही, अशा सर्व व्यक्ती अभय योजनेसाठी पात्र ठरतील. ही योजना केवळ अनोंदणीकृत व्यावसायिकांसाठी लागू असून 1 एप्रिल 2013 पूर्वीचा व्यवसाय कर, व्याज व दंड पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. या योजनेत केवळ मागील तीन वर्षाचाच करभरणा करावयाचा आहे. तसेच अभय योजना संपल्यानंतर व्यवसायकर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त न करून घेतलेल्या अनोंदणीकृत व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींकडून मागील आठ वर्षांचा कर भरण्यासह व्याज व शास्तीची आकारणी केली जाणार आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी विक्रीकर भवन, टॉवर चौक, खामगांव या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ***** संत श्री गजानन महाराज यांची पालखी 8 ऑगस्ट रोजी खामगावात • खामगांव ते शेगांव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने • 9 ऑगस्ट रोजी पालखीचे शेगांवकडे प्रस्थान • 8 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान आदेश लागू बुलडाणा, दि. 3 - श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे. पालखीचे 1 ऑगस्ट 2016 रोजी सिंदखेड राजा येथे आगमन झाल्यानंतर पालखी शेगांवकडे मार्गस्थ झाली आहे. पालखी 8 ऑगस्ट 2016 रोजी खामगांव येथे येत असून सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत खामगांव शहरातून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. पालखीचा मुक्काम श्री. देवजी खिमजी मंगल कार्यालय खामगांव येथे राहणार आहे. त्यानंतर 9 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 5 वाजता पालखीचे शेगावकडे प्रयाण होणार आहे. तरी पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी बघता खामगांव ते शेगांव, खामगाव- नांदुरा व बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या मार्गावरील 8 ऑगस्ट 2016 चे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- सुटाळा बु.- जलंब नाका व बसस्टँण्ड या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच खामगांव ते नांदुरा रस्त्यावरील वाहतूक 8 ऑगस्ट 2016 चे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड- बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- पुढे नांदुराकडे, जलंब जाण्याकरिता पुढे सुटाळा खुर्द व जलंब नाक्यापासून पुढे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. खामगाव- नांदुरा राष्ट्रीय महामार्ग दोन तासापर्यंत वाहतूकीसाठी बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूकीसाठी खुला राहील. खामगांव ते शेगाव रस्ता 9 ऑगस्ट 2016 चे सकाळी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड ते शेलोडी, तिंत्रव मार्गे शेगांव, खामगांव बसस्टँण्ड ते जलब नाका- पुढे शेगांवकडे वाहतूक या पर्यायी मार्गाने राहणार आहे. खामगाव ते शेगाव रस्ता 12 तासापर्यंत संपूर्ण वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 सह कलम 36 अन्वये जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ही अधिसूचना काढली आहे. या आदेशातून सर्व शासकीय वाहने, सर्व अतिमहत्वाच्या/महत्वाच्या व्यक्तींची वाहने, तात्काळ सेवेची रूग्णवाहिका, शववाहिनी, अग्नीशमन दलाची वाहने वच जिवनावश्यक वस्तूंची वाहने वगळण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक संजीवकुमार बावीस्कर यांनी कळविले आहे. -****** क्रांतिसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन बुलडाणा, दि. 3 : क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तर उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, नायब तहसीलदार श्री. तायडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment