Tuesday 2 August 2016

news 2 augest 2016, dio buldana

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 572                                                                           दि. 2 ऑगस्ट 2016

जिल्ह्यात संततधार..
·                    बुलडाणा सर्वात जास्त 21 मि.मी पावसाची नोंद
बुलडाणा, दि. 2 -  गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरू आहे. कधी रिमझिम, तर कधी दमदार स्वरुपाच्या पावसामुळे शेतातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहे. कालही जिल्ह्यात सिंदखेड राजा व नांदुरा तालुक्यांच्या अपवाद वगळता सर्वत्र संततधार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ नोंदविण्यात आली आहे.  जिल्ह्यात आज 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 21 मि.मी  पावसाची नोंद बुलडाणा तालुक्यात करण्यात आली आहे.
      जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सर्वात जास्त पाऊस मेहकर :21 मि.ली (445 मि.ली), चिखली : 20 (440), मेहकर: 19 (537), संग्रामपूर: 11 (401), शेगांव: 9 (444), मलकापूर : 9 (475), जळगाव जामोद : 6 (539), लोणार : 4 (541), मोताळा : 4 (415), खामगांव: 2.2 (509), दे. राजा : 2 (571), सि.राजा: निरंक (841), नांदुरा : निरंक (533.8) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.  अशाप्रकारे  जिल्ह्यात एकूण 107.2  मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 8.2  मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस  सिंदखेड राजा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2016 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची  सरासरी 516.2  मि.ली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार  पुढीलप्रमाणे आहे :
नळगंगा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 14.22 टक्के, पेनटाकळी प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 19.82 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : 16.19, पलढग प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 28.23 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 35.68 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 100 टक्के, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12  टक्के, आजचा पाणीसाठा: 43.25 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 55.96 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 31.68 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 80.67 टक्के.
*****
डीएलएडच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे अर्ज पडताळणीसाठी मुदतवाढ
·       4 ऑगस्ट 2016 पर्यंत करावी पडताळणी
बुलडाणा दि2 -  डीएलएड (डी.एड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ यांचे आदेशान्वये सदर प्रक्रिया 31 जुलै 2016  पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू आहे. सदर डीएलएड ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास 3 ऑगस्ट पर्यंत आणि पडताळणी केंद्रावर जावून अर्जाची पडताळणी करून घेण्यासाठी 4 ऑगस्ट 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   सर्व सूचना व प्रवेश पात्रता याबाबतची माहिती 8 जून 2016 चे निवेदनानुसारच राहणार आहेत, असे प्राचार्य समाधान डुकरे यांनी कळविले आहे.

*****

No comments:

Post a Comment