Friday 5 August 2016

dio news 5.8.2016

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृतक्रमांक- 582                                                                           दि. 5 ऑगस्ट 2016

दुभत्या जनावरांसाठी वैरण विकास योजना
·                    100 टक्के अनुदानावर 600 रूपयांचे मर्यादेत गवत थोंबाचे वाटप
·                    त्वरित अर्ज करावे
बुलडाणा, दि. 5 -  सन 2016-17 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत दुभत्या जनावरांच्या खाद्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी वैरण विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार मका, ज्वारी बियाणे, थोबे, स्टम्स वाटप करावयाचे नियोजन आहे. ज्या पशुपालकांकडे पाण्याची सोय आहे व जास्त जनावरे आहेत, अशा पशुपालकांची निवड करण्यात येवून त्यांना 100 टक्के अनुदानावर 600 रूपयांच्या मर्यादेत यशवंत, जयवंत, नेपीयर सारख्या बहुवार्षिक गवताचे थोंब, स्टम्सचे वाटप करावयाचे प्रयोजन आहे.
  वैरण विकाससाठी वळुमाता प्रक्षेत्र ताथवडे जि. पुणे येथे नेपियर, यशवंत, जयवंत यांचे सुधारीत बेणे उपलब्ध असून त्याचा दर प्रति बेणे 1 रूपया व थोंबाचा दर 2 रूपये आहे. गवत थोबांचा आणावयाचा वाहतुक खर्च हा लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या प्राप्त दर करारानुसार मका (आफ्रिकन टॉल) 45 रूपये प्रति किलो व ज्वारी 58 रूपये प्रति किलो दर आहे.
   तरी सन 2016-17 मध्ये दुभत्या जनावरांच्या खाद्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी पशुपालकांना 600 रूपयांच्या मर्यादेपर्यंत वैरण विकास योजनेतंर्गत नेपीयर, जयवंत, यशवंत, मका व ज्वारी वैरण वाणाच्या स्टम्स खरेदीची मागणी करीता अर्ज पंचायत समितीचे पशुधन  विकास अधिकारी, पशुवैद्यकीय संस्थेकडे त्वरित सादर करावेत, असे आवाहन जि.प पशुसंवर्धन सभापती व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
*******
पशुसंवर्धन प्रशिक्षणासाठी  अर्ज आमंत्रित
बुलडाणा, दि. 5 -  विशेष घटक योजना सन 2016-17 अंतर्गत अनु. जातीच्या लाभार्थ्याकडील दुधाळ जनावरांना 100 टक्के अनुदानावर पशुखाद्य देण्यात येणार आहे. याकरिता अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे ठेवण्यात आलेला आहे.  अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट 2016 आहे.
  योजनेसाठी अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व दारिद्र्य रेषेखालील असावा, योजनेमध्ये 3 टक्के अपंग व 30 टक्के महिलांचा समावेश असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्यांनी सदर योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराकडे दुधाळ जनावरे असणे आवश्यक आहे, कुटूंबातील एकेवळ एकाच लाभार्थीने पशुखाद्यासाठी अर्ज करावा, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे, अर्जासोबत तसा ग्रामसेवकाचा दाखला जोडणे आवश्यक आहे, अर्जासोबत नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो जोडावा.
  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्ती मार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नसून अशा प्रवृत्तीपासून सावध रहावे. लाभार्थीस या योजनेचा लाभ 2016-17 च्या प्राप्त तरतूदीस अधिन राहून देण्यात येईल. तसेच निवड झाल्यापासून ते लाभ मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी लाभार्थीच्या अर्जामध्ये लाभानंतर त्रुटी किंवा गैरप्रकार आढळल्यास निवड रद्द करण्यात येईल. योजनेची आर्थिक वसुली करण्यात येईल, असे जि.प पशुसंवर्धन सभापती श्रीमती सुलोचनाताई शरदचंद्र पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. सी पसरटे यांनी कळविले आहे.
******


एक दिवसीय कुक्कुट पक्षी मिळण्याकरिता अर्ज आमंत्रित
बुलडाणा, दि. 5 एकात्मिक कुक्कुट योजनेतंर्गत सन 2016-17 मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 100 टक्के अनुदानावर एक दिवसीय कुक्कुट पक्षी देण्यात येणार आहे. याकरिता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे ठेवण्यात आलेला आहे.  अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट 2016 आहे.
  योजनेसाठी अर्जदार हा मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांना प्राधान्य राहील. योजनेमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्यांनी सदर योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे, अर्जासोबत तसा ग्रामसेवकाचा दाखला जोडणे आवश्यक आहे, अर्जासोबत नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो जोडावा, मागील पाच वर्षात लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी अर्ज करू नये, अर्जासोबत 7/12 किंवा नमुना 8 जोडणे आवश्यक राहील.
  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्ती मार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नसून अशा प्रवृत्तीपासून सावध रहावे. लाभार्थीस या योजनेचा लाभ 2016-17 च्या प्राप्त तरतूदीस अधिन राहून देण्यात येईल. तसेच निवड झाल्यापासून ते लाभ मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी लाभार्थीच्या अर्जामध्ये लाभानंतर त्रुटी किंवा गैरप्रकार आढळल्यास निवड रद्द करण्यात येईल. योजनेची आर्थिक वसुली करण्यात येईल, असे जि.प पशुसंवर्धन सभापती श्रीमती सुलोचनाताई शरदचंद्र पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. सी पसरटे यांनी कळविले आहे.
******
हुंडा प्रतिबंधक अधिनियमातंर्गत सल्लागार मंडळासाठी नामांकने आमंत्रित
बुलडाणा, दि. 5 हुंडा प्रतिबंधक अधिनियम, 1961 मधील कलम 8 च्या तरतुदीनुसार हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार मंडळ गठीत करण्यात येणार आहे. त्यासाठी नामनिर्देशने मागविण्यात येत आहे.
    या सल्लागार मंडळासाठी सदस्याकडे क्षमता, सचोटी व प्रतिष्ठा असेल आणि ज्यांना महिलांच्या शोषणासंबंधीच्या समस्या सोडविण्याबाबतचे पुरेसे ज्ञान व अनुभव असावा, सदस्याचे वय नामनिर्देशनाच्या दिनांकास 35 वर्षापेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. परंतु ज्यांना हुंडा प्रतिबंधक अधिनियम, महिलांच्या शोषणसंबंधीच्या समस्या सोडविणे, महिलांच्याबाबतीत कायदे, त्यांचे विकास व पुनर्गठण याबाबतचे ज्ञान, कार्याचा 3 वर्षापेक्षा कमी नसलेला अनुभव असावा.
   अर्जदार हा जिल्ह्यातील रहिवाशी असावा. नामांकन प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सुवर्ण नगर, मुठ्ठे ले आऊट बुलडाणा येथे 7 दिवसांचे आत तीन प्रतीत सादर करावे, असे महिला व बालविकास अधिकारी श्री. येंडोले यांनी कळविले आहे.
****
कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 5 - कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर 6 व 7  ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे : दि. 6 ऑगस्ट 2016 रोजी पहाटे 5.25 वाजता शेगाव रेल्वेस्थानक येथे आगमन, पहाटे 5.25 वाजता शेगाव येथून खामगांवकडे प्रयाण, सकाळी 10.55 वाजता खामगांव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयाला सदीच्छा भेट, सकाळी 11 वाजता आगमन व राखीव, दुपारी 12 ते 4 दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह येथून अकोलाकडे प्रयाण, सायं 5 वाजता आगमन व राखीव, सोयीनुसार अकोला येथून खामगांवकडे प्रयाण.
  दि 7 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता खामगांव पत्रकार भवन येथे आगमन व खामगांव प्रेस क्लबच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 12.05 वाजता आगमन व राखीव, दुपारी 4.30 वाजता मौजे आवार ता. खामगांवकडे प्रयाण,  सायं 5 वाजता आवार येथे आगमन व श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव यांच्या पंढरपूर ते शेगांव पालखीचे दर्शन, सायं 6 वाजता आवार येथून खामगांवकडे प्रयाण, सायं 6.30 वाजता खामगाव येथे आगमन व राखीव, सायं 7.10 वाजता नांदुरा रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, सायं 7.40 वाजता नांदुरा रेल्वे स्थानक येथे आगमन व मेल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

******

No comments:

Post a Comment