Friday 12 August 2016

news 12.8.2016 dio buldana

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृत्त क्रमांक-601                                                                                     दि. 12 ऑगस्ट 2016


राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा
पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
  • 22 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज करावे
   बुलडाणा, दि. 12 :  व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना सामाजिक न्याय विभागामार्फत गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी बुलडाणा जिल्ह्यातील  इच्छूक संस्था व व्यक्तींनी येत्या 22 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी  केले आहे.
          व्यसनमुक्ती प्रचार कार्याच्या मोहिमेचा भाग म्हणून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मौलिक काम करणाऱ्या संस्था व व्यक्तिंना  हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, शाळा व महाविद्यालये, प्रसिद्धी माध्यमे, उद्योग व कारखाने या गटातून एकूण 51 व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी पासपोर्ट आकाराचे तीन रंगीत छायाचित्रे, केलेल्या कार्याचे वर्तमानपत्रात छापून आलेली कात्रणे,प्रशस्तीपत्रके, पोलीसांचा दाखला यासह मुंबई शहर आणि उपनगरातील व्यक्तिंनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याकडे उपलब्ध असून अर्ज या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलडाणा   या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
*********
जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे स्थलांतरण
   बुलडाणा, दि. 12 :  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय यापूर्वी जतकर भवन, धाड रोड बुलडाणा येथे कार्यरत होते. या कार्यालयाचे स्थलांतरण दुरदर्शन प्रक्षेपण केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा या ठिकाणी करण्यात आले आहे. कार्यालयाचे कार्यालयीन कामकाज या नवीन ठिकाणी सुरू झाले आहे. तरी कार्यालयाशी संपर्क किंवा नवीन पत्रव्यवहार नवीन पत्त्यावर करावा, असे महाव्यवस्थापक श्रीमती देवळे यांनी कळविले आहे.
*********
सदाशिव शेजोळ यांचे मरणोत्तर नेत्रदान
   बुलडाणा, दि. 12 :  श्री संत गजानन महाराज संस्थानचे दिवाणजी स्व. सदाशिव ओंकार शेजोळ यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने  आज 12 ऑगस्ट रोजी निधन झाले. मृत्यूपश्चात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेत्रदानाची प्रक्रिया जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत्र विभागामार्फत पार पाडण्यात येवून त्यांचे नेत्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा मुलगा रामकृष्ण सदाशिव शेजोळे, दिगंबर शेजोळे, निखील पाटील, विजय बुच, विलास पाटील, दिनेश सोमाणी, माधव लिपते यांचे सहकार्य लाभले, असे नेत्र समुपदेशक, सामान्य रूग्णालय यांनी कळविले आहे.
*******
वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ वन विभाग सज्ज
  • अवैक्ष वृक्षतोड आढळल्यास संपर्क क्रमांकावर माहिती द्यावी
  • वन विभागाच्यावतीने अधिकाऱ्यांची नियुक्ती
   बुलडाणा, दि. 12 :  वन्य प्राण्यांची शिकार करणे, विद्युत तारा लावून हत्या करणे, जनावरावरती विष प्रयोग करणे, असे अनेक प्रकार वन्य प्राण्यांना नुकसान पोहोचविण्याच्यादृष्टीने करण्यात येतात. वन्यप्राणी विहीरीत पडून मृत्यूमुखी पडणे, रस्त्यावरील अपघातात ठार होणे, जखमी तडफडत मरणे आदी प्रकारही आपणास दिसतात. अशाप्रकारे विविध कारणांमुळे होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात  वाढ होत आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ वन विभागाने विविध उपाययोजना केल्या असून वन विभाग सज्ज आहे.
  अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, अवैध चराईचे प्रकार, वाहनाद्वारे चोरटी तोड आदी प्रकार घडू नयेत आणि वनाचे नुकसान होवू नये याकरिता वन विभागातर्फे  अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या निर्दशनास आल्यास संबंधीत क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. या क्रमांकावर माहिती देणाऱ्याचे नाव गुप्‍त ठेवण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक बी.टी भगत यांनी कळविले आहे. अधिकाऱ्याचे नाव, त्यांचे परीक्षेत्र,  भ्रमणध्वनी क्रमांक व कार्यालयीन क्रमांक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
    विभागीय कार्यालय, बुलडाणा : बी.टी भगत उपवनसंरक्षक 7350694030, 07262-242334 व बी.ए पोळ सहायक वनसंरक्षक 9421329796, बुलडाणा परीक्षेत्र : जी.ए झोळे वनपरिक्षेत्र अधिकारी 7030255444 व 07262-242072, मोताळा परीक्षेत्र : आर.बी कोंडावार वनपरिक्षेत्र अधिकारी 9421856885, दे.राजा परीक्षेत्र: ई. पी सोळंके वनपरिक्षेत्र अधिकारी 9623835994 व 07261-202646, खामगाव परीक्षेत्र : टी.एन साळुंके वनपरिक्षेत्र अधिकारी 9689265445 , बी.एन पायघन सहायक वनसंरक्षक 9403500779 व 07263 254954,  मेहकर परिक्षेत्र : एस.ए इंगोले वनपरिक्षेत्र अधिकारी 9421788483, घाटबोरी वनपरिक्षेत्र : आर.बी घाटोळ वनपरिक्षेत्र अधिकारी 9822440580, एल.एम पाटील सहायक वनसंरक्षक 8275104590, जळगाव जामोद परिक्षेत्र : एन.एस कांबळे 9421952068 व 07266-221771 आणि आपात्कालीन क्रमांक व्ही.ए राठोड सहायक वनसंरक्षक 7757841618 या क्रमांकावर संपर्क साधावा.  
******
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड बंधनकारक
  • शाळांनी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संकलीत करावे
  • शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती संबंधित शाळेच्या बँक खात्यात जमा
  • विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्नित करावा
बुलडाणा दि. 12 - शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात येतो. तर शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती ही ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिकत आहे, त्या शाळेच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांनी संकलित करून योग्य असल्याची तपासणी करावी.
  आधार क्रमांक हा बँक खात्याच्या क्रमांकाबरोबर लिंक करण्याबाबत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक  यांनी लेखी सूचना द्याव्यात. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक दिला आहे, परंतु तो वैध नाही असे आढळून आले आहे. त्याबाबत पुन्हा वैध आधार क्रमांक संकलित करण्याची कार्यवाही संबधित महाविद्यालयांनी करावी. ज्या विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संकलित झाला आहे, त्याचे वैधताकरण एक महिन्याच्या आत महाविद्यालयांनी करावे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी https://resicent.uidai.net  या पोर्टलवर जावून खात्री मुख्याध्यापक  यांनी करून घ्यावी.
     ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ई-स्कॉल पोर्टलमध्ये आधारकार्ड क्रमांकाची माहिती दिली आहे. तो मास्टर आधार डाटाबेस सोबत वैध असल्याची खात्री मुख्याध्यापक  यांनी करून घ्यावी. शाळेच्या मुख्याध्यापक / लिपिक यांनी सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाचे ई-स्कॉलरशीप प्रणालीत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.
******
शालेय डेंगू जागृती मोहिमेतंर्गत उर्दू विद्यालयात जनजागृती कार्यक्रम
बुलडाणा दि. 12 माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी व डास नियंत्रणासाठी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पंधरवडा शालेय डेंग्यू जागृती मोहिम म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के  व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनात शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले.
    त्याअनुषंगाने उर्दू विद्यालय, जोहर नगर, बुलडाणा येथे जनजागृतीपर कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी पी. डी वनारे, आरोग्य सहाय्यक आर.जी पाखरे यांनी गप्पी मासे संदर्भात माहिती दिली. यावेळी श्री. लोखंडे, प्राचार्य, आरोग्य कर्मचारी श्री. साळोख,  आर.एस जाधव, श्री. बाहेकर, एस. पी जाधव यांनी प्रयत्न केले.

********

No comments:

Post a Comment