Friday 19 August 2016

dio news 19.8.16

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
बस स्थानकासमोर,  प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001
दूरध्वनी- 242341,      फॅक्स- 242741           E-Mail : diobuldana@gmail.com
वृत्त क्रमांक-621                                                                                 दि. 19 ऑगस्ट 2016

स्वातंत्र्य दिनी ठिकठिकाणी जलपूजन कार्यक्रम
बुलडाणा, दि‍. 19 -  सिमेंट नाला बांध, नाला खोलकरण आदी ठिकाणी जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींच्याहस्ते जलपूजन कार्यक्रम घेण्यात आले. मुख्य शासकीय जलपूजन कार्यक्रम पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते सागवन येथील सिमेंट नाला बांध येथे घेण्यात आला.
  त्याचप्रमाणे मेहकर येथे आमदार संजय रायमूलकर यांच्याहस्ते मेहकर जवळील सिमेंट नाला बांध खोलीकरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय कृषि अधिकारी बी. यु बनसोडे, तहसीलदार संतोष काकडे, तालुका कृषि अधिकारी विजय सरोदे, प्रगतीशील शेतकरी जगदेवराव आखाडे आदी उपस्थित होते.
   खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथे सिमेंट नाला बांध खोलीकरणातील जलसाठ्याचे आमदार आकाश फुंडकर यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, उपविभागीय कृषि अधिकारी अनिल बोंडे, तालुका कृषि अधिकारी एम.डी जाधव आदी उपस्थित होते.  तर सिंदखेड राजा येथे तालुका कृषि अधिकारी आर. के राठोड यांनी जलपूजन केले.
   शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथे नविन सिमेंट बांधातील पाण्याचे  आमदार आकाश फुंडकर यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश पवार, तालुका कृषि अधिकारी एस.एस ढाकणे आदींची उपस्थिती होती. तसेच चिखली तालुक्यातील  बोरगांव वसु येथील माती नाला बांधातील जलसाठ्याचे आमदार राहूल बोंद्रे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती लक्ष्मण अंभोरे, तहसीलदार आदी उपस्थित होते, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
*******

सार्वजनिक गणेश मंडळांना परवाना देण्याची प्रक्रीया आता ऑनलाईन्‍ा
  • www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावे अर्ज
  • 3 सप्टेंबर 2016 पर्यंत मुदत, मुदतीनंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही
     बुलडाणा दि‍.19 - सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सव 2016 करिता परवाना देण्याची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. मंडळांनी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 3 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज करावे. मंडळांना मुंबई सार्वजनिक विश्वस्त्‍ा व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करण्याकरिता सहायक धर्मदाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सव 2016 करिता परवाना घेणे बंधनकारक आहे. या परवान्यासाठी अर्ज ऑनलाईन सादर करावा.
   संस्था नोंदणी अधिनियम 1960 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा 1950 अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेशोत्सव व नवरात्र उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्यांना संस्थांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी अर्ज करतांना मागील वर्षी परवानगी घेतलेल्या संस्थांनी मागील वर्षीचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे.  त्याचप्रमाणे नविन परवानगी अर्ज करतेवेळी त्या-त्या क्षेत्रातील नगरसेवक, ग्रामपंचायत यांच्याकडील त्यांचे याठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमतीपत्र व प्रथम वर्ष असल्यास दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
    गणेशोत्सव २०१६ करिता निधी गोळा करण्यासाठी परवानगी देण्याचे काम 3 सप्टेंबर 2016 पर्यंत सुरू राहणार असून या तारखेनंतर परवानगी दिल्या जाणार नाही. देणगीदारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगी प्रत पाहून खात्री करूनच देणगी, वर्गणी बाबात निर्णय घ्यावा, असे सहायक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले आहे.
-   असा करा ऑनलाईन अर्ज -
www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून लॉग ईन करावे. नंतर रजिस्टर युजर यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी. तयार झालेल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग-ईन करावे. मेनू मधील register An event यावर क्लिक करावे. येथे आवश्यक ती माहिती भरावी. नंतर सबमीटवर क्लिक करावे. त्यानंतर आपणास auto generate क्रमांक मिळेल.  
..........................

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्नता बंधनकारक
  • महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज फॉरवर्ड करताना काळजी घ्यावी
बुलडाणा दि. 19 मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतो. या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक संबंधित  संबंधित महाविद्यालयांनी त्यांच्या बँक खात्याशी संलग्नीत करण्याची कार्यवाही करावी.   आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक संलग्न असणे बंधनकारक आहे.
    विद्यार्थ्यांचे या योजनेतील शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड करताना विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र पडताळणी दाखला, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), महाविद्यालयात विद्यार्थी असल्यास जनरल रजिस्टर क्रमांक, पासपोर्ट आकाराचा सध्याचा फोटो या सर्व बाबी प्राचार्यांनी पूर्णपणे तपासून घ्याव्यात. विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ऑफलाईन फॉरवर्ड करताना आधारकार्ड क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डची छायांकित प्रत, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधारकार्ड बॅक खात्याशी संलग्न झाले असल्यास विहीत नमुन्यातील अर्ज विद्यार्थ्याने बँकेकडे सादर केल्याची पोच पावती महाविद्यालयांनी तपासून घ्यावी.   सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात ई-स्कॉलरशीप बाबत या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी अन्यथा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा केल्या जाणार नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
***********
ई-स्कॉलरशीपबाबत प्राचार्यांच्या बैठकीचे 25 ऑगस्ट रोजी आयोजन
बुलडाणा दि. 19 भारत सरकार ई-स्कॉलरशीप योजनेबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम सांभाळणारे  लिपीक यांच्या बैठकीचे आयोजन 25 ऑगस्ट 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले आहे.
  या बैठकीत शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क प्रदान 31 मार्च 2016 अखेर प्राप्त अर्ज, निकाली अर्ज, महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज, डिजीटल सिग्नेचरबाबत कार्यवाही, सन 2015-16 मध्ये महाविद्यालयास प्राप्त शिष्यवृत्ती रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र प्रवर्गनिहाय विहीत नमुन्यातील जनरेट अहवाल दोन प्रतीत, विशेष चौकशी पथक लेखापरीक्षण समितीस अभिलेखे उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती दोन प्रतीत, विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेबाबतचा अहवाल या विषयांवर बैठकीत कार्यवाही होईल, बैठकीस उपस्थित रहावे,  असे सहायक आयुक्त श्री. वाठ यांनी कळविले आहे.
**********



No comments:

Post a Comment