बुलढाणा जिल्ह्यातून चारा वाहतूक व विक्रीवर बंदी ; जिल्हाधिकारी यांचे आदेश

 


बुलढाणा, दि. ३० (जिमाका) :  महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उपलब्ध चारा बाहेरील जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात गंभीर चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर हिरवा चारा, कडबा, विविध प्रकारची कुट्टी तसेच पशुखाद्याची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मात्र, शासकीय यंत्रणेमार्फत अथवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीस हा आदेश लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश ३० सप्टेंबर २०२६ पासून पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या