मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

बुलडाणा,(जिमाका),दि.18 : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि.19 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान होणार आहे.  

या कार्यक्रमास महिला लाभार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सकाळी 11 वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या