धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र
ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका),दि.20 : राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब
महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे.
या मंडळामार्फत ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ
उपलब्ध करून देण्यात येणार असून संबंधितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात
आले आहे. मंडळामार्फत जीवनविमा व अपंगत्च विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर
असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार
कौशल्य वृद्धी योजना, ६५ वर्षावरील ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृती
सन्मान योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह
खरेदीसाठी कर्ज आदी योजना राबविण्यात येणार आहेत.
अर्जदाराकडे ऑटोरिक्षा व टॅक्सी बॅज,
लायसन्स व परवाना असणे आवश्यक असून अर्जाचे नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम
रु 500 रुपये व वार्षिक सभासद शुल्क रु 300 रुपये ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.
असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बुलडाणा यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment