युवक कल्याण उपक्रमांतर्गत माय भारत पोर्टलवर युवांची नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलडाणा,(जिमाका),दि.20 : युवक कल्याण  क्रीडा विभागाने माय भारत पोर्टलवर विविध युवा उपक्रम नोंदणी करणे, सेवाकार्य स्वच्छता हा नवीन संकल्प-स्वच्छता पंधरवडा असे विविध उपक्रम दि. १८ सप्टेबर ते २ आक्टोबर २०२४ या दरम्याण आयोजित करण्याचे निर्देश केलेले आहे. त्याअनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयांची नोंदणी करण्यासाठी वयवर्ष 15 ते 29 वयोगटातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी माय भारत पोर्टलवर युवा तसेच उपक्रमांची नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.  भारत देश युवांचा देश म्हणून ओळखला जात असून राष्ट्र निर्माणाच्या शाश्वत विकासाच्या मुख्य प्रवाहात युवांचे मोठे योगदान आहे. सामाजिक विकासाच्या प्रभावी माध्यमांची ओळख करुन राष्ट्रीय  सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग असून तो वाढविणे आवश्यक आहे. यासाठी  जिल्हयामध्ये कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रिय कार्यालय  नेहरु युवा केंद्र संघटनेमार्फत राबविण्यात येणार आहे.   

 

माय भारत पोर्टलवर युवांची नोदणी :युवांना राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग वाढविणे, विकसित भारत करण्यामध्ये युवांनी योगदान देणे याबाबत पार्टलवर युवांची नोदणी करणे आवश्यक आहे. यासाठी https://mybharat.gov.in या लिंकवर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज  महाविद्यालय तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट  गाईड इ. विद्यार्थी  प्रशिक्षणार्थी नोंदणी करावी. यामध्ये युवांनी केलेल्या विविध कार्याची माहीती संकलित होते त्यानी विविध वर्षामध्ये तसेच कार्यकमामध्ये घेतलेला सहभागबाबत तपशिल एकत्रित होतो. यामुळे युवानी केलेले कार्याची वैयक्तिक माहिती पोर्टलवर उपलब्ध होते. तरी अधिक नोंदणी करण्यात यावी. 

 

अनुभवात्मक शिक्षण :- युवा हे विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतात त्यांचा राष्ट्राच्या जडण घडणीमध्ये मोठे योगदान आहे. सामाजिक कार्य, अनुभवात्मक शिक्षण, कौशल्याच्या संधी, नवीन संकल्पना इ. यामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. याकरिता माय भारत पोर्टलवर आरोग्य, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, पोलीस स्वयंसेवक, कौशल्य विकासात्मक कार्यक्रम इ मध्ये सहभागा बाबत नोदणी करता येते. उपकमामध्ये सहभागी झालेनंतर फोटा  कार्यक्रमाची माहिती नोदविता येते. जिल्हयामध्ये युवांसाठी स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, युवक संस्था यांचे सहकार्याने कार्यक्रम आयोजन करण्यात यावे. दि.१८ सप्टेबर ते २ आक्टोबर २०२४ या कालावधित युवा कल्याणकारी विविध उपक्रम राबविण्यात येईल. सदर कार्यक्रमाची माहिती माय भारत पोर्टलवर नोदविण्यात यावी. प्रत्येक जिल्यातून किमान १०० उपकम आयोजित करण्यात यावेत.  तसेच सातत्याने वर्षभर कार्यक्रम होतील याचे नियोजन करावे.

 

युवांचा सेवा कार्यात सहभाग:- युवांमध्ये सेवा कार्याचे आवड निर्माण करण्यासाठी विविध संधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. जिल्हयामधील विविध रुग्णालये याकरीता निवडण्यात यावीत. सदर हॉस्पिटल यांचे व्यवस्थापनां समवेत चर्चा करुन युवांचा सहभाग सेवा कार्यालय वाढेल असे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. याबाबत माहिती माय भारत पोर्टलवर नोदवावी.

 

स्वच्छता उपकमाचे आयोजन :- भारत सरकार  राज्य शासन यांचे वतीने स्वच्छता विषय विविध उपकम स्वच्छ भारत मिशन  स्वच्छ भारत अभियान, राबविण्यात येते. स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्याचे निर्देशित केले आहे. ग्रामीण  शहरी परिक्षेत्रातील सामाजिक ठिकाणे यांची निवड करुन दि.१८ सप्टेबर ते २ आक्टोबर २०२४ या कालावधित स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावेत. विभाग-जिल्हा  तालुका क्रीडा संकुलांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्यात येवून संकुल स्वच्छ राहतील असे पाहावे.

 फिट इंडिया उपक्रम :- नागरिक  युवांमध्ये निरोगी राहण्यासाठी व्यायामाची आवड निर्माण करणे यामधून शारीरिक  मानसिक आरोग्य, तंदुरुस्ती राहण्यासाठी विविध उपकमांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे. सामाजिक संस्था, औद्यागिक प्रतिष्ठाने यांचे सहकार्याने उपक्रम राबविण्यात यावे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या