माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन
माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका),दि.25 : दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस 'माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा करण्यात येत असून यादिवशी 'माहितीचा अधिकार' या विषयावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांतर्फे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन व्हावे. माहितीचा अधिकार या विषयावर आधारित विविध उपक्रमाचे आयोजन करुन जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment