25 सप्टेंबरपूर्वी पाणी मागणी सादर करण्याचे आवाहन

 बुलडाणा,(जिमाका),दि.20 : जिल्हास्तरीय आकस्म‍िक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची सभा  दि. 5 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात दि. 25 सप्टेंबर 2024 पूर्वी पाणी मागणी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पावरुन पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्याबाबत, सर्व नगर परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती, संबंधित ग्रामपंचायतींनी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांच्याकडे दि. 25 सप्टेंबर 2024 पुर्वी पाणी मागणी सादर करावी लागणार आहे. यामुळे जिल्हास्तरीय आकस्म‍िक पिण्याचे पाणी निश्चिती समिती सभेमध्ये सदर मागणी उपस्थित करणे शक्य होईल. सदर सभेमध्ये प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजूरी देण्यात येईल. याची सर्व संबंधीत बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या