Posts

Showing posts from July, 2023

DIO BULDANA NEWS 31.07.2023

Image
  अंमली पदार्थांबाबत पालकांनी सजग राहावे -जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड बुलडाणा, दि. 31 : शाळकरी मुलांमध्येही अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे युवा पिढी वाईट मार्गावर जात असल्याने पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन अंमली पदार्थाबाबत पालकांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले. अंमली पदार्थ विरोधी कारवाई समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे आदी, मेहकर उपविभागीय अधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, प्रतिबंधात्मक कारवाई करताना प्रामुख्याने ज्या युवांवर अंमली पदार्थाचा दुष्परिणाम जाणविणार आहे, त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करावी. पोलिस विभागाने केंद्रप्रमुखांच्या बैठकीमध्ये शाळा परिसरात होणाऱ्या अंमली पदार्थाबाबत माहिती द्यावी. तसेच पालक-शिक्षक सभेमध्ये अंमली पदार्थाची माहिती देण्यासंबंधी शाळांना देण्यात याव्यात. यामुळे मुलांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास...

DIO BULDANA NEWS 28.07.2023

  वृद्ध   कलावंत   मानधन योजनेसाठी अर्ज आमंत्रित बुलडाणा, दि. 28 :   वृद्ध   कलावंतांसाठी सन 2023-24 या वर्षासाठी मानधन योजना राबविण्यात येत आहे. या वर्षासाठी मानधन घेऊ इच्छिणाऱ्या   वृद्ध   कलावंतांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत दि. 18 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक नियम व अटींची माहिती पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. पात्र इच्छुक लाभार्थ्यांना आपले परिपूर्ण अर्ज दि. 24 जुलै ते दि. 18 ऑगस्टपर्यंत संबंधित पंचायत समितीकडे सादर करावे लागणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी केलेले अर्ज दप्तर जमा झाल्याने विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जातील नमूद अटींची पूर्तता करणाऱ्या व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या छाननीअंतीच्या पुरावा, कागदपत्रासह सादर केलेले फक्त वैध आणि योग्य अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे इच्छुकांनी यासंबंधी नियम व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावे. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपूर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अर्जा...

DIO BULDANA NEWS 27.07.2023

Image
  शालेय क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रक्रिया -जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड *शाळा, महाविद्यालयांनी नोंदणी करण्याचे आवाहन   बुलडाणा, दि. 27 : येत्या शैक्षणिक वर्षात क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धाऑनलाईन प्रक्रिया होणार आहे. सहभागासाठी शाळा, महाविद्यालयांची नोंदणी अनिवार्य आहे. याच सॉफ्टवेअरद्वारे क्रीडा स्पर्धेची प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे. जिल्हा क्रीडा परिषदेची सभा बुधवारी, दि. 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते. शासनाच्या निर्णयानुसार सर्व शालेय क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रक्रिया आवश्यक केली आहे. यातूनच स्पर्धेचे प्रमाणपत्र, विभाग, राज्य स्पर्धेसाठी आदेश पत्र, तसेच प्रवेश अर्ज आदी कामे करणे सुलभ होणार आहे. कामकाज पेपरलेस होणार असल्याने गतीमानता येणार आहे. क्रीडा विभागातर्फे यावर्षी 90 क्रीडा स्पर्धा घेण्यात यातील कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, मैदानी स्पर्धा, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, योग...

DIO BULDANA NEWS 26.07.2023

Image
  लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य यशस्वी करावे -जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड बुलडाणा, दि. 25 : लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले आणि अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालके आणि गरोदर मातांचा शोध घेण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविण्यात येणार आहे. येत्या ऑगस्टपासून तीन महिने हे मिशन सुरू राहणार आहे. माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मिशन यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0बाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यासह आरोग्य यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या मिशनमध्ये सुरवातीला दोन वर्षापर्यंतच्या लसीकरणापासून वंचित आणि गळती झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण हे 7 ते 12 ऑगस्ट, 11 ते 16 सप्टेंबर, 9 ते 14 ऑक्टोबर या तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. ही मोहिम प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झिरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेली लाभार्थी क्षेत्र, गोवर आजारासाठी अति जोखमीचा भाग, नियमित...

DIO BULDANA NEWS 25.07.2023

  शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पिक स्पर्धा * सहभागी होण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन बुलडाणा, दि. 25 : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकरी विविध प्रयोग करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पुढे येतात. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून जिल्ह्याच्या उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे पिक स्पर्धा घेण्यात येत आहे.              पिक स्पर्धेतील जिल्ह्याकरिता खरीप हंगामातील स्पर्धेसाठी मुग, उडीद, सोयाबीन, तूर आणि मका पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याकडे स्वत:...