Posts

Showing posts from May, 2023

DIO BULDANA NEWS 31.05.2023

Image
       जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन बुलडाणा, दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नाझर गजानन मोतेकर, नंदकुमार येसकर, सुरेश खोडके, मनीषा पाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 0000000 एकात्मिक  फलोत्पादन विकास अभियानातून फळबागांचे पुनरूज्जीवन *फळे,  फुले, मसाला लागवड, जुन्या बागांना लाभ बुलडाणा, दि. 31 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड आणि जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यात येते. यात विदेशी फळे, फुले, मसाला लागवड आणि आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यात येत आहे.   राज्यात विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे, तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. यामधील घटकांचे अनु...

DIO BULDANA NEWS 29.05.2023

Image
  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी आर्थिक सहाय्य योजना बुलडाणा, दि. 29 :   अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण आणि इतर बाबींसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. यासाठी खेळाडूंनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन परिणामकारक करण्यासाठी, तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख यासाठी क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे. यात राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वीत आहे. शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, तसेच देश-विदेश...

DIO BULDANA NEWS 26.05.2023

  हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन *२०   जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत बुलडाणा, दि. 26 :   केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ यावर्षाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रथम सत्राकरिता एकूण १५ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातून प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांच्यामार्फत २० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज करता येणार आहेत. ओडिशातील बरगढ येथील भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदविका अभ्यासक्रमाकरीता राज्यातून १३, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी १ जागा, तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पसकरीता २ जागांच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांकडून प्रादेशिक उपायुक्त   वस्त्रोद्योग, नागपूर   कार्यालयाने अर्ज मागविले आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या dirtexmah.gov.in    या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयात उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग, नागपूरचे आयुक्त एम. जे. प्...

DIO BULDANA NEWS 25.05.2023

Image
  खामगावातील ‘शासन आपल्या दारी’मध्ये दहा हजार लाभ *16 विभागांच्या दालनातून योजनांची माहिती बुलडाणा, दि. 25 : खामगाव तहसील कार्यालयातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. खामगाव तालुका प्रशासनाने गुरुवारी, दि. 25 मे 2023 रोजी या उपक्रमाचे आयोजन केले होते. आमदार अॅड. आकाश फुंडकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या विविध विभागांकडून देण्यात येणारे लाभ पात्र लाभार्थ्यांना एकाच छताखाली देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शासनाच्या 16 विभागांनी माहिती देणारे स्टॉल उभारले होते. आज खामगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात महसूल विभागाचे 4 हजार 968, पंचायत समिती 1 हजार 300, कृषी विभाग 937, नगरपालिका 784, सहकार व पणन विभाग 384, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1 हजार 874, आरोग्य विभाग 393 अशा एकूण 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शिर्ला नेमाने यांना तालु...

DIO BULDANA NEWS 24.05.2023

Image
  पर्यावरणपूरक जीवनपद्धती कार्यशाळेचा समारोप बुलडाणा, दि. 24 : केंद्र शासनाच्या लाईफ मिशन अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनपद्धतीस प्रोत्साहन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मातर्फे जिल्हा प्रशिक्षण केंद्रात सोमवार, दि. २२ मे २०२३ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. तारू यांनी बदलत्या हवामानाशी सुसंगत पिकाच्या वाणांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. मनेश येदुलवार यांनी मान्सून आणि हवामानाच्या अंदाजाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. श्रीमती तिजारे यांनी हवामान अनुकूल शेतीपद्धती बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, पाण्याचा सूक्ष्म वापराबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी वातावरणानुकुल शेतीपद्धतीसाठी कृषी विभागाच्या योजनाबाबत माहिती दिली. पोकराचे प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव यांनी मुलस्थानी जलसंधारण, पाण्याचा सुयोग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी जैवविविधता, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले. सप्ताहात त...

DIO BULDANA NEWS 23.05.2023

Image
  शुक्रवारी ऑनलाइन रोजगार मेळावा बुलडाणा, दि. 23 : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होण्‍यासाठी मॉडेल करिअर सेंटरतर्फे शुक्रवार, दि. 26 मे 2023 रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्यात जबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मकापेरी एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रोजगार मेळाव्याची पदे अधिसूचित केली आहेत. नॅशनल करियर सर्विसेसच्या  ncs.gov.in  या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या मेळाव्यात सहभाग नोंदविता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून कार्यालयाकडून गुगल मीटच्‍या लिंकद्वारे ऑनलाईन सहभाग नोंदवू शकेल. पात्र उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू शकेल. मेळाव्याबाबत अधिक माहिती, तसेच ऑनलाईन रोजगार मेळाव्याची लिंक मिळविण्याकरिता मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनी द्वारे 7447473585 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मॉडेल करिअर सेंटरचे योगेश ला...

DIO BULDANA NEWS 22.05.2023

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन बुलडाणा, दि. 22 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.   अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नायब तहसीलदार संजय बंगाळे, नाझर गजानन मोतेकर, शिला पाल, सरला सपकाळ, मनिषा रिंढे आदी उपस्थित होते. ००००

DIO BULDANA NEWS 21.05.2023

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा बुलडाणा, दि. २१ : जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक प्रिया सुळे यांनी प्रतिज्ञा वाचली. यावेळी तहसीलदार पी. के. करे, नायब तहसीलदार संजय बंगाळे, वर्षा मुळे, सचिन ठाकरे, अमित घोलिया, अनंत साळवे उपस्थित होते. ०००० 

DIO BULDANA NEWS 19.05.2023

Image
  खरीप हंगामात सोयाबीन उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट *सोयाबीनचे अपेक्षित उत्पादनासाठी अष्ठसुत्री वापरावी बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्याची ओळख सोयाबीनचा हब म्हणून आहे. खरीपातील एकूण लागवड क्षेत्रापैकी सुमारे 75 टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतल्या जाते. सध्या पिकाची उत्पादकता लक्षात घेता उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव आहे. सन 2022-23 मध्ये जिल्ह्याची सरासरी उत्पादकता 1 हजार 693 किलो प्रति हेक्टर आहे. ती सन 2023-24 या वर्षात वाढवून 1 हजार 862 किलो करण्याचे उद्दिष्ट कृषि विभागाने निश्च‍ित केले आहे. नियोजित उत्पादकता साध्य करण्याकरीता शेतकऱ्यांनी काही बाबींचा अंगिकार केल्यास निश्च‍ित साध्य करता येऊ शकते. याकरीता हलक्या जमिनीत हे पिक अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही. त्याकरीता मध्यम ते भारी जमीनीवर पिकाची    लागवड करावी. सोयाबीन पिकाच्या उगवणीकरीता 25 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यक आहे. संपूर्ण वाढीच्या अवस्थेत सर्वसाधारणपणे 22 ते 35 डिग्री सेल्सीअस तापमानात पिक चांगले येते. या पिकाकरीता 750 ते 1000 मीमी पाऊस आवश्यक आहे. सुरुवातीच्या पिकाचे अवस्थेत कमी पाणी लागत असून दाणे भरण्याच्य...