Wednesday 19 April 2023

DIO BULDANA NEWS 19.04.2023

 आज अमरावती येथे माजी सैनिकांचा मेळावा

बुलडाणा, दि. 19 : जिल्ह्यातील वीर पत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अमरावती येथे गुरूवार, दि. 20 आणि शुक्रवार, दि. 21 एप्रिल रोजी माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वीर पत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये रक्षा लेखा नियंत्रक, प्रयागराज यांची चमू येत असून त्यामध्ये पेंशन संबंधित अडचणी सोडविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पेंशन आणि इतर अडचणीबाबत सर्व संबंधित कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000000

तलावाचे लिलाव करिता आवेदन आमंत्रित

बुलडाणा, दि. 19 : शासनाने जाहिर केलेल्या तलाव, जलाशय सुधारीत धोरणानुसार तलावाच्या ठेक्याकरिता मत्स्य व्यवसाय विभागाने आवेदन आमंत्रित केले आहे. जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील 17 तलावांची मुदत 30 जून पर्यंत आहे. या तलावाच कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांनी तलाव ठेका समितीच्या मान्यतेने प्रस्ताव सादर करावे लागणार आहे.

सन 2023-24 वर्षाचे तलाव ठेका प्रक्रियेकरिता मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांनी नोंदणी करणे गरजचे आहे. शासानाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार तलावाच्या किंवा जलाशयाच्या निर्धारीत कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय, अटी व शर्तीच्या अधीन राहून जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीचे मान्येतेने तलाव मासेमारी ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे.

सन 2023-24 वर्षाच्या तलाव ठेका प्रक्रियेकरिता नोंदणीकृत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना करणे आवश्यक आहे. तलाव ठेका नमुना 1, तलाव ठेका मागणीबाबतचा संस्थेचा ठराव आणि अर्ज, संस्था ही भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था म्हणून नोंदणी झालेली असावी, नाहरकत प्रमाणपत्र, उपविधी प्रमाणपत्र, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, संस्था  बंद नसल्याबाबतचे सहकार विभागाचे प्रमाणपत्र, संस्था शासनाचे थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र. संबंधित संस्थेने आपले मागील तीन वर्षाचे अद्यावत लेखापरिक्षण अहवाल सादर करणे, संस्थेच्या उपविधीनुसार संस्थेचे कार्यक्षेत्र नमूद असलेल्या उपविधी पृष्ठांची सत्यप्रत व 97वी घटना दुरुस्तीची प्रत, प्रतिवर्ष मत्स्य बीज संचयन व मत्स्य उत्पादन अहवाल. मागील ठेका 5 वर्षांच्या कालावधीचा असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे तलाव ठेका मुदत संपुष्टात आलेले तलाव नव्याने ठेक्याने देणे प्रस्तावित आहेत. याबाबतचा शासन निर्णय maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय तांत्रिक कार्यालयाचे नोटिस बोर्डावर उपलब्ध आहे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment