Tuesday 11 April 2023

DIO BULDANA NEWS 11.04.2023

 77 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहिर

*18 मे रोजी मतदान

बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. पोटनिवडणुकांसाठी दि. 18 मे 2023 रोजी मतदान होणार असून दि. 19 मे 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्‍त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 77 ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

सर्व ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीसाठी दि. 18 एप्रिल 2023 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र दि. 25 एप्रिल 2023 ते दि. 2 मे 2023 दरम्यान दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. मतदान दि. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी दि. 19 मे 2023 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दि. 24 मे 2023 रोजी निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

00000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना

नामांकीत शाळेत प्रवेशाची संधी

बुलडाणा, दि. 11 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अकोला येथील प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला तसेच नजीकच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत विनामुल्य‍ प्रवेश अर्ज मिळतील. विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून, तसेच नजीकच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा.

अर्ज सादर करताना विद्यार्थी इतर कोणत्याही शाळेत प्रवेशीत नसावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 8 मे 2023 आहे. पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. जातीचा दाखलाची साक्षांकीत प्रत सोबत जोडावी. पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्षे पूर्ण असावे. सोबत जन्मतारखेचा पुरावा जोडावा. पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाखाच्या आत असावे. यासाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. तसेच विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमती पत्र जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. अपूर्ण कागदपत्रे, तसेच खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 11 : जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, तहसीलदार वैशाली डाबेराव, संजय बंगाडे, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment