DIO BULDANA NEWS 17.04.2023

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी समता दौड रॅली

बुलडाणा, दि. 17 : समता पर्व निमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता दौड रॅली पार पडली. रॅलीमध्ये समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागावर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बुलडाणा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह बुलडाणा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दलित मित्र पुरस्कार प्राप्त नागरीकांचा शाल आणि श्रीपळ देऊन सत्कार केला. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे संशोधन अधिकारी मनोज मेरत, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड, ॲड. धनराज जयपाल आदी उपस्थित होते.

जयंतीनिमित्ताने ॲड. धनराज जयपाल यांचे ‘महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुजनासाठी योगदान’ याबाबत व्याख्यान पार पडले. यावेळी ॲड. जयपाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील क्रांतीकारी घटना, त्यांच्या जीवनातील संघर्ष जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यासोबतच त्यांना अभिप्रेत असलेले संविधानिक भारत घडविणे आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी जातीपाती आणि धर्म विरहित एकसंघपणे सजगतेने सामाजिक क्रांतीचा रथ गतीमान करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीराव फुले यांचे विचार वाचून सर्वांनी त्याचे अनुकरावे, असे आवाहन केले.

00000



नेहरू युवा केंद्र कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

बुलडाणा, दि. 17 : नेहरू युवा केंद्र कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी नेहरू युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, कृषी विभागाचे लेखा अधिकारी दिलीपसिंग राजपूत, माजी नगरसेवक राजेश शेळके, धनंजय चाफेकर, किशोर गव्हाणे, विलास सोनोने, यश चाफेकर उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या