Posts

Showing posts from December, 2022

DIO BULDANA NEWS 29.12.2022

  एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन *10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत बुलडाणा, दि. 29 : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रवेश परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. या प्रवेश परिक्षेसाठी दि. 10 जानेवारी, 2023 पर्यत अर्ज प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र आहेत. सर्व मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्याकडुन भरुन घेऊन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज शासक...

DIO BULDANA NEWS 28.12.2022

Image
  विभागस्तर शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुलडाणा, दि. 28 :   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 28 ते दि. 29 डिसेंबर 2022 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित विभागस्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुले-मुली खेळाडूच्या किक बॉ‍क्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक तुपकर, दिवानसिंग मानसिंग जाधव, ॲड. दिपकदादा पाटील, अरविंद अंबुसकर, अनिल अंबुसकर उपस्थित होते. श्री. गायकवाड यांनी क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन होण्यासाठी, तसेच युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी स्पर्धा उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय अंबुसकर, रोशनी अंबुसकर, प्रविण राऊत, गायत्री दिग्रसकर, कृष्णा कथडे, रणजित कथडे हे पंचाधिकारी आहेत. स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, वरिष्ठ लिपिक विजय बोदडे, व्यवस्थापक ...

DIO BULDANA NEWS 27.12.2022

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार शामला खोत आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 000000 जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणरे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी जिल्हा मुख्यालयी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली    आहे. या कक्षासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते   हे  पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी, सहाय्यक करमणूक कर अधिकारी के. व्ही. पाटील, महसूल सहाय्यक राजशिष्टाचार कक्षाचे महसूल सहाय्यक शिवशंकर अशोक रिंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प...

DIO BULDANA NEWS 26.12.2022

  गटई कामगारांनी स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन बुलडाणा, दि. 26 :   जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल मिळण्यासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यानी आपले अर्ज दि. 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटविलेला व परिपूर्ण अर्ज सादर करावा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसुचित जातीचा असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेला उत्पनाचा दाखला आवश्यक राहणार आहे. अर्जदार वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल, ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावनी बोर्ड (कॅटॉनर्मेन्ट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्व:मालकीची असावी इत्यादीपैकी एक प्रकारचे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्...