DIO BULDANA NEWS 15.11.2022
बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 15 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, निवडणूक उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, तहसिलदार प्रिया सुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000
Comments
Post a Comment