लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना बुलढाणा, (जिमाका) दि. 10: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील अर्जदाराकडून दि. 12 मार्च 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयाला सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेचे 40 उद्दिष्ट आहे. थेट कर्ज योजनेंतर्गत 1 लाखामध्ये महामंडळाचे अनुदान रक्कम 10 हजार रूपये आणि 5 टक्के लाभार्थी सहभाग हा 5 हजार रुपये आहे. उर्वरीत 85 हजार महामंडळाचे कर्ज राहणार आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात येत आहेत. कर्जाचे अर्ज दि. 12 मार्च 2025 पर्यंत दिले जातील. यातील पूर्ण असलेले अर्ज स्विकारले ...
" सातपुडा, अजिंठा रांगांनी सजले । निसर्गसौंदर्य अलौकिक हो लाभले ।। म्हणतात याला विदर्भाचे प्रवेशद्वार । लोणार सरोवर निसर्गाचा अद्वितीय आविष्कार ।। जन्मभूमी ही स्वराज्यजननी जिजाऊंची । भूमी ही पावन इतिहासाची साक्षीदार ।। 'विदर्भाची पंढरी' शेगाव नगरीला मान । पूर्णा, पैनगंगेने लाभले सुपीकतेचे वरदान ।। बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती । बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती ।।" बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातूनच यावे लागते म्हणून बुलडाणा जिल्ह्याला 'विदर्भाचे प्रवेशद्वार' देखील म्हंटल्या जाते. जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बु...
दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी बुलढाणा, (जिमाका) दि. 10: बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. बाळ दत्तक कोण घेऊ शकतो- भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. या दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नी यांची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला हि दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडु शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो. बाळ दत्तक घेण्यासाठीची पालकांची वयोमर्यादा- दोन वर्षाच्या आतील बालक असल्यास भावी दत्तक माता पिता यांची संयुक्तिक कमाल वयोमर्यादा 85 वर्ष, तर भावी एकल माता पिता यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष, दोन ते चार वर्षापर्यंतचे बालक ...
Comments
Post a Comment