DIO BULDANA NEWS 04.11.2022

 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 4 : पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

पालकमंत्री श्री. पाटील हे आज, दि. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता पानेराखेडी येथील कानु सतीमाता देवस्थान येथे आयोजित बेलदार भटका समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहतील.

00000

पदवीधर मतदारसंघासाठी शनिवार, रविवार मतदार नोंदणी सुरु राहणार

बुलडाणा, दि. : अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी शनिवार दि. नोव्हेंबर आणि रविवार दि. नोव्हेंबर २०२२ रोजी मतदार नोंदणी सुरु राहणार आहे

पदवीधर मतदारसंघासाठी नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यात दि. नोव्हेंबर २०२२ पर्यंत पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे नमुना १८ सादर करून नोंदणी करता येणार आहे. यात पदवीधरांना नोंदणी करता यावी, यासाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मतदार नोंदणी अर्ज स्विकारण्यात येणार आहे . नोंदणीमध्ये मतदारांची सोय व्हावी, यासाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दोन्ही दिवशी मतदार नोंदणी सुरू राहणार असल्याने पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी केले आहे.

०००००

 


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या