Thursday 1 April 2021

DIO BULDANA NEWS 1.4.2021

 मिशन बिगेन अंतर्गत 15 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

  •   रात्री 8 वाजे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी

बुलडाणा,(जिमाका)दि. 1 : जिल्ह्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता 15 एप्रिलपर्यंत मिशन बिगेन अगेन अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.  तसेच जिल्ह्यात रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू असणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे.

    या आदेशान्वये जिल्ह्यात सर्व प्रकारची सिनेमागृहे / नाट्यगृहे / बहुचित्रपट गृहे, मॉल्स, प्रेक्षकगृहे, व्यायामशाळा व हॉटेल, उपहारगृहे, खाद्यगृहे सकाळी 8 ते रात्री 7.30 पर्यंत 50 टक्के क्षमतेसह कोविड नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी राहील. त्यानंतर हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, स्वीटमार्ट्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधेस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे.  दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. नगर पालिका तसेच क्षेत्राबाहेर ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना त्यांचकेडील 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरू राहतील.    संबंधीत आस्थापनांनी कोविड च्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांसह सुरू राहतील.  सर्व प्रकारचे  शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 50 टक्के कर्मचारी संख्या  ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. लग्न समारंभाकरीता वधु,वर, बॅंड पथक व मंडप डेकोरसह 50 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयाच्या मालकाविरूद्ध दंड आकारण्यात येईल. तसेच सदर मंगल कार्यालये ही केंद्र शासनाने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसुचीत असेपर्यंत बंद करण्यात येतील.  अंत्यविधी करिता 20 व्यक्तींना परवानगी असेल.

    विविध प्रकारचे निर्मिती उद्योग हे त्यांचे पुर्ण क्षमतेसह सुरू राहतील. तथापि याबाबत सामाजिक अंतर व कोविड च्या प्रतिबंधीत उपाययोजना अंतर्गत त्यांची कर्मचारी संख्या ही नियंत्रीत ठेवतील. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित ठेवण्याकरीता सर्व प्रकारचे निर्मिती उद्योग हे स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार त्यांच्या कामाच्या वेळा वाढवून त्यानुसार नियंत्रण ठेवतील.  उद्योगांमध्ये योग्य पद्धतीने मास्क घातल्याशिवाय प्रवेश असणार नाही. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही. यासाठी आवश्यक तपासणी यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. सॅनीटायझरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. या नियमांचे उल्लंघन करणारे उत्पादक उद्योग केंद्र शासनाने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसुचीत असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच उद्योग मालकाविरूद्ध दंड आकारण्यात येवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शासकीय कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी केवळ लोकप्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात यावा व इतर अभ्यागतांना केवळ अत्यावश्यक कामाकरीताच प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले असेल त्यांना विभाग प्रमुखांनी विशेष पास द्यावा.

        सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात येतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. आंतर जिल्हा बस वाहतूक, सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक एकूण प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोशल डिस्टन्स व निर्जंतुकीकरण करून सुरू ठेवण्यास परवानगी राहील.  चार चाकी वाहनात चालक व्यतिरिक्त तीन प्रवाशी, तीनचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवाशी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क लावून दोन व्यक्तींना परवानगी असेल.  ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. निर्बंधासह खुल्या मैदानावर शारिरीक कसरती व मॉर्निंग वॉक ला परवानगी असेल.  तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, दिंडी  व स्नेहसंमेलन, मेळावे, सभा या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणी 10 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. 

  आगामी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50 टक्के क्षमतेने सोशल डिस्टसिंग, सॅनीटायझर, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करून सुरू राहतील. सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रूग्णालय बंदचा आधार घेवून रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. जिल्ह्यातील ॲम्बुलन्स सेवा 24 तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतुक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. या कालावधीत संपन्न होणाऱ्या पुर्वनियोजित परीक्षा त्यांचे वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. तसेच परीक्षार्थी यांना सदर कालावधीमध्ये परीक्षेचे ओळखपत्र व पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. कोविडची लक्षणे दिसून येताच संबधित कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दी नियंत्रण करून हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन याठिकाणी होणे आवश्यक आहे. गर्दी जमवून करण्यात येणारी निर्दशने, मोर्चे, रॅली, आंदोलने यांना बंदी राहील. मात्र केवळ 5 व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधीत शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे. 

        या कालावधीत रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. मात्र आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार, बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देणाऱ्या ऑटोरिक्षा यांना मुभा राहील. मात्र ऑटोमधून चालक वगळता केवळ देान प्रवाशांनाच प्रवास करता येईल.

 गृह विलगीकरणातील रूग्ण ज्या वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली असेल, त्यांनी सर्व प्रकारची दक्षता घ्यावी. संबंधित रूग्ण हा पॉझीटीव्ह असल्याबाबतचा फलक हा त्यांचे घरासमोर ठळकपणे दिलेस, असा लावण्यात यावा. त्याचा 14 दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी त्यामध्ये नमूद करावा. कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. या रूग्णाच्या कुटूंबातील सदस्यांनी बाहेर फिरणे टाळावे, अत्यावश्यक बाबीसाठी घराबाहेर पडावयाचे झाल्यास मास्कशिवाय बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन केल्यास अशा रूग्णास तात्काळ कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येईल.  या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय दिशा निर्देशानुसार अशा आहेत सुचना

सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच सामाजिक अंतरच्या नियमांचे पालन करण्यात यावे. कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखावे. दुकानांमध्ये खरेदी करतेवेळी दुकानदार यांनी दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने थुंकू नये. हा गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींचा वापर करू नये. या कालावधीत जास्तीत जास्त लोकांनी घरूनच काम करण्याची मुभा द्यावी. त्यासाठी कार्यालय, दुकान, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांचे कामाच्या वेळा निश्चित कराव्यात.प्रवेश व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅण्डवॉश सॅनीटायझर याची व्यवस्था करण्यात यावी. कार्यालये, आस्थापनांनी वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. कोणत्याही व्यक्तीने मास्क न वापरल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अशा व्यक्तीवर 1000 रूपये दंड आकरण्यात येईल.

 

 

प्रतिबंधीत क्षेत्रासाठी सूचना

जिल्ह्यात यापूर्वी ज्याप्रकारे प्रतिबंधात्मक क्षेत्राचे वर्गीकरण करण्यात आले आहे, त्यानुसार स्थानिक प्राधिकरणाने याबाबत केलेले आदेश यापुढेही लागू राहतील. प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोविड बाधीत रूग्ण आढळल्यास त्याबाबत नियमानुसार 14 दिवस विलगीकरणाची कार्यवाही करावी.

************

एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

  • कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
  • मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात
  • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 5 एप्रिल 2021 रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल करून तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

       तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

********

शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर विवरण पत्र सादर करावे

  • 30 एप्रिल 2021 अंतिम मुदत

बुलडाणा ,(जिमाका) दि. 1: सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 अन्वये या कार्यालयास सादर करावयाची आहे.

    माहे मार्च 2021 अखेरचे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे व त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.  सदर विवरण पत्र सादर करण्याची अंतीम 30 एप्रिल 2021 आहे. त्यानंतर वेबपोर्टलवरील ही सुविधा बंद होणार आहे. कसुरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.  तरी सर्व आस्थापना /उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पध्दतीन संकेतस्थळावर सादर करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन ई आर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र .07262- 242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सु. रा झळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

**********

मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनीटकरीता अर्थसहाय्य मिळणार

  • राष्ट्रीय पशुधन अभियान

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जिल्ह्याकरीता राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती करीता सायलेज बेलर मशिन युनीट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गौरक्षण संस्था यांना सदर योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. या योजनेसाठी प्रति युनीट 20 लक्ष रूपये खर्चापैकी 50 टक्के 10 लक्ष रूपये केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य राहणार आहे. उर्वरित 50 टक्के 10 लक्ष रूपये संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहे. सदरचा निधी हा  अनुसूचित जाती उपयोजनेतील असल्याने योजनेकरीता जिल्ह्यामध्ये एक युनीट स्थापन करावयाचे आहे. तरी  अनुसूचित जाती प्रवर्गातील संस्थांनीच अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 मे 2021 आहे. अर्ज पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे, तरी पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी बोरकर यांनी केले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 4377 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 710 पॉझिटिव्ह

• 509 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5087 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4377 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 710 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 397 व रॅपीड टेस्टमधील 313 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 483 तर रॅपिड टेस्टमधील 3894 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4377 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 153, बुलडाणा तालुका : झरी 10, मातला 2, बिरसिंगपूर 1, म्हसला 2, धाड 1, भादोला 2, येळगांव 1, साखळी खु 1, कोलवड 1, नांद्राकोळी 5, पाडळी 2, घाटनांद्रा 1, बोंदेगांव 1,  पिं. सराई 4, रायपूर 1,  सव 1, देऊळघाट 1,  डोंगरखंडाळा 1, डोमरूळ 3,   खामगांव शहर :99 , खामगांव तालुका : मांडका 1,  जयपूर लांडे 1 , घाटपुरी 4, कलोरी 2, पिं. राजा 3, अंत्रज 1, सुटाळा 4, टेंभुर्णा 2, पिंप्री कोरडे 3, निरोड 1, आवार 1, आंबेटाकळी 1,  शेगांव शहर : 5,   शेगांव तालुका : नागझरी 1,  मच्छींद्रखेड 1, वरखेड 1, जवळा 1,   जलंब 1, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : आलसगांव 3, तिवडी 1, जामोद 1,  संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, वकाणा 1, वरवट 1,  चिखली शहर : 41,  चिखली तालुका : कोलारा 4, बेराळा 2, येवता 2, संजोळ 1,  बोरगांव काकडे 1, टाकरखेड 2, मेरा बु 1, पळसखेड दौलत 2, पेठ 1,  रानअंत्री 1, ब्रम्हपूरी 2, करवंड 1, खंडाळा 1, अंचरवाडी 1, आंधई 1, शेलसूर 1,  पिंप्री आंधळे 1, आमखेड 3, सवणा 2, एकलारा 1, शेलूद 2, बोरगांव काकडे 1,  धोत्रा 3, भालगांव 1, एकलारा 3, गांगलगांव 1, भोरसा भोरसी 1,  भरोसा 1, केळवद 1, मंगरूळ नवघरे 1, घानमोडी 1, वाघापूर 2, शेलगांव आटोळ 2,  

   मोताळा शहर : 5,  मोताळा तालुका :खामखेड 1, फर्दापूर 1, आडविहीर 1, आव्हा 3, जयपूर 1,  चिंचपूर 1, पिं. देवी 1, राजूर 1, पिंप्री गवळी 2, धा. देशमुख 1,परडा 1, तरोडा 10, बोराखेडी 1, सांगळद 1, तपोवन 1, धा. बढे 3, लोणघाट 3,     मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : बोरी 1, लोणी गवळी 1, डोणगांव 1, नांदुरा शहर : 15,  नांदुरा तालुका : टाकरखेड 1, दहीवडी 2, शेंबा 1,  वडाळी 2,  गव्हाड 2, इसापूर 3, दादगांव 2, वडनेर 15, लोणवडी 1, शेलगांव मुकुंद 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 34, कुंड बु 3, मोरखेड 1, विवरा 1, भालेगांव 2, झोडगा 1, दसरखेड 2, घिर्णी 1, माकनेर 1, दाताळा 1, धरणगांव 3, वडजी 1, भाडगणी 1,  दे. राजा शहर : 20,  दे. राजा तालुका : अंढेरा 1, डोढ्रा 1,  सिनगांव जहा 1, सातेगांव 2, मेंडगांव 1, वाकी 1, दे. मही 4, टाकरखेड 4,    सिं. राजा शहर :9 ,  सिं. राजा तालुका : महारखेड 1,आंचली 1, वाघारी 1, शेलगांव राऊत 1, शेलगांव काकडे 1, साखरेखर्डा 2, शेंदुर्जन 2, बाळसमुद्र 1,   लोणार शहर : 7 , लोणार तालुका : बिबी 3, महारचिकना 3, पिं. अढाव 1, गणपूर 1,  खापरखेड 1,  कुंदेफळ 1, सुलतानपूर 1, अंजनी 1, गुंधा 3,  पिं. कोळ 1, पळसखेड 1, वढव 3,  परजिल्हा जवळी बाजार जि. औरंगाबाद 1, पिंपळगांव रेणुकाई ता. भोकरदन 1, औरंगाबाद 1,  बार्शी जि. सोलापूर 1, पाचोरा जि जळगांव 1, वालसावंगी ता. भोकरदन 1, जामनेर जि. जळगाव 1, अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 710 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान रायपूर ता. बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरूष, भालेगांव ता. मलकापूर येथील 65 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 68 वर्षीय पुरूष, जळकी बाजार जि. औरंगाबाद येथील 55 वर्षीय महिला, खेर्डा ता. जळगांव जामोद येथील 80 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 53 वर्षीय पुरूष, भोकरदन जि. जालना येथील 78 वर्षीय पुरूष, मोताळा येथील 58 वर्षीय पुरूष व जळगांव जामोद येथील 71 वर्षीय पुरूष  रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     जिल्ह्यात कोविड निदानासाठी 3674 नमुने घेण्यात आले आहे.  तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 509 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 223090 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 32499 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 32499 आहे. 

   आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 223090 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 38454 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 32499 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 5686 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 269 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

********

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्यासाठी

उपनिबंधक कार्यालयाकडून अर्ज आमंत्रित

बुलडाणा,(जिमाका) दि.1 :  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा यांच्यावतीने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम अंतर्गत चौकशी/ प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल ) तयार करण्यासाठी सहकार खात्यातुन सेवा निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पुर्ण न झालेले), निवृत्त न्यायाधिश, वकील, चार्टड अकाउन्टंट, यांच्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्जाचे विहीत नमुने  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा /सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तालुका यांच्या कार्यालयात दिनांक 01 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळतील. याबाबतची जाहीर सुचना कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.   अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, प्रशासकीय सहकार संकुल बोथा रोड, बुलढाणा दु.क्र.0732-244460 या कार्यालयात संपर्क साधावा.  विहीत नमुन्यातील अर्ज सदर कार्यालयात उपलब्ध असून इच्छूकांनी अर्ज सादर करावे, असे  जिल्हा उपनिबंधक आर. एल राठोड यांनी कळविले आहे.

*****

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे

  • समाज कल्याण विभागाचे आवाहन
  • 15 एप्रिल 2021 अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि. 1  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2021 आहे. ही अंतिम मुदतवाढ आहे.

   तरी सन 2020-21 या वर्षाकरीता प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सदर महाडीबीटी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या पोर्टलवर सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या वेळेच्या आत अर्ज भरून लाभ घ्यावा. प्राचार्यांनी सदर अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवावे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                                                ********

 

 


No comments:

Post a Comment