Friday 30 April 2021

DIO BULDANA NEWS 30.4.2021

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 29 एप्रिल रोजी 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. दिनांक 29 एप्रिल रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 39 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 35,रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 11, निकम हॉस्पीटल 10, जाधव पल्स हॉस्पीटल 13, सहयोग हॉस्पीटल 22, आशिर्वाद हॉस्पीटल 30, सिद्धीविनायक हॉस्पीटल 39, काटकर हॉस्पीटल 14, शिवसाई हॉस्पीटल 30, संचेती हॉस्पीटल 19, न्यु लाईफ कोविड हॉस्पीटल 1, सोळंकी हॉस्पीटल 7, सावजी हॉस्पीटल 14, चिखली : योगीराज हॉस्पीटल 45, हेडगेवार हॉस्पीटल 39, गुरूकृपा हॉस्पीटल 16, तायडे हॉस्पीटल 31, दळवी हॉस्पीटल 24, पानगोळे हॉस्पीटल 20, खंडागळे हॉस्पीटल 15, गंगाई हॉस्पीटल 15, जैस्वाल हॉस्पीटल 16, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 15, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 42, कोलते हॉस्पीटल 18, राईट केअर हॉस्पीटल 9, आशिर्वाद हॉस्पीटल 11, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 35, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 23, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 19, शामसखा हॉस्पीटल 41, खामगांव : चव्हाण हॉस्पीटल 9, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 24, श्रीराम हॉस्पीटल 5, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 23, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 26, मापारी हॉस्पीटल 26, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 15, गोविंद क्रिटीकल 13, श्री. गजानन हॉस्पीटल 35, अजंता हॉस्पीटल 6, मेहकर मल्टीस्पेशालीटी 26, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 7, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 20, मी अँड आई हॉस्पीटल 7, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 21, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 5 असे एकूण 1000 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सदर साठा फ्रंटलाईन वर्कर तथा डॉक्टर्स, इतर कर्मचारी वर्ग तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याकरीता शासनाचे सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये राखीव ठेवण्यात आला आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भुषण अहीरे यांनी कळविले आहे. ***** पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावांसाठी टँकर मंजूर बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा, पोफळी व सि.राजा तालुक्यातील दरेगांव येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टेकडी तांडा येथील 350 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे टँकर दररोज 12 हजार 50 लिटर पाणीपुरवठा करणार आहे. तसेच पोफळी येथील 3000 लोकसंख्येकरीता दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 60 हजार लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. तर दरेगांव येथील 2328 लोकसंख्येकरीता एक टॅंकर 62 हजार 420 लीटर पाणीपुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) मलकापूर, सिं.राजा यांनी कळविले आहे. ****** पाणी टंचाई निवारणार्थ 3 गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर 15 गावांसाठी विंधन विहीरींनाही मंजूरी बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : पाणीटंचाई निवारणार्थ सिं.राजा तालुक्यातील रताळी, निमगांव वायाळ व राहेरी खु या गावांसाठी नळ योजना विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील 15 गावांसाठी पाणी टंचाई निवारणार्थ विंधन विहीरींना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये शिरवा, काबरखेड, सहस्त्रमुळी, धोनखेड, चावर्दा, पिंपळगांवनाथ, चिंचपूर, सांगळद, डिडोळा खु, मोहेगांव, इसालवाडी, गिरोली, कोथळी, खडकी व चिंचखेडनाथ या गावांचा समावेश आहे. या गावांमधील संबधित ग्रामपंचायतीने वीज देयक न भरल्यामुळे नळ योजना बंद असेल, तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम संबंधिताकडे भरून नळ योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करावा. कामे सुरू होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांनी करावा. सदर मंजूर कामे इतर निधीतून झालेले नाही अथवा प्रस्तावित नाही, याची खात्री केल्यानंतरच मंजूर कामास सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. **** मे महिन्यात आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी शासनाने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत आदेश दिले आहेत. लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात येतो. मात्र जिल्ह्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने माहे मे 2021 चा सोमवार 3 मे 2021 रोजी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे यांनी कळविले आहे. ****** राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतुक सेवेचे महाकॉर्गो नामकरण मालवाहतुकीसाठी संपर्क करण्याचे महामंडळाचे आवाहन बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : राज्य परिवहन महामंडळाने शासनाच्या 18 मे 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार मालवाहतूक सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश माफक दरामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, खाजगी व्यवसाय, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांकरीता माल वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे व महामंडळास उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे हा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही 24 तास अविरहीत सेवा, पारदर्शकता, सुरक्षितपणे, वक्तशीर व माफक्‍ दात उपलब्ध करून देण्यात येत आहे. महामंडळाच्या मालवाहतूक सेवेचे महाकॉर्गो या नावाने नामकरण करण्यात आले आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे 022-23024068 या दुरध्वनी क्रमांकावर मालवाहतुकीच्या सेवेसंबंधी व्यवसाय धारकांकरीता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मालवाहतुकीबाबत कोणत्याही प्रकारची मालवाहूतक असल्यास खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. आगार : बुलडाणा - आगार प्रमुख श्री. मोरे 8208952614, सहा वाहतुक अधिकारी श्री. साळवे 8087378154 व मालवाहतुक लिपीक श्री. भांबुरकर 7020705456, चिखली - आगार प्रमुख श्री. वाकोडे 9420242097, सहा वाहतुक अधिकारी श्री. जोगदंडे 9881564020 व मालवाहतुक लिपीक श्री. सानप 9923836193, मेहकर - आगार प्रमुख श्री. कोळपे 8329312518, सहा वाहतुक अधिकारी श्री. नागरे 9284089660 व मालवाहतुक लिपीक श्री. शिंदे 9561775834, खामगांव - आगार प्रमुख श्री. पवार 9465940627, सहा वाहतुक अधिकारी श्री. पवार 9763703744 व मालवाहतुक लिपीक श्री. वनारे 9604401091, मलकापूर - आगार प्रमुख श्री. दराडे 9923845605, सहा वाहतुक अधिकारी श्री. वांदे 9890626544 व मालवाहतुक लिपीक श्री. राठोड 8999287504, शेगांव - आगार प्रमुख श्री. भिवटे 8329773384, सहा वाहतुक अधिकारी श्री. मुसले 9922496649 व मालवाहतुक लिपीक श्री. सपकाळ 8830029350, जळगांव जामोद - आगार प्रमुख श्री. मास्कर 9881962173 व मालवाहतुक लिपीक श्री. कोठे 7448059197 तसेच विभाग नियंत्रक 07262-242593, यंत्र अभियंता श्री. धनाड 8275325642, विभागीय वाहतुक अधिकारी श्री. कच्छवे 8830279722 व विभागीय भंडार अधिकारी श्री. पाचपवार यांच्या 8055829982 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे. ***** राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. ***** कोरोना अलर्ट : प्राप्त 3841 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 1218 पॉझिटिव्ह 1021 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5059 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3841 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1218 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 927 व रॅपीड टेस्टमधील 291 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 921 तर रॅपिड टेस्टमधील 2920 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3841 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 14, बुलडाणा तालुका : मासरूळ 1, डोमरूळ 2, धाड 10, सावळी 2, म्हसला 1, करडी 1, रायपूर 1, पळसखेड भट 1, केसापूर 2, वरवंड 4, बोरखेड 4, सातगाव 1, साखळी 1, बिरसिंगपूर 1, गिरडा 12, दुधा 6, कोलवड 1, सुंदरखेड 3, सिंदखेड 1, दे. घाट 2, जामठी 1, माळविहीर 1, तांदुळवाडी 1, चौथा 1, देवपूर 1, मातला 1, इजलापूर 2, शेकापूर 1, दहीद 1, मोताळा शहर : 13, मोताळा तालुका : उबाळखेड 4, राजूर 1, अंत्री 9, जयपूर 5, पुन्हई 5, मुर्ती 3, धा. बढे 14, कोऱ्हाळा 1, बोराखेडी 6, सारोळा मारोती 7, तांदुळवाडी 1, माळेगांव 1, खरबडी 3, गोसिंग 1, चिंचपूर 1, सावळा 1, तळणी 3, भोरटेक 1, काबरखेड 1, आडविहीर 4, कुऱ्हा 1, खांडवा 1, तपोवन 1, सिंदखेड 1, लपाली 1, पान्हेरा 1, ब्राम्हंदा 2, वडगांव 2, महालपिंप्री 2, गुळभेली 1, रिधोरा 1, डिडोळा 2, तालखेड 1, वरूड 1, इब्राहिमपूर 2, कोथळी 2, तरोडा 3, जहागीरपूर 1, निपाणा 3, घुसर 1, चावर्दा 1, खामगांव शहर : 67, खामगांव तालुका : पारखेड 3, कोलोरी 1, हिंगणा 1, आंबेटाकळी 1, शिर्ला 1, गारडगांव 1, सारोळा 1, पाळा 3, पिं. देशमुख 2, लांजुड 1, चिंचपूर 1, उमरा 1, बोरी अडगांव 5, शेगांव शहर : 27, शेगांव तालुका : टाकळी विरो 1, झाडेगांव 1, चिंचोली 1, जवळा 1, वाझेगांव 1, पाडसूळ 1, तरोडा 2, कोद्री 1, सगोडा 1, चिखली शहर :10 , चिखली तालुका : एकलारा 5, चंदनपूर 1, येवता 1, डोंगरशेवली 1, किन्होळा 1, कोनड 1, मंगरूळ 1, पळसखेड सपकाळ 2, हातनी 1, कोलारा 1, पेनटाकळी 1, सवणा 1, मेरा बु 1, शेलगांव आटोळ 1, पळसखेड दौलत 1, चांधई 1, मलकापूर शहर :74, मलकापूर तालुका : वाघुड 3, देवधाबा 1, दुधलगांव 1, दाताळा 5, भानगुरा 1, उमाळी 2, हरसोडा 3, खामखेड 3, वाकोडी 2, बेलाड 1, वडजी 1, शिराढोण 1, तांदुळवाडी 3, भाडगणी 4, तिघ्रा 1, माकनेर 2, कुंड 3, म्हैसवाडी 1, लोणवडी 1, धरणगाव 1, हरणखेड 1, दे. राजा शहर : 35, दे. राजा तालुका : चिंचखेड 2, दे. मही 15, निमखेड 2, डोईफोडेवाडी 1, गिरोली 3, अंढेरा 6, सिनगांव जहा 3, सरंबा 4, तुळजापूर 1, पिंपळगांव 1, किन्ही 1, सावखेड नागरे 2, नारायणखेड 5, पाडळी शिंदे 2, खळेगांव 1, डोलखेडा 1, खल्याळ गव्हाण 1, टेंभुर्णी 1, पळसखेड 1, खैरव 2, शिवणी आरमाळ 3, धोत्रा 1, मेंडगांव 1, रोहना 2, गारखेड 2, मेहुणा राजा 1, करवडा 2, नागणगांव 1, जुमडा 1, सिं. राजा शहर : 5, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, साखरखेर्डा 64, झोटींगा 4, आंबेवाडी 1, सायाळा 5, राहेरी 3, कि. राजा 2, मांडवा 1, दरेगांव 7, गोरेगांव 2, हिवरा गडलिंग 3, शेंदुर्जन 6, सवडत 4, गुंज 6, शिंदी 6, ताडेगांव 1, जांभोरा 2, वाघोरा 15, पिंपरखेड 1, आडगांव राजा 1, जागदरी 2, सांगवी 1, महारखेड 3, पिंपळगांव 2, मोहाडी 2, वउाळी 2, वरूडी 5, तांदुळवाडी 1, बाळसमुद्र 8, मेहकर शहर : 54, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 4, कनका 1, जनुना 1, डोणगांव 5, उमरा 1, तांदुळवाडी 1, कल्याणा 2, शहापूर 1, केनवड 1, पाळी 1, साब्रा 1, खंडाळा 1, जानेफळ 2,हिवरा साबळे 1, नांद्रा धांडे 2, गोरेगांव 3, आमखेड 3, कळमेश्वर 3,विश्वी 1, अंजनी 1, भालेगांव 1, दादुलगव्हाण 1, बरटाळा 1, वडगांव माळी 1, संग्रामपूर तालुका :लाडणापूर 1, वानखेड 1, काटेल 1, जळगांव जामोद शहर : 40, जळगांव जामोद तालुका : पिं. काळे 1, कुरणगड 2, भेंडवळ 13, सुलज 5, दादुलगाव 10, आसलगांव 2, पळशी सुपो 1, सुनगांव 5, बोराळा 5, चांगेफळ 2, इस्लामपूर 1, धानोरा 5, गोधेगांव 1, निमखेड 1,सावरगांव 1, खांडवी 1, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका :डिघी 6, वडनेर 1, धानोरा 1, चांदूर बिस्वा 1, शेलगांव मुकूंद 2, टाकरखेड 4, पोटा 2, काटी 1, हिगणे गव्हाड 1, तिकोडी 5, खैरा 2, निमगांव 6, वाडी 5, महाळुंगी 2, पलसोडा 2, पिं. अढाव 1, बुर्टी 2, भुईशिंगा 1, लोणवडी 1, पोटळी 1, कोदरखेड 3, अवधा 1, तरवाडी 1, वडाळी 4, माळेगांव 1, लोणार शहर :24 , लोणार तालुका : सावरगांव 1, पळसखेड 10, वेणी 1, जांभूळ 1, पिंपळनेर 6, टिटवी 5, बिबी 3, वडाळी 1, रायगांव 6, धायफळ 8, उदनापूर 1, वडगांव तेजन 1, वढव 3, येसापूर 1, सरस्वती 5, तळणी 1, कोनाटी 2, शारा 3, पिंपळखुटा 5, शिवणीजाट 1, खळेगांव 3, चिखला 5, दे. कोळ 9, कळपविहीर 1, खंडाळा 1, कि. जट्टू 2, शिंदी 1, हिवराखंड 1, कोयाळी 5, भुमराळा 1, वझर 2, वडगांव 7, खुरमपूर 1, अंजनी 1, पार्डी 22, दादुलगव्हाण 1, बोरी 4, तांबोळा 4, दिपखेड 2, नांद्रा 1, चिंचोली 4, मोप 1, बोरखेडी 1, धानोरा 1, पार्डा 5, परजिल्हा लोहारा ता. बाळापूर 3, नागपूर 1, आलेवाडी ता. अकोट 1, राळेगांव 1, जामनेर 1, भारज 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 1218 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान हिवरा आश्रम ता. मेहकर येथील 70 वर्षीय महिला, पोटळी ता. नांदुरा येथील 83 वर्षीय पुरूष, किनगांव राजा ता. सिं. राजा येथील 45 वर्षीय महिला, मधु मालती नगर मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 1021 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 355959 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 56601 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 56601 आहे. आज रोजी 4961 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 355959 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 63889 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 56601 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6878 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 410 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व समुपदेशन सत्र कार्यशाळा उत्साहात बुलडाणा,(जिमाका) दि.30 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा व जिल्हा परिषद, बुलडाणा आणि श्री बालाजी संस्थान दे.राजा व्दारा संचालित श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देऊळगाव राजा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २७ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले. सदर रोजगार मेळाव्यात नामवंत कंपन्यांचे विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया मध्ये सहभाग नोंदविला असून दहावी, बारावी, पदवीधर, पदविकाधारक तसेच आय.टी.आय.पास उमेदवार व सेवायोजन कार्यालयातील प्राप्त केलेल्या यूजर आयडी पासवर्डचा वापर करून उमेदवारांना ऑनलाईन अप्लाय करुन या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला व सोबतच कोविड - १९ विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन काळात उमेदवारांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचे Shri Vyankatesh College Deulgaon Raja या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दि. २७ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले. सहायक आयुक्त सुधाकर झळके सहाय्यक यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये ऑनलाइन रोजगार मेळावा व समुपदेशन कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती दिली. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद बुलडाणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. ए. चोपडे यांनी केले. या कार्यक्रमात कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी आपल्या कंपन्याबद्दलची माहिती उमेदवारांना दिली. प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयक्युएसी कॉर्डीनेटर प्रा. डॉ. एस डी चव्हाण यांनी उमेदवारांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोपान चव्हाण यांनी तर प्रा. डी. एम. शिंबरे यांनी आाभार व्यक्त केले. दि. २८ एप्रिल २०२१ रोजी युनिक अकॅडमी, पुणे येथील प्रा. शरद अशोकराव पाटील यांनी एमपीएससी/ यूपीएससी तयारीबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुधाकर झळके सहभागी कंपन्याकडे असलेल्या रिक्त जागेवर आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त करून घ्यावे असे आवाहन उमेदवारांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. बी. पवार यांनी केले. या कार्यशाळेत करिता 667 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दि. २९ एप्रिल २०२१ रोजी आयुष्यातील बदल आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर आशुतोष साळी, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, ठाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी.व्ही.गोरे होते. दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एस आर काळबांडे, उपायुक्त, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती व तसेच जिल्हा परिषद बुलडाणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश लोखंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर चव्हाण होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी व्यक्त केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय सुधाकर झळके यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोपान चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार अजय चव्हाण, सहाय्यक, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले. हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले आणि त्याचे लाईव्ह प्रक्षेपण सदर यूट्यूब चॅनलवर करण्यात आले. श्री बालाजी महाराज संस्थान दे.राजाचे वंश पारंपरिक विश्वस्त तथा श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. रोजगार मेळाव्याच्या यशस्वितेकरिता श्री सुधाकर झळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा, राजेश लोखंडे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा प्रा. डॉ. सुधीर चव्हाण, आयक्यूएसी कॉर्डीनेटर आणि प्रा. डॉ. अनंत आवटी, समन्वयक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभाग, प्रा. सोपान चव्हाण, प्रा.पी.बी.पवार, प्रा.डी.एम. शिंब्रे, प्रा. सरोज, प्रा.जोशी , सचिन पवार , शफिरउल्ला सय्यद ,राहुल सुरडकर, सविता वाकोडे, शुभांगी ठोसरे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment