Wednesday 7 April 2021

DIO BULDANA NEWS 7.4.2021

 


           दस्त नोंदणीकरीता कोविडचा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य

  • दुय्यम निबंधक कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि 7 :   सहजिल्हा निबंधक वर्ग 1 बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणारे पक्षकारांची संख्या विचारात घेता गर्दी जास्त प्रमाणात होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने दुय्यतम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणाऱ्या पक्षकार यांचेकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. सदर रिपोर्ट पक्षकार उपलब्ध करून देणार नसतील, अशा पक्षकारांना कार्यालयात प्रवेश मनाई राहील. सदरची कार्यवाही 12 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी कोविड 19 चा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल आणावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.

******

                                     दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांनी दक्षता घ्यावी

  • सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि 7 :   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दुय्यक निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करीता येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांनी दक्षता घ्यावी. नागरीकांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येण्यापूर्वी आपली दस्त नोंदणीची वेळ आरक्षीत करून घ्यावी. आरक्षीत वेळेलाच दस्त नोंदणीसाठी यावे, प्रथमत : केवळ दस्त सादर करणाऱ्या एका पक्षकारास व वकीलास (असल्यास) कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्त छाननी, सादरीकरण शिक्का 1 व 2 पुर्ण झाल्यावरच इतर पक्षकारांना दस्तात नमूद नावानुसार क्रमवारी प्रवेश दिला जाईल. पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात आल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात ठरवून दिलेल्या अंतरावरच उभे रहावे, तसेच कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी तोंडाला मास्क, हात सॅनिटायझरने स्वच्छ करून नंतरच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. दस्तावर सह्या करण्यासाठी दस्तातील प्रत्येक पक्षकाराने स्वत:चा पेन सोबत आणावा. एकमेकांचा पेन वापरू नये, नोटीस ऑफ इटिमेंशन फिजीकल फायलिंग सद्यस्थितीत बंद करण्यात आले असून ई फायलिंगचा वर्जन 1 व वर्जन 2 चा पर्याय उपलब्ध आहे. तरी त्याचा वापर करण्यात यावा. दस्त नोंदणी झाल्यानंतर  लगेच कार्यालयाच्या बाहेर पडावे, विनाकारण कार्यालयाच्या आवारात गर्दी करू नये. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे.

******

                       ‘ब्रेक द चेन’ आदेशान्वये आणखी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि 7 :   राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 4 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेनचा कडक निर्बंध असणारा आदेश लागू केला. या आदेशामध्ये नसलेल्या काही अत्यावश्यक सेवा 5 एप्रिल 2021 रोजी च्या सुधारीत आदेशानुसार सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी 6 एप्रिल रोजी सुधारीत आदेश लागू केले आहे.  या आदेशानुसार अत्यावश्यक सेवांमध्ये पेट्रोल पंप व पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डाआ सेंटर्स / क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर्स/ आयटी संबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, फळ विक्रेते, टायर पंक्चरची दुकाने, पुर्वनियोजीत परीक्षा यांचा समावेश करण्यात आला आहे.  तसेच सेबी  किंवा सेबी मान्यताप्राप्त संस्था, रिझर्व् बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डिलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स, सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, वकीलांची कार्यालये, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर आदी खाजगी आस्थापना आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संबंधीत कर्मचाऱ्यांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घ्यावे. शनिवार व रविवार संचारबंदीच्या काळात रेल्वे, बसेस यातून प्रवास  करून आगमन होणाऱ्या प्रवाशांनी अधिकृत तिकिट बाळगावे. जेणेकरून त्यांना संचारबंदीच्या काळात स्थानकापर्यंत किंवा त्यांचे घरापर्यंत जाणे सोयीचे होईल. औद्योगिक कामगारांना कामाच्या शिफ्टनुसार कामाचे ठिकाणी जाण्या / येण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत अथवा शनिवार / रविवार संचारबंदीच्या काळात, खाजगी बसेस , वाहनाने प्रवास करण्यास मुभा राहील. सर्व नागरिकांसाठी धार्मिक संस्थांने बंद राहतील. विद्यार्थ्यांना परीक्षेचे ठिकाणी प्रत्यक्ष जाणे आवश्यक असल्यास सदर परीक्षा ठिकाणी जाण्यास किंवा घरी येण्यासाठी रात्री 8 वाजेनंतर तसेच शनिवार व रविवार संचारबंदीच्या कालावधीत सुद्धा प्रवास करण्यास मुभा राहील. परंतु परीक्षेचे अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. शनिवार व रविवार संचारबंदीच्या कालावधीत लग्न समारंभ असतील, तर स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन संबंधित तहसिलदार सदर कार्यक्रमास परवानगी देऊ शकतील . या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमांनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

*********

कोरोना अलर्ट : प्राप्त 4839 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 626 पॉझिटिव्ह

  • 792 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5465 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4839 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 626 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 325 व रॅपीड टेस्टमधील 301 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 585 तर रॅपिड टेस्टमधील 4254 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4839 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर व तालुका :126,  मोताळा शहर व तालुका : 29, खामगांव शहर व तालुका : 53,  शेगांव शहर व तालुका :4,   चिखली शहर व तालुका : 34,   मलकापूर शहर व तालुका : 68, दे. राजा शहर व तालुका : 37, सिं. राजा शहर व तालुका : 12, मेहकर शहर व तालुका : 97,   संग्रामपूर शहर व तालुका : 22,   जळगांव जामोद शहर व तालुका : 3,   नांदुरा शहर व तालुका : 71,    लोणार शहर व तालुका : 70 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 626 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सारोळा मारोती ता. मोताळा येथील 65 वर्षीय पुरूष व गांधी नगर मलकापूर येथील 74 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 792  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 249416 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 37245 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  37245आहे. 

  आज रोजी 3435 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 249416 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 43221 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 37245 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 5685 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 291 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

 

No comments:

Post a Comment