Sunday 4 April 2021

DIO BULDANA NEWS 4.4.2021

 जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा; अन्न व औषध प्रशासन विभागाचे व्यवस्थित नियोजन

*रेमेडे सिव्हीर औषधाचा मुबलक साठा
बुलडाणा, (जिमाका) दि ४: जिल्हयाची एकुण ऑक्सीजनची मागणी व त्याअनुषंगाने पुरवठयाचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे. जिल्हयासाठी मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा मे . माउली उदयोग, अकोला व मे. इसीम गॅसेस, जालना यांचेकडुन निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विभागाच्या व्यवस्थित नियोजनाने जिल्ह्यात ऑक्सिजन चा पुरेसा साठा आहे. 
    सदर पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती  आरोग्य विभागाच्या समन्वयाने काम करीत आहे.सदयस्थितीत बुलडाणा येथील शासकीय कोव्हीड रुग्णालयात रेमडेसिव्हीर या औषधाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच आणखी साठा उपलब्ध व्हावा म्हणुन आरोग्य विभागामार्फत मागणी नोंदविण्यात आली आहे.  जिल्हयातील सर्व रुग्णांनी व वैदयकीय व्यावसायिकांनी रेमडेसिव्हीर या औषधाच्या उपलब्धतेबाबत काही अडचणी आल्यास गजानन प्रल्हाद घिरके , औषध निरीक्षक, बुलडाणा यांचेशी संपर्क करावा. 
   सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन या कार्यालया मार्फत दैनंदिन उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत असुन रेमडेसीव्हीर इंजेक्शची  जिल्हयातील जनतेस कमतरता भासणार नाही.  यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री. डॉ राजेंद्र शिंगणे कार्यरत असुन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करण्याबाबत घाउक व किरकोळ औषध विक्रेते तसेच सदर कार्यालयाचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. तसेच कोव्हीड -१९ या विषाणुजन्य आजारात रुग्णांची संख्या भरपुर प्रमाणात वाढलेली निदर्शनास येते, सदर आजाराचे वाढते रुग्ण पाहता तातडीचे प्रसंगी रुग्णाला रक्ताची गरज भासण्याची शक्यता असते, तरी  जिल्हयातील जनतेने जिल्हयातील रक्तपेढयांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास कोव्हीड-१९ चे सर्व नियम पाळुन रक्तदान करुन सहकार्य करावे व सामाजिक हित जोपासावे, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. 
 

No comments:

Post a Comment