Saturday 23 January 2021

DIO BULDANA NEWS 23.1.2021

महिला व बालकल्याण मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांची बालगृहाला भेट · पाहणी करून साधला संवाद बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज बुलडाणा येथील मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाला भेट दिली. यावेळ त्यांनी इमारतीमधील विविध कक्षांची पाहणी केली. तसेच बालगृहातील सध्या प्रवेशित मुलांशी चर्चा केली. बालगृहात मागे झालेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी प्रवेशित असलेल्या मुलांकडून महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमावेत जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, माजी आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जि.प सदस्य जयश्रीताई शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. रामरामे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सोनुने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री. मराठे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *********** कोरोना अलर्ट : प्राप्त 819 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 22 पॉझिटिव्ह • 56 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 841 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 819 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 14 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 546 तर रॅपिड टेस्टमधील 273 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 819 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : अकोली 1, शेगांव शहर : 1, चिखली तालुका : गांगलगांव 1, मुंगसरी 1, चिखली शहर : 3, दे. राजा शहर : 3, लोणार तालुका : खुरमपूर 1, दे. राजा तालुका : जवळखेड 1, सिनगांव जहागीर 1, तुळजापूर 1, खामगांव तालुका : भालेगांव 1, खामगांव शहर : 4, मेहकर तालुका : जानेफळ 1, जळगांव जामोद शहर : 2, येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 22 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान तळणी ता. मोताळा येथील 80 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 56 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 9, स्त्री रूग्णालय 3, दे. राजा : 7, चिखली : 11, मोताळा : 5, खामगांव : 9, नांदुरा : 1, संग्रामपूर : 2, शेगांव : 8, जळगांव जामोद : 1, तसेच आजपर्यंत 1 लक्ष रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13072 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13072 आहे. तसेच 3590 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1 लक्ष आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13561 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13072 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 325 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 164 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ********** जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही यावेळी अभिवादन केले. 00000 नांदुरा व मलकापूर येथे वसतिगृह इमारतीसाठी खाजगी जमिनीची आवश्यकता · इच्छूक जागा मालकांनी समाज कल्याण कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नांदुरा व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे इमारत बांधकामासाठी शासकीय जमिन उपलब्ध नाही. तसा अहवालही नांदुरा व मलकापूर तहसिलदार यांनी दिला आहे. त्यामुळे नांदुरा व मलकापूर येथे वसतिगृह इमारत बांधकामासाठी प्रत्येकी दोन एकर खाजगी जमिनीची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने इच्छुक खाजगी जमिन मालकाने जागेच्या 7 / 12 व आवश्यक त्या कागदपत्रांसह 31 जोनवारी 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलडाणा या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे. ************ घरच्या घरी मिळवा डॉक्टरांचा सल्ला व ईप्रेस्क्रिप्शन..! · ई संजीवनी ओपीडी पोर्टल व ॲपवर डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध · या उपक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि. 23 : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सलटेशन सेवेद्वारे ऑनलाईन ओपीडी सेवा सुरु केली आहे. नॅशनल टेलिकन्सलटेशन सर्व्हिसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचारा बद्दल माहिती रुग्णालयात न जाता घरातल्या घरात मिळू शकते. त्यासाठी C-DAC या संस्थेकडून https://esanjeevaniopd.in हे पार्टल esanjeevaniopd मोबाईल वरील APP विकसित करण्यात आले आहे. वरील वेबसाईट किंवा APP उपयोग करुन ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडिओ – व्हिडीओ द्वारे सल्ला मसलत करुन रुग्ण त्यांच्या आजावर विनामुल्य सल्ला घेवू शकतात. रुग्णाच्या वेगवेगळया आजारावर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो. तसेच ईप्रेस्क्रिप्शन दिल्या जाते. सध्याच्या कोरोना साथी मध्ये ही सेवा खूप उपयोगाची ठरणार आहे. रुग्णाला रुग्णालयात न जाता घरच्या घरी त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. या सेवेसाठी डॉक्टर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपरोक्त पोर्टल व ॲपवर उपलब्ध असतात. ई संजीवनी ओपीडी ठळक वैशिष्ट्ये रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, रांग व्यावस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ व्हिडीओ सल्लामसलत, ईप्रेस्क्रिप्शन, एमएमएस, ईमेल सुचना, राज्याच्या डॉक्टरांद्वारे विनामुल्य सेवा, शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सदर सेवेसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी केले आहे. ********

No comments:

Post a Comment