Monday 18 January 2021

DIO BULDANA NEWS 18.1.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 318 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 70 पॉझिटिव्ह

• 44 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 388 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 318 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 70 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 69 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 233 तर रॅपिड टेस्टमधील 85 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 318 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 19, बुलडाणा तालुका : येळगांव 1, सिंदखेड मातला 1, नांद्राकोळी 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : खैरव 1, गांगलगांव 1, चंदनपूर 3, अंत्री खेडेकर 2, मोताळा तालुका : पोफळी 3, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 4, दे. राजा शहर : 4,   खामगांव शहर : 12, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, सुटाळा 1, घाटपुरी  2, किन्ही महादेव 1, मेहकर शहर : 7,  शेगांव शहर : 3, लोणार शहर : 1, लोणार तालुका : सिंधी 1   येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44  रूग्ण आढळले आहे.  

      तसेच आज 44 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : अपंग विद्यालय 1, स्त्री रूग्णालय 5, शेगांव : 5, खामगांव : 15, लोणार : 4,  दे. राजा : 3, जळगांव जामोद : 6,  मोताळा : 2, चिखली : 3,   तसेच आजपर्यंत 97308 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12857 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12857 आहे. 

  तसेच 556 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 97308 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13381 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12857 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 365 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 159 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                                    *******          

   इंडियाज पोस्ट पेयमेंट बँक खाते काढून विविध सुविधांचा लाभ घ्यावा

  • डाक विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 18 :  भारतीय डाक विभागातर्फे इंडियाज पोस्ट पेमेन्ट बँक आयपीपीबी सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले खाते काढून बॅकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. या खात्यांमध्ये  रोजगार हमी योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, किसान सन्मान योजना, खावटी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, शासनाच्या सर्व प्रकारच्या सबसिडी योजनांचे लाभ व छोटया मोठया व्यापाऱ्यांकरीता चालू खाते काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

      सदर खाते हे ‘झिरो बॅलन्स’वर चालू ठेवता येते. याशिवाय एईपीएस माध्यमातून आपण इतर कोणत्याही बॅक खात्यातील पैसे आपल्या नजिकच्या डाक कार्यालयातून काढू शकतात. आवश्यकता असल्यास आपण पोस्टमनद्वारे घरी सुध्दा एईपीएस माध्यमातून पैसे काढू शकतात.  राज्य व  केंद्र सरकारच्या पेंशनरकरीता घरबसल्‍या जिवन प्रमाण योजनेचे प्रमाणपत्र काढू शकतात.  या योजनेचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डाक विभागाचे अधिक्षक ए. के. इंगळे यांनी केले आहे.

    तसेच आयपीपीबी मोबाईल ऑप डाक पे ॲप, वर्च्युअल एटीएम, ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा विनामुल्य आहे. सदर ॲपमधून आपण कोणत्‍याही पोस्ट ऑफीसचे आरडी, पीपीएफ, सुकन्या खात्यात विनामुल्य घरुनच भरणा करु शकता. त्या मधून विज बिल, विमा हप्ता, मोबाईल रिचार्च, गॅस सिलेंडर बिलाचा भरणा करु शकता. आपल्याला खाते काढण्याकरीता फक्त आधार क्रमांकाची आवश्यकता आहे. इतर कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. सदर खाते आपण आपल्‍या पोस्टमनद्वारे आपल्या घरी काढण्याची सुविधा उपलब्ध्‍ आहे. आयपीपीबी बॅंकेद्वारे आपणास सर्व सामान्य विमा पॉलीसी नॉन लाईफ विमा काढता येते.

      तरी नागरिकांनी खाते काढून विविध सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन डाक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                

No comments:

Post a Comment