Wednesday 11 November 2020

DIO BULDANA NEWS 11.11.2020

 खरीप पणन हंगाम सुरू; 14 खरेदी केंद्रांना मान्यता

·        ज्वारी, मका व बाजरीची आधारभूत किंमतीने खरेदी

 बुलडाणा, (जिमाका) दि. 11:  खरीप पणन हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत जिल्ह्यात 14 खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांवर ज्वारी, मका व बाजरीची किमान आधारभूत किंमतीला खरेदी करण्यात येत आहे. सदर खरेदी केंद्र विविध सब एजन्ट संस्थेद्वारे चालविण्यात येणार आहे. या खरेदी केंद्राव्यतिरिक्त अनावश्यक खरेदी केंद्र उघडली जाणार नाहीत. सदर खरेदी केंद्र बुलडाणा, मेहकर, लोणार, दे. राजा, शेगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, नांदुरा, मलकापूर, खामगांव, मोताळा, सि. राजा, चिखली व साखरखेर्डा येथे आहेत, तरी नोंदणीकृत शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

    खरेदी केंद्र व चालविणाऱ्या सब एजन्ट संस्था : बुलडाणा-  तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती, मेहकर - तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, लोणार- तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती,     दे.राजा : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती,शेगांव : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती,    संग्रामपूर : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, जळगांव जामोद : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, नांदुरा : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, मलकापूर: तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, खामगांव : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, मोताळा: संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, सिं. राजा : माँ जिजाऊ कृषि विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड, चिखली : स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या. आणि साखरखेर्डा : सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर .             

*****



                        अन्न व औषध प्रशासनाकडून 47 आस्थापनांची तपासणी

·        61 अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविले

  बुलडाणा,(जिमाका) दि.11: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलडाणा शहर व संपूर्ण जिल्ह्यात दिवाळी व अन्य सण उत्सवांच्या अनुषंगाने अन्न पदार्थ तपासणीची विशेष मोहिम अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत विविध स्वीट मार्ट, उपहार गृह व इतर अन्न पदार्थ विक्रेते अशा एकूण 47 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 61 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.

  विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये मिठाईचे 12 नमुने, विविध प्रकारच्या खाद्यतेलाचे 20, मैदा, रवा, बेसन यांचे 6 नमुने, मिरची पावडर, हळद पावडर, धनिया पावडर व इतर मसाले यांचे 10 नमुने, दुध 6 नमुने व इतर अन्न पदार्थांचे 5 अन्न नमुन्यांचा समावेश आहे. सदरचे सर्व नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याअनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार भविष्यातही अन्न पदार्थ तपासण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. जेणेकरून जनतेस निर्भेळ व चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ उपलब्ध होतील. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके व श्री वसावे यांनी सहभाग घेतला. अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास जनतेने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न)  स. द केदारे यांनी केले आहे.

                                                      *************

 

 

                 विदेशातून अनधिकृत आयात केलेल्या फटाक्यांच्या साठवणूक व विक्रीस प्रतिबंध

 बुलडाणा,(जिमाका) दि. 11 :  आगामी दिपावली सणानिमित्ताने विदेशातून अनधिकृतपणे आयात केले जाणाऱ्या फटाक्यांची साठवणूक व विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील फटाके विक्री करण्यासाठी परवाने देणारे सर्व यंत्रणांना याबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.   

  संबंधित यंत्रणांनी विदेशातून आयात केलेल्या फाटाक्यांची विक्री होणार नाही, याबाबत दक्षता घेवून नियमित तपासणी करावी. विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व फटाका आस्थापनांनी सर्व समावेशक तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,जेणेकरून विदेशी फटाक्यांची साठवणूक व विक्री होणार नाही. सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्यामार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची तसेच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. अनधिकृत फटाक्यांच्या दुष्परीणामांविषयी समाजात जनजागृती करावी.

  विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादीत केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले व स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादीत केलेले फटाके, जर कुणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करीत असेल किंवा त्यांची विक्री करीत असेल, अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. आगामी काळात दिवाळी सणाच्या कालावधीत पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व मुख्याधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात भरारी पथकांची नियुक्ती करावी. सदर भरारी पथकाने विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ कारवाई करावी, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

                                                                 **********

                            क्षयरोगाबाबत विविध स्तरातून जनजागृती करावी

-         जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

   बुलडाणा,(जिमाका) दि. 11 : क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक समस्या असुन 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. शासकिय व खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांकडे क्षयरूग्णांचे नोटीफीकेशन वाढविण्यात यावे. शासकिय आरोग्य संस्थेतील कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोगाबाबत लोकवस्ती सभा, शाळा , महाविदयालय, वस्तीसभा, पाडासभा, विटभटटी अशा विविध स्तरातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.

     जिल्हा टिबी फोरम व टिबी कोमॉबिडीटी जिल्हा समितीची आढावा सभा 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पार पडली.  यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी मिलींद पा.जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, जि. प सदस्य आशिष रहाटे, वैदयकिय अधिक्षक डॉ. मिनल कुटुंबे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ गोफणे आदी उपस्थित होते.    

    याप्रसंगी जिल्हाधिकारी एस राममूर्ती म्हणाले, क्षयरुग्णांना पुर्णपणे बरा करण्यासाठी शासनस्तरावरुन पोषण आहारासाठी प्रति महिना 500 रूपये माहे एप्रील 2018 पासुन देण्यात येत आहे. प्रत्येक क्षय रूग्णाला वेळेत व नियमित उपचार मिळण्यासाठी कार्यवाही करावी.  क्षयरूग्णांना पौष्टिक आहार देण्यात यावा. तसेच समाज कल्याण योजनांशी क्षयरूग्णांना जोडण्यात यावे. क्षयरुग्णांच्या तक्रारीचे निवारण करावे.

याप्रसंगी डॉ. असलम, संदीप चव्हाण, ॲड विजय सावळे, अशोक अग्रवाल,  विनोद पाटील, गजानन शिंदे, निलेश गावंडे, आशिष ओझा,  कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, समन्वयक गजानन देशमुख व टिबी चॅम्पीयन श्रीमती ज्योती शिगणे, मंगलसींग राजपुत, ईसार खान पठाण यांनी आपले मनोगत विषद केले. तसेच जिल्हा क्षयरोग केंद येथील  सिध्देश्वर नारायण सोळंकी, जिल्हा समन्वयक अनिल सोळंके, आशिष वाईनदेशकर, राजेंद्र सुरडकर, मुकेश घेंगे, योगश शिरसाठ, श्री.सरोदे आदी अधिकारी व कर्मचारी सभेस उपस्थित होते. आभार प्रर्दशन क्षयरोग अधिकारी डॉ. मिलींद जाधव यांनी केले.

********

कोरोना अलर्ट : प्राप्त 1032 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 52 पॉझिटिव्ह

  • 28 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.11: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1084 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1032 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 48 व रॅपीड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 863 तर रॅपिड टेस्टमधील 169 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1032 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : दिवठाणा 1, ढोरपगांव 4, टेंभुर्णा 5, जळगांव जामोद शहर : 1,  जळगांव जामोद तालुका : खांडवी 1, वाडी खुर्द 1, धानोरा महासिद्ध 1,  नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : वाडी 1, तांदुळवाडी 1, शेंबा खु 1, लोणार तालुका : किनगांव जट्टू 1, अंजनी खुर्द 1,  बुलडाणा शहर : 7, चिखली शहर : 4,  चिखली तालुका : उत्रादा पेठ 2, किन्होळा 1, एकलारा 1, ईसोली 2, कव्हाळा 3, सातगांव भुसारी 1,  मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : म्हैसवाडी 1, सिं.राजा तालुका : साखरखेर्डा 1,   मूळ पत्ता श्रीकाकुलम आंध्रप्रदेश 1,   भाडीयाखेडा  आंध्रप्रदेश 2, नांदगाव ता. बोदवड जि. जळगांव येथील 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 52 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 28 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय  11, अपंग विद्यालय 2, स्त्री रूग्णालय 2, मेहकर : 5,  दे. राजा : 2, नांदुरा : 1, सिं.राजा : 5.

     तसेच आजपर्यंत 54727 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 9530 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 9530 आहे. 

  आज रोजी 4640 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 54727 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10027 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 9530 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 366 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 131 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

*****

‘अपाम’ अंतर्गत योजनांची अंमलबजावणी सुरू राहणार

  बुलडाणा,(जिमाका) दि.11:  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत  सुरू असलेली व्याज परतावा योजना सुरू राहणार आहे. सद्यस्थितीत योजनेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.  शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2020 अन्वये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संस्थापन समयलेख आणि संस्थापन नियमातील नियम 82 मधील तरतुदीनुसार महामंडळावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य व विशेष निमंत्रीत यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र महामंडळामार्फत सुरू असलेल्या योजना महामंडळामार्फत  निरंतर सुरू राहतील. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मिळत असलेल्या व्याज परताव्याचा लाभ यापुढे देखील निरंतर देण्यात येईल. या योजनेतंर्गत आतापर्यंत ज्या प्रकारे बँकांनी सहकार्य केले आहे. त्याप्रमाणे यापुढे देखील सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

                                                                                **********

  

No comments:

Post a Comment