Thursday 12 November 2020

DIO BULDANA NEWS 12.11.2020

 दिवाळीत फटाक्यांचा कमीत कमी वापर करा

·         जिल्हा प्रशासनाचे आवाहन

·         कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे

·        रात्री 10 नंतर फटाके उडविण्यावर बंदी

 बुलडाणा, (जिमाका) दि. 12:  कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या कोविड 19 नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत असले तरी कोविड 19 ची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी. या दिवाळीत सोशल डिस्टसिंग, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे व वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावा. फटाक्यांच्या धुरांचा कोविड बाधीत रूग्णांना त्रास होवू शकतो. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच सर्व खाजगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा. कोविड बाधीत रूग्णांना त्रास न होण्यासाठी कमी आवाजाचे तसेच कमी धूर होणाऱ्या फटाक्यांचा वापर करावा. नागरिकांनी कोविड विषयक योग्य ती खबरदारी घ्यावी. दिवाळी काळात सोशल डिस्टसिंग व सॅनीटायझेशन नियमांचे पालन करावे. कोविडच्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने दिवाळीचे दिवे लावताना तसेच फटाके फोडताना सॅनिटायझरचा वापर टाळावा. दिवाळी काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये. अशा कार्यक्रमांना परवानगी नाही. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे. फटाके केवळ घराच्या आवारातच फोडता येतील. तसेच आकाशात उडणारे आतीषबाजीचे फटाके, मोठ्या प्रमाणात धूर होणारे फटाके व मोठा आवाज करणारे फटाके वाजविण्यावर बंदी राहणार आहे. रात्री 10 वाजेनंतर फटाके उडविण्यावर बंदी राहणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आदेशान्वये कळविले आहे.

***************

                        मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्ताने ऑनलाईन परिसंवाद

 बुलडाणा, (जिमाका) दि. 12:  भारतरत्न मौलना अब्दुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांमधील 40 विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. परिसंवादाचे उद्धाटन शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, अंजली नेटके, शिक्षण विभागातील व समग्र शिक्षा विभागातील सर्व अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. परिसंवादाच्या सुरूवातीला शिक्षणाधिकारी डॉ. पानझाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करीत राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. परिसंवादाचे संचलन उपशिक्षणाधिकारी श्री. जैन यांनी केले. या परिसंवादात सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. आभार कार्यक्रम अधिकारी मंगेश भोरसे यांनी मानले.

‘अपाम’च्या योजनानिहाय लक्षांकाचे बँकांना वाटप

 बुलडाणा, (जिमाका) दि. 12:  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लक्षाकांचे सन 2020-21 मधील वाटप बँकांना करण्यात आल आहे. महामंडळाच्या योजनातंर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही बँक शाखेमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा  करण्यासाठी सदर महामंडळ बांधील आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतंर्गत 10 लाख पर्यंतच्या योजनेच्या बँक मंजूर रकमेवरील व्याज परतावा 3 लाख पर्यंत महामंडळ देणार आहे. तरी बँकांनी कोणत्याही लाभार्थ्याला बँकेमार्फत लक्षांक नाही किंवा लक्षांक संपुष्टात आले आहे. या कारणास्तव कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये. जिल्ह्यात जिल्हा अग्रणी बँक कार्यालया अंतर्गत बँकांना 2500 लक्षांक बँक मंजूरीकरीता देण्यात आला आहे.

  बँकनिहाय प्रकरणे व रक्कम लक्षांक : अलाहाबाद बँक 16 प्रकरणे व  80 लक्ष रूपये, आंध्रा बँक 16 प्रकरणे व 80 लक्ष रूपये, बँक ऑफ बडोदा 24 प्रकरणे व 1 कोटी 20 लक्ष रूपये, बँक ऑफ इंडिया 112 प्रकरणे व 5 कोटी 60 लक्ष रूपये, बँक ऑफ महाराष्ट्र 296 प्रकरणे व 14 कोटी 80 लक्ष रूपये, कॅनरा बँक 48 प्रकरणे व 2 कोटी 40 लक्ष रूपये, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 262 प्रकरणे व 13 कोटी 10 लक्ष रू, देना बँक 16 प्रकरणे 80 लक्ष रूपये, आयडीबीआय बँक 58 प्रकरणे व 2 कोटी 90 लक्ष रूपये, इंडियन ओव्हरसिस बँक 74 प्रकरणे व 3 कोटी 70 लक्ष रू, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 16 प्रकरणे व 80 लक्ष रूपये, पंजाब नॅशनल बँक 32 प्रकरणे व 1 कोटी 60 लक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया 624 प्रकरणे व 31 कोटी 20 लक्ष रूपये, सिंडीकेट बँक 16 प्रकरणे व 80 लक्ष रू., युको बँक 32 प्रकरणे व 1 कोटी 60 लक्ष रू, युनीयन बँक ऑफ इंडिया 32 प्रकरणे व 1 कोटी 60 लक्ष रू, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 364 प्रकरणे व 18कोटी 20 लक्ष रू, ॲक्सीस बँक 80 प्रकरणे व 4 कोटी रूपये, एचडीएफसी बँक 148 प्रकरणे व  7 कोटी 40 लक्ष रू, आयसीआयसीआय बँक 104 प्रकरणे व 5 कोटी 20 लक्ष रू, बीडीसीसी बँक 130 प्रकरणे व 6 कोटी 50 लक्ष रक्कम लक्षांक आहे, असे अपामचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

                                                            ****** 

स्टँड अप इंडिया योजनेच्या लाभासाठी 23 नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन

·         अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांसाठी योजना

·         धनगर समाजातील महिलांनाही मिळणार लाभ

बुलडाणा, (जिमाका) दि. 12:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत केंद्र शासनाच्या स्टँण्ड अप इंडिया योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक तसेच धनगर समाजातील महिलांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी 23 नोव्हेंबर 2020 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 10.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   तरी यादिवशी उपस्थित राहून सदर घटकातील नवउद्योजक व धनगर समाजातील महिलांनी कागदपत्रांसह अर्ज सादर करावे. योजनेच्या लाभासाठी उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज मंजूरीचे पत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेत सवलतीस पात्र नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. तरी योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक व धनगर समाजातील महिला अर्जदारांकरीता 23 नोव्हेंबर रोजी शिबिर आयोजित केले आहे, तरी या शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्य आयुक्त, समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.  

                                                **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 930 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 95 पॉझिटिव्ह

•       78 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.12: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1025 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 930 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 95 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 93 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 805 तर रॅपिड टेस्टमधील 125 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 930 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 3, खामगांव तालुका : पाळा 1, जळगांव जामोद शहर : 1,  जळगांव जामोद तालुका : वाडी खुर्द 2, आसलगाव 2, सताळी 19, वडशिंगी 3, टाकळी पाटण 14,  नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : अंबोडा 1, पोटळी 1,  लोणार तालुका : पिंपळखुटा 2, गायखेड 1,   बुलडाणा शहर : 4,  चिखली तालुका : अमडापूर 2,  मलकापूर शहर : 1, सिं.राजा तालुका : शेंदुर्जन 3, महारखेड 4, सिंदखेड राजा शहर : 3, संग्रामपुर तालुका: वकाना 1, संग्रामपूर शहर : 5, शेगाव तालुका: नागझरी 1, पहूरजीरा1, गायगाव 2, तिंत्रव 1, दे.राजा तालुका: पिंपळगाव 1, सावखेड भोई 1, मेहुणा राजा 1, दे. राजा शहर: 1, लोणार शहर:3, मेहकर तालुका : डोणगाव 4, आरेगाव 1, मेहकर शहर : 2, बुलडाणा तालुका : रुईखेड मायांबा 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 95 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 78 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय  1, मेहकर : 8,  दे. राजा : 8, नांदुरा : 14, सिं.राजा : 28, शेगाव: 4, खामगाव :1, जळगाव जामोद: 6, मोताळा :1, मलकापूर: 7 .

     तसेच आजपर्यंत 55657 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 9608 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 9608 आहे. 

  आज रोजी 4444 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 55657 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10122 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 9608 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 383 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 131 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

                                    *****

 

 


--

घरातच रहाल आत… तर कोरोनाला देता येईल मात..

तुम्ही आत.. तर कोरोना बाहेर..

सोशल डिस्टसिंग पाळायचे आहे… कोरोनाला हरवायचे आहे.

Attachments area

No comments:

Post a Comment