Tuesday 24 November 2020

DIO BULDANA NEWS 24.11.2020

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 775 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह

       52 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 820 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 775 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 42 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 646 तर रॅपिड टेस्टमधील 129 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 775 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 6, चिखली तालुका : भोकरवडी 1, धोडप 1, मेरा बु 2, चिखली शहर : 1, नांदुरा तालुका : माळेगांव गोंड 3, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 2, जळगांव जामोद शहर : 3,  बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, कोलवड 2,  दे. राजा शहर : 1,  दे. राजा तालुका : अंभोरा 1, नागणगांव 1, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, मेंडगांव 1, सावखेड तेजन 1,  लोणार तालुका : अंजनी खु 2, चिंचोली सांगळे 1, चोरपांग्रा 1, किनगांव जट्टू 1, हिरडव 1,  लोणार शहर : 1, शेगांव शहर : 1, मेहकर तालुका : नायगांव दत्तापूर 1, मूळ पत्ता कारंजा लाड जि. वाशिम 1, जाहरलाल नगर, अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 52 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 8, दे. राजा : 2, बुलडाणा : 2, अपंग विद्यालय 4, नांदुरा : 6, लोणार : 1, खामगांव : 10, मोताळा : 9, शेगांव : 2, मेहकर : 2, जळगांव जामोद : 6.  

     तसेच आजपर्यंत 67577 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10440 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10440 आहे. 

  तसेच 5241 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 67577 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 10913 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10440 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 339 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

******

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना युपीएससी तयारीसाठी आर्थिक सहाय्य

  • दरमहा 12 हजार विद्यावेतन व 14 हजार पुस्तक खरेदीसाठी मिळणार

  बुलडाणा,(जिमाका) दि.24: केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना यावर्षी सुरु करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत युपीएससी परीक्षेच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 12 हजार रुपये विद्यावेतन व 14 हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.

    या योजनेअंतर्गत युपीएससी पुर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या 25 अशा अनुसूचित जमातीमधील एकूण 50 उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन 2020-21 पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करुन थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

    केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा,  या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे  योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, अशा विश्वास आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे.   इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्तरावरुन अर्ज करता येणार आहे,  असे सहा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                ********

 

 

No comments:

Post a Comment