Tuesday 10 November 2020

DIO BULDANA NEWS 10.11.2020

 गुलाबी बोंड अळीसाठी पोषक काळ; उपाययोजना कराव्यात

·        कृषि विभागाचे आवाहन

 बुलडाणा,(जिमाका) दि. 10 :  गुलाबी बोंड अळी किंड वाढण्यासाठी दिवसाचे तापमान 29 अंश ते 32 अंश सें रात्रीचे तापमान 11 अंश ते 14 अंश से असायला पाहिजे. दिवसाची आर्द्रता 71 ते 80 टक्के तर रात्रीची आर्द्रता 26 ते 35 टक्के असणे हे किडीसाठी अत्यंत पोषक असते. सद्यास्थितीत असे वातावरण आहे आणि नेहमी प्रमाणे या काळात पोषक वातावरण राहते.

 तसेच कपाशीचे 15 ते 20 दिवसांचे बोंड हे अळीचे आवडते खाद्य आहे. या सर्व कारणांमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण शक्यता नाकारता येत नाही. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावसाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील उपायोजना कराव्यात.

   फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय करावे. फुलावस्थेत दर आठवडयाने पिकांमध्ये मजुरांच्या सहाय्याने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले) शोधुन नष्ट कराव्या. तसेच 5 टक्के निंबोळी अर्क  किंवा ॲझॉडीरेक्टीन 0.03 (300 पिपिएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के (1500 पिपिएम) 25 मिली प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील, अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचून त्यामधील किडके बोंड व अळ्यांची संख्या मोजुन ती दोन किडके बोंड किंवा दोन पांढुरक्या, गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ( 5 ते 10 टक्के) समजुन खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटनाशकाची फवारणी

करावी. थोयोडीकार्ब 15.8 टक्के डब्लुपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा डेंल्टामेंथीन 2.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटनाशक प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

   जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी

कोणत्याही एका मिश्र किटनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के अधिक डेल्टामेथीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरेंट्रानिलिप्रोल 9.3 टक्के  अधिक लँब्डासायहॅलोथीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के अधिक सायपरमेथ्रिन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के अधिक ॲसीटामोप्रिड 7.7 टक्के 10 मिली या प्रमाणे फवारणी करुन कपाशी पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

**********

कोरोना अलर्ट : प्राप्त 704 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 35 पॉझिटिव्ह

  • 98 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.10: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 739 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 704 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपीड टेस्टमधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 506 तर रॅपिड टेस्टमधील 198 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 704 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : रूईखेड मायंबा 1, खामगांव तालुका : निपाणा 6, बेलखेड 1, लोणार तालुका : सावरगांव तेली 2, कोयाळी 1,  लोणार शहर : 4, नांदुरा शहर : 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : सारशिव 1, विठ्ठलवाडी 1, बेलगांव 1, लोणी गवळी 1, कनका 1, डोणगांव 1, पांगरखेड 1,  मोताळा तालुका : तरोडा 1, सिं. राजा तालुका : पळसखेड 2, गारखेड 1, चिंचोली 3,  सिं.राजा शहर : 1, शेगांव शहर 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 35 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 98 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रूग्णालय 2, आयुर्वेद महाविद्यालय 10, लोणार : 3, नांदुरा : 8, जळगांव जामोद : 2, सिं. राजा : 3, खामगांव : 23, चिखली : 14, मलकापूर : 1, शेगांव : 11, दे. राजा : 15,   मेहकर : 3, मोताळा : 3.    

   तसेच आजपर्यंत 53695 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 9502 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 9502 आहे. 

  आज रोजी 4622 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 53695 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9975 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 9502 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 342 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 131 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

*****

निवृत्ती वेतन धारकांना वैयक्तिक खाते काढण्यासाठी आणखी तीन बँकांना मान्यता

  • आयडीबीआय, प्रादेशिक ग्रामीण बँक व डिसीसी बँकेचा समावेश

 बुलडाणा,(जिमाका) दि.10: आयडीबीआय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे वितरण करण्याबाबत तसेच निवृत्ती वेतन धारकांना बँकेमार्फत निवृत्ती वेतन प्रदान करण्यासाठी शासनासोबत करार केला आहे. त्यानुसार या बँकांना आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालयीन बँक खाते व निवृत्ती वेतन धारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या लेखापरीक्षण अहवालात बदल होण्याची शक्यता विचारात घेता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांची यादी प्रतिवर्षी जुलै महिन्यात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाच्या सल्ल्याने वित्त विभाग सुधारीत करणार आहे. त्यामुळे सन 2020-21 या वर्षाकरीता राज्यातील 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालयीन बँक खाते व निवृत्ती वेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली येथील बँकेचा समावेश आहे, असे वित्त विभागाच्या 6 नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात नमूद आहे.


No comments:

Post a Comment