DIO BULDANA NEWS 31.10.2020

सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद शेंदूर्जन महसूल मंडळात चार वेळा अतिवृष्टी बुलडाणा,(जिमाका) दि.31 : जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबरच्या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान सिंदखेड राजा तालुक्यात झाले आहे . सिंदखेड राजा तालुक्यात 7 महसूल मंडळे आहेत . तालुक्यात पूर्णा नदी काठच्या साठेगाव , निमगाव वा याळ , हिरवखेड पुर्णा , तढेगाव , राहेरी खु , राहेरी बु , पिंपळगाव कुं डा , ताडशिवणी , लिंगा , देवखेड , तांदुळवाडी , येथील क्षेत्र पाण्याखाली आले होते. तसेच पाताळगंगा नदीका ठावरील सिंदखेड राजा शिवार , आलापूर , सवखेड तेजन , पळसखेड चक्का , पिंपळगाव लेंडी , या गाव शिवारात पाणी साचून जमीन देखील खरडून गेली आहे . यामुळे पि कां चे नुकसान झाले . बेलगाव नदीका ठावरील सो यं देव , सोनोशी , वर्डदी , रुमना या गावांच्या शिवारात नदी दुधडी वाहून पिके पाण्याखाली गेली . त्याचप्रमाणे वाघोरा नदीकाठी बोरखेडी जलाल , तांदुळवाडी , महारखेड , पांगरखेड , हनुवतखेड येथे प...