Friday 17 January 2020

DIO BULDANA NEWS 17.1.2020

गटई कामगारांना मिळणार पत्र्याचे स्टॉल
·        31 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 17 : गटई काम अर्थात कातडी सोलणे व त्यापासून चपला – जोडे बनविणे या कामासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील गटई कामगाराकडून टिन पत्राचे स्टॉल मिळविण्याकरीता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. सन 2019-20 वर्षाकरीता 31 जानेवारी 2020 पर्यंत सायं 5 वाजेपावेतो अर्ज स्वीकरण्यात येणार आहे.
  अर्जदार हा महाराष्ट्राचा अनुसूचित जाती प्रवर्गातील रहीवासी असावा, कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार व शहरी भागाकरीता 50 हजारपेक्षा जास्त नसावे. यासाठी तहसिलदारापे प्रमाणित केलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने, अगर मोफत परंतु अधिकृत ताब्यात दिलेली असावी किंवा ती स्वत:च्या मालकीची असल्यास नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे. शहरी भागासाठी असेसमेंटची नक्कल सादर करावी. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, जन्म दाखला, रेशन कार्ड आदी साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
   या व्यवसाय योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी विहीत अर्ज समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलडाणा कार्यालयातून विनामुल्य घेवून जावे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2020 आहे. उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केल्या जाणार नाही. अर्जदारांनी आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर करावे. तसेच अर्जदारास त्रुटीबाबत व्यक्तीगत कळविण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी इच्छूकांनी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ******
टीईटी परीक्षेचे 19 जानेवारी रोजी आयोजन
बुलडाणा, दि. 17 : इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन 19 जानेवारी 2020 रोजी करण्यात आले आहे. यामध्ये पेपर एकची वेळ 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि पेपर 2 ची वेळ दु. 2 ते 4.30 वाजेपर्यंत राहील.  परीक्षेला जिल्ह्यातील 8 हजार 10 विद्यार्थी बसणार आहे. बुलडाणा शहर व परीसरातील 18 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून परीक्षेत दोन पेपर असणार आहे. पहिल्या पेपरसाठी 4573 विद्यार्थी, तर दुसऱ्या पेपरसाठी 3437 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहे. परीक्षा सुरळीत संचालनासाठी तीन झोनल अधिकारी, 18 केंद्र संचालक, 18 सहाय्यक परिरक्षक यांचेसह पर्यवेक्षक, समवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
   परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र वितरित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी विहीत वेळेपूर्वी अर्धातास आधी उपस्थित रहावे. सोबत मोबाईल, कॅल्युलेटर किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स साहित्य बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन काढलेले प्रवेशपत्र, फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र व काळ्या किवा निळ्या शाईचा बॉलपेन इतकेच साहित्य सोबत आणावे. अन्य कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात आणू नये. परीक्षार्थींनी परीक्षेच्या वेळेपूर्वी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. खान यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******
पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 अन्वये जमावबंदी अधिसूचना जारी
·        30 जानेवारी 2020 पर्यंत राहणार अधिसूचना
·        मिरवणूकीसाठी स्थानिक ठाणेदाराची लेखी परवानगी आवश्यक
बुलडाणा, दि. 17 : महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) अन्वये जिल्ह्यात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच विस्फोटकाच्या कच्चया मालाची वाहतूक, दगड, विटा किंवा इतर वाहतूक करणे वा एकत्र जमा करून ठेवणे, जमावाचे, माणसांचे एकत्रिकरण करणे व पुतळ्यांचे प्रदर्शन करणे, जाहीररित्या ओरडणे, गाणे म्हणणे वा संगीत वाजविणे, बिभत्स चाळे करणे, अंगविक्षेप करणे, चित्रविचित्र कृती करणे, ज्यामुळे चांगुलपणा चारित्र्य हनन होऊ शकेल अशी कृती करणे यावर बंदी घालण्या येत आहे.
  त्याचप्रमाणे कलम 37 (3) अन्वये आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशानुसार, कोणत्याही प्रकारच्या मानवी मेळाव्यास मिरवणूकीस कोणत्याही ठिकाणी खाजगी जागेसह आयोजित करण्यामुळे अथवा मिरवणूक काढल्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षीततेसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून निर्बंध घालण्यात येत आहे. मिरवणूकीसाठी स्थानिक ठाणेदाराची लेखी परवानगी आवश्यक आहे. ही अधिसूचना व आदेश 30 जानेवारी 2020 चे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याकरीता लागू असणार आहे.
   या अधिसूचनेचे व आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 व 37, कलम 35 अन्वये संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. या आदेशातून कामावरील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, अंत्ययात्रा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम आणि आठवडी बाजार यांना लागू राहणार नाही, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.
                                                                        ************
राष्ट्रीय बालिका सप्ताहाचे 20 जानेवारीपासून आयोजन
  • 26 जानेवारी 2020 पर्यंत चालणार सप्ताह
बुलडाणा, दि. 17 : जिल्ह्यात बेटी बचाओ- बेटी पढाओ कार्यक्रमातंर्गत गा्रमीण भागातील मुलींचा जन्मदर वाढविण्याच्यादृष्टीने 20 जोनवारी ते 26 जानेवारी 2020 पर्यंत  राष्ट्रीय बालिका सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.  
   या सप्ताहातंर्गत 20 जानेवारी रोजी उद्घाटन, 21 जाननेवारी रोजी प्रभात फेरी, आशा वर्करसोबत घरोघरी जनजागृती, 22 जानेवारी रोजी शाळांमधून जनजागृतीपर कार्यक्रम, पोस्टर, स्लोगन, चित्रकला व पेंटींग स्पर्धांचे आयोजन, शाळांच्या भिंतीवर वॉल पेंटींग करणे, 23 जानेवारी रोजी बेटी बचाओ- बेटी पढाओ कार्यक्रमावर समाज घटकांच्या बैठका, धार्मिक नेत्यांसोबत जनजागृती कार्यक्रम, 24 जानेवारी रोजी कन्या जन्म साजरा करणे, मुलीच्या नावे वृक्षारोपण करणे, पथनाट्य, कलापथक कार्यक्रम करणे, बेटी बचाओ अभियानावर आधारीत फोटो पुस्तक प्रकाशित करणे, 25 जानेवारी रोजी बाल संरक्षणार्थ विशेष ग्रामसभांचे आयोजन, आई व मुलींचा सत्कार करणे, स्त्री संरक्षण व स्त्री आरोग्यावर चर्चासत्र आयोजित करणे आणि 26 जानेवारी रोजी अभियानातंर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करणे व समारोप कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
   या सप्ताहातंर्गत होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन  असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, माहिला व बालविकास  विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                            *********
महिला लोकशाही दिनाचे 20 जानेवारी रोजी आयोजन
बुलडाणा, दि.17 : महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करता याव्या म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येत असते. त्यानुसार सोमवार दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
          ज्या महिलांना लोकशाही दिनात तक्रारी दाखल करावयाच्या आहेत त्यांनी बचत भवन येथे तक्रारी दाखल कराव्यात. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरुपाची तक्रार निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे. ज्या महिलांचे तालुकास्तरावर लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाहीत, त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात. तक्रार सादर करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात सादर केलेला अर्ज व टोकन क्रमांकही दाखल करावा, असे प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  कळविले  आहे.
                                                            *****

No comments:

Post a Comment