Friday 10 January 2020

DIO BULDANA NEWS 10.1.2020

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजासाठी जिल्ह्यातून बसेसची व्यवस्था
·        राज्य परिवहन महामंडळाचा उपक्रम
·        प्रत्येक आगारातून मागणीनुसार बसेस सोडणार
       बुलडाणादि. 10 : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव 12 जोनवारी 2020 रोजी सिंदखेड राजा येथे होत आहे. या जन्मोत्स्वानिमित्त सिंदखेड राजा येथे जिल्ह्यातून, बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच परराज्यातूनही नागरिक जातात. त्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा बुलडाणा विभाग जादा बसेस सिंदखेड राजा साठी सोडण्याचा उपक्रम राबवित आहे. महामंडळाच्या जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून प्रवाशांच्या सोयीसाठी व त्यांच्या मागणीनुसार मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जाण्यासाठी 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7 वाजता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
   तरी सदर उपक्रमाचा प्रवाशांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार व विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        **********
                       पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा जिल्हा दौरा
       बुलडाणादि. 10 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  12, 13 व 14 जानेवारी 2020 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 11 जानेवारी रोजी सायं 7.30 वा औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने सिंदखेड राजाकडे प्रयाण, रात्री 9.15 वा शासकीय विश्रामगृह सिंदखेड राजा येथे आगमन व मुक्काम. दि. 12 जानेवारी रोजी दिवसभर सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थिती, सायंकाळी सोयीनुसार सिंदखेड राजा येथून शासकीय वाहनाने बुलडाणाकडे प्रयाण, रात्री बुलडाणा येथे आगमन व मुक्ताई नगर निवासस्थानी मुक्काम. दि. 13 जानेवारी रोजी दुपारी 12.45 वाजेपर्यंत मुक्ताई नगर, चिखली रोड, बुलडाणा येथे राखीव, दु. 12.45 वा मुक्ताई नगर, चिखली रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, दु. 1 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक, दु. 4 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथून मुक्ताई नगर, चिखली रोडकडे प्रयाण, दु. 4.15 वा मुक्ताई नगर, चिखली रोड येथे आगमन व राखीव.  दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता बुलडाणा येथून शासकीय वाहनाने मेव्हणा राजाकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता मेव्हणा राजा येथे आगमन व संत चोखामेळा पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, दु. 12.10 वा मेव्हणा राजा येथून नारायणखेड ता. दे.राजाकडे प्रयाण, दु. 12.30 वा नारायणखेड येथे आगमन व खडकपूर्णा प्रकल्पातील उपसा सिंचन प्रकल्पामधील व पेयजल योजनेच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दु. 1 वा नारायणखेड येथे सत्कार सोहळ्यास उपस्थिती, दु. 2.30 ते 3.30 पर्यंत नारायणखेड येथे स्नेह भोजनास उपस्थिती, त्यानंतर दे.राजा तालुक्यातील गावांना भेटी, सायं 6 वा दे.राजा शासकीय विश्रामगृह येथे राखीव, रात्री सोयीनुसार दे.राजा येथून शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण करतील.
                                                                        *********

No comments:

Post a Comment