Posts

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ २०२६ साठी योगासनाची निवड चाचणी १ ऑक्टोबरला; पात्र खेळाडूंनी मूळ क्रीडा प्रमाणपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. ३० (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ २०२६’ सादरीकरणासाठी महाराष्ट्र योगासन संघाच्या खुल्या गटाची निवड चाचणी दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी-महाळुंगे, पुणे-४११ ०४५ येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. या निवड चाचणीसाठी खेलो इंडिया युथ गेम्स, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स यापैकी कोणत्याही एका स्पर्धेत पदकविजेते ठरलेले खेळाडू पात्र राहतील. तसेच, २०२६-२७ या वर्षातील वरिष्ठ गट राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेले व संबंधित संघटनेमार्फत नामनिर्देशित १० खेळाडूंनाही या निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. पात्र खेळाडूंनी निवड चाचणीसाठी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असून, सोबत मूळ क्रीडा प्रमाणपत्रे व आधारकार्ड आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी अमित भेडसे (मो. ८०५५५ ०६७०७), सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी शर्वरी जोशी (मो. ९५१८३ ७२२९९) तसेच क्रीडा कार्यकारी अधिकारी बापू ...

सेवासंकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त क्षय व कुपोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात; क्षयरुग्णांसाठी पोषणयुक्त आहार, उपचारातील सातत्य व स्वच्छतेबाबत जनजागृती

Image
    बुलढाणा, दि. ३० (जिमाका) : सेवा संकल्प अभियान व राष्ट्रीय पोषण माह निमित्त क्षयरोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये पोषण, योग्य आहार, स्वच्छता, नियमित उपचार आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्षय आरोग्य धाम, बुलढाणा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. “ सुपोषणातून सुदृढ आरोग्य आणि क्षयरोगमुक्त समाज ” या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला रुग्ण, नातेवाईक, रुग्णालयीन कर्मचारी तसेच नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आहारतज्ज्ञांच्या वतीने विविध पोषणयुक्त अन्नपदार्थांची प्रदर्शनी मांडण्यात आली. डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.   आहारतज्ज्ञ डॉ. मयुरी देशमुख यांनी कुपोषण व क्षयरोग यांचा संबंध, क्षयरुग्णांसाठी आवश्यक पोषणमूल्ये, संतुलित आहार, रोगप्रतिक...

सेवा संकल्प अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्या बांधावर ; सिंदखेड येथे गळीतधान्य लागवड तंत्रज्ञान व हवामान बदलाबाबत मार्गदर्शन

    बुलढाणा, दि. ३० (जिमाका) : सेवा संकल्प अभियान तसेच राष्ट्रीय गळीतधान्य अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे सिंदखेड, ता. बुलढाणा येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना गळीतधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान, हवामानातील बदल आणि कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.   कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार शिक्षण) डॉ. जगदीश वाडकर यांनी खरीप व रब्बी हंगामातील गळीतधान्य पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. कृषी विद्यापीठाच्या जैविक निविष्ठांचा गळीतधान्य उत्पादन वाढीसाठी उपयोग होतो. तसेच पिकांची फेरपालट ही जमिनीची सुपीकता, मातीचे आरोग्य आणि शेतीची शाश्वतता यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.   कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (कृषी हवामानशास्त्र) मनेश यदुलवार यांनी एल निनोची सद्यस्थिती व त्याचे शेतीवर होणारे संभाव्य परिणाम याबाबत माहिती दिली. रब्बी हंगामातील पीक नियोजन करताना जमिनीतील उपयुक्त ओलावा आणि सिंचनाची उपलब्धता ...

#बुलढाणा सेवा संकल्प अभियान अंतर्गत पोषण कार्यक्रम #सेवासंकल्पअभियान२०२६ #सेवासंकल्पअभियान

 

शिक्षक मतदारसंघ निवडणूक विशेष

    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी   निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. मात्र 20 उमेदवारांकरिता 44 नामनिर्देशनपत्रांची उचल झाली आहे. 0000

सेवा संकल्प अभियानांतर्गत देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा; नवीन नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावतीकरणाची सुविधा; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Image
    बुलढाणा, दि. 29 (जिमाका) : सेवासंकल्प अभियानांतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी देऊळगाव राजा पोस्ट ऑफिस येथे आधार नोंदणी तसेच आधारमधील दुरुस्ती व अद्ययावतीकरणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देऊळगाव राजा व परिसरातील नागरिकांना आधारशी संबंधित विविध कामांसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा मिळणार आहे.   देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमधील आधार सेवा केंद्राची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. या केंद्रावर नवीन आधार नोंदणी, आधारमधील आवश्यक दुरुस्ती तसेच अद्ययावतीकरणाची कामे करता येणार आहेत. आधारशी संबंधित सेवांसाठी नागरिकांना दूरवर जावे लागू नये आणि स्थानिक पातळीवर सुलभ व सुविधाजनक सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह देऊळगाव राजा पोस्ट ऑफिस येथे उपस्थित राहून आधार सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा विभाग अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. 0000

सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न; ग्रामपंचायत, आरोग्य व विविध विभागांच्या समन्वयातून गावे आरोग्य संपन्न करण्याचा संकल्प

Image
    बुलढाणा, दि. २९ (जिमाका) : आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव – कसं काय?’ व ‘सेवासंकल्प अभियाना’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा परिषद सभागृह, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.   मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शिवशंकर भारसाकळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रमोद येंडोले, कार्यकारी अभियंता (बांधकाम) एस. एस. गुडदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.   कार्यशाळेत प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावाला आरोग्य संपन्न करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच अन्य संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करण्य...