सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रभावीपणे राबवूया ; ग्रामस्थांना दर्जेदार सेवा देण्यासह स्वच्छता उपक्रमांना गती देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे आवाहन
बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देतानाच गावांमध्ये स्वच्छता आणि जनजागृतीला चालना देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती, सेवा आणि सुविधांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेवा संकल्प अभियानातून विविध उपक्रम ‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत सेवा सेतू अभियान, Innovation Challenge, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभ...